पाऊस
पाऊस

कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधारेची शक्यता

पुणे : कोकणात आजपासून (ता. ४) तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. शुक्रवारी (ता. ३) सकाळपर्यंत कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाने हजेरी लावली.  बिहार आणि परिसरावर हवेचे कमी दाबचे क्षेत्र सक्रिय आहे. तर सोमवारपर्यंत (ता. ६) बंगालच्या उपसागरात अाणखी एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत अाहेत. हे कमी दाबक्षेत्र पोषक ठरल्यास मंगळवारी (ता. ७) कोकणासह, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. गेले आठवडाभर पावसाने उघडीप दिल्याने राज्याच्या तापमानात वाढ झाली अाहे. शुक्रवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील वर्धा येथे राज्यातील उच्चांकी ३५.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.  शुक्रवारी (ता. ३) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे २७.६, कोल्हापूर २७.८, महाबळेश्वर १९.३, मालेगाव ३१.२, नाशिक २८.२, सातारा २७.६, सोलापूर ३४.३, सांताक्रूझ ३१.२, अलिबाग २९.७, रत्नागिरी २९.६, डहाणू ३२.४, आैरंगाबाद ३१.४, परभणी ३३.३, नांदेड ३२.५, अकोला ३३.३, अमरावती ३२.८, बुलडाणा ३२.०, चंद्रपूर ३४.४, गोंदिया ३१.९, नागपूर ३३.६, वर्धा ३५.०, यवतमाळ ३०.५. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com