कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधारेचा अंदाज

कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधारेचा अंदाज
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधारेचा अंदाज

पुणे : राज्यात दडी मारलेल्या पावसाला पुन्हा सुरवात झाली अाहे. संपूर्ण विदर्भ, मराठवाडा आणि कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागातील जिल्ह्यांमध्ये रविवारी सकाळपासूनच पावसाच्या सरींना सुरवात झाली आहे. राज्यात गुरुवारपर्यंत (ता. १६) पावसाचा अंदाज आहे. आज (ता. १३) कोकण, मध्य महाराष्ट्रामध्ये; तर बुधवारपासून (ता. १५) विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.  मॉन्सूनचा अास असलेला कमी दाबाचा पट्टा पश्‍चिमेकडे पंजाबच्या अमृतसरपासून पूर्वेकडे बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. उत्तर ओडिशा आणि परिसरावर समुद्रसपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत असून, आज (ता. १३) सकाळपर्यंत उत्तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. दक्षिण भारतात असलेले वाऱ्याचे पूर्व पश्‍चिम जोडक्षेत्र विरून गेले आहे.  कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे  माॅन्सून सक्रिय होऊन सह्याद्रीच्या घाटमाथ्यासह महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, तमिळनाडूमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे; तर उत्तर भारतात उत्तराखंड, उत्तर प्रदेशसह उत्तर भारतातही जोरदार पावसाची शक्यता आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये समुद्र खवळण्याची शक्यता असून, मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com