agriculture news in marathi heavy rain in Parbhani, Hingoli | Agrowon

परभणी, हिंगोलीत मुसळधार

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 10 जून 2021

परभणी ः मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर परभणी जिल्ह्यातील ४७ आणि हिंगोली जिल्ह्यातील २६ अशा एकूण ७३ मंडळांमध्ये बुधवारी (ता.९) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला.

परभणी ः मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर परभणी जिल्ह्यातील ४७ आणि हिंगोली जिल्ह्यातील २६ अशा एकूण ७३ मंडळांमध्ये बुधवारी (ता.९) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. जिंतूर, कावलगाव मंडळात १०० मिमी पेक्षा जास्त, तर आडगाव, दुधगाव, लिमला, कात्नेश्वर, चुडावा, औंढा नागनाथ या मंडळांत ६५ मिमी पेक्षा अधिक पाऊस झाला. जोरदार पावसामुळे ओढे, नाले, नद्या प्रवाहित झाल्या.

दमदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मंगळवारी (ता.८) मध्यरात्री नंतर तीन वाजल्यापासून जिल्ह्यातील अनेक मंडळात ढगांच्या गडगडाटात जोरदार पावसास सुरवात झाली.अनेक भागात सकाळी आठवाजेपर्यत पाऊस सुरु होता. जिंतूर, सेलू, पूर्णा, परभणी तालुक्यातील अनेक मंडळांत पावसाचा जोर होता. शेतजमिनीतील सखल भागात पाणी साचले. शेताबाहेर पाणी निघाल्याने ओढे, नाले भरून वाहिले. 

जिंतूर तालुक्यातील करपरा नदी भरून वाहिली. दरम्यान, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी हवामानशास्त्र विभागाच्या वेधशाळेत ११५.२ मिमी पावसाची नोंद झाली. हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढानागनाथ, सेनगाव तालुक्यातील अनेक मंडळांमध्ये जोरदार पाऊस झाला.

मंडळनिहाय पाऊस (मिमी ) ः

परभणी जिल्हा ः परभणी ६१.८, पेडगाव ३०, जांब १५.४, झरी १५.४, पिंगळी १५.४, जिंतूर १००.५,  सावंगी म्हाळसा ५३.८, बामणी ४४.५, बोरी ६०.८, आडगाव ८२.३, चारठाणा १९, वाघी धानोरा १५,दुधगाव ८१.८ ,  सेलू १६.७, वालूर २४.८, कुपटा २५, चिकलठाणा १७, मानवत १८.५, कोल्हा ९.८, ताडबोरगाव ४०.३, आवलगाव ८.५,  वडगाव ८.३,  महातपुरी १५.८, माखणी ६,  पिंपळदरी ८, पालम २९.८, चाटोरी ७.३, बनवस ६.३, पेठशिवणी २०, रावराजूर ३६.८, पूर्णा ५५.३, ताडकळस ३१.८, लिमला ६७.१, कात्नेश्वर ६८, चुडावा ६५.५, कावलगाव ११४.८. 
हिंगोली जिल्हा ः हिंगोली १९.८, नरसी २०, सिरसम १२, बासंबा १२.८, दिग्रस कऱ्हाळे ४२, माळहिवरा १३.८, खंबाळाा १६, कळमनुरी २१.८, वाकोडी १७, नांदापूर १८.७, डोंगरकडा १८.७, वारंगा ३६, वसमत ५५.८, हयातनगर १६.३, हट्टा ३४, गिरगाव १६.३ टेंभुर्णी ३६.८, कुरुंदा ४३.३, औंढानागनाथ ६७.३, साळणा ५९.३, जवळा बाजार ४२, सेनगाव ४९, गोरेगाव २२, आजेगाव ५१, पानकनेरगाव  
३५, हत्ता ३७.५.


इतर बातम्या
फळपीक विमा योजनेत त्रुटी, गोंधळसोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा...
पूर्व विदर्भात मुसळधार शक्य पुणे : कोकण ते केरळ दरम्यान असलेले कमी दाबाचे...
पूर्वहंगामी द्राक्षाचे विमा कवच चारपट...नाशिक : गेल्या काही वर्षांत नैसर्गिक आपत्तीमुळे...
‘एचटीबीटी’ बियाण्याची पाळेमुळे...पुणे ः देशात अवैध तणनाशक सहनशील ‘एचटीबीटी’ कापूस...
डाळिंब विमा अर्जासाठी १४ जुलैपर्यंत...सांगली : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत पुनर्रचित...
उसासाठी यंदाची ‘एफआरपी’ जाहीर कराकोल्हापूर : यंदाच्या गळीत हंगामातील उसाची एफआरपी...
कांदा व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याला मारहाण नाशिक : जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची...
शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड  ...नाशिक : राज्यात खरीप हंगामास सुरुवात झाली असून,...
अमरावती जिल्हा परिषदेची सभा...अमरावती : पीकविमा भरपाई, समृद्धी महामार्गाच्या...
संत्रा आयात शुल्क कपातीसाठी प्रयत्न करा...नागपूर : विदर्भाचे मुख्य फळपीक असलेल्या...
दूधदरप्रश्‍नी वैजापूर बाजार समितीच्या...औरंगाबाद : दूध उत्पादकांच्या मागण्याच्या...
खेडमध्ये बटाटा लागवडीस वेगचास, जि. पुणे : खेड तालुक्यात बटाटा लागवडीस...
स्थानिक काजूची आवक आजरा तालुक्यात...आजरा, जि. कोल्हापूर : आजरा बाजारपेठेत स्थानिक...
लाभार्थी शेतकऱ्यांचे अनुदान तातडीने अदा...बुलडाणा : शासन शेतकऱ्यांचा जीवनस्तर उंचविण्यासाठी...
पुणे बाजार समितीची ‘प्रादेशिक’ अधिसूचना...पुणे : पुणे बाजार समितीची निवडणूक टाळून सत्ता एका...
कांद्याची २५ दिवसांत विक्रमी अकरा लाख...नाशिक : जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार...
खानदेशात युरियाप्रश्नी प्रशासनाची धावपळजळगाव :  खानदेशात खरिपाला सुरवात होत असतानाच...
‘डीएससी’त अडथळे  आणल्यास कारवाई करापुणे ः राज्यातील सरपंच व ग्रामसेवकांचे संगणकीय...
खानदेशात बाजार समित्यांचे कामकाज पूर्ववतजळगाव :  खानदेशात बाजार समित्यांचे कामकाज...
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५, ६ जुलै... मुंबई : कोरोना संकटाची सध्याची स्थिती पाहता आणि...