agriculture news in marathi, heavy rain possibilities in north Maharashtra and north Kokan, Maharashtra | Agrowon

उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात अतिवृष्टीचा इशारा
टीम अॅग्रोवन
शनिवार, 22 सप्टेंबर 2018

पुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ चक्रीवादळाने बाष्प खेचून आणल्याने शुक्रवारी (ता. २१) सकाळपासून विदर्भ, मराठवाड्यात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस सुरू होता. तर मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान असून, तुरळक ठिकाणी पावसाला सुरवात झाली. आज (ता. २२) उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकणात काही ठिकाणी मुसळधार, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

पुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ चक्रीवादळाने बाष्प खेचून आणल्याने शुक्रवारी (ता. २१) सकाळपासून विदर्भ, मराठवाड्यात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस सुरू होता. तर मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान असून, तुरळक ठिकाणी पावसाला सुरवात झाली. आज (ता. २२) उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकणात काही ठिकाणी मुसळधार, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

कमी दाब क्षेत्रामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान तयार झाल्याने गुरुवारी (ता. २०) दुपारनंतर कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडला. शुक्रवारी सकाळपासून राज्यात ढगाळ हवामानामुळे उकाडा वाढला होता. नागपूरसह पूर्व विदर्भात पावसाने जोर धरला होता. तर मराठवाडा आणि पश्‍चिम विदर्भात ढगाळ हवामानासह पावसाला सुरवात झाली होती. मध्य महाराष्ट्रात जळगाव, सांगली, पुण्यात ढग गोळा झाले होते. तर कोल्हापुरात जोरदार सरी पडल्या. ढगाळ हवामान, पावसामुळे तापमानात घट होण्याची शक्यता अाहे.  

शुक्रवारी (ता. २१) राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस मिलिमीटरमध्ये (स्त्रोत : कृषी विभाग) :  कोकण : न्याहडी ३६, कर्जत ४५, कशेले ४४, कामरली ५९, पोलादपूर ३७, मार्गताम्हाणे ३०, रामपूर ३०, असुर्डे ६२, दाभील ३८, कडवी ५८, माखजन ४५, फणसावणे ३७, देवरुख ३०, तुलसानी ४२, तेरहे ८७, सावंतवाडी १००, कुडाळ ७६, कडूस ४९. 

मध्य महाराष्ट्र : कुडे २२, वर्ये २४, आंबवडे ३०, जावळी २७, अानेवाडी २४, कुडाळ ३३, पाटण २६, बामणोली ३०, पाचवड २२, भुईज २४, संख २०, शिराळा २५, मांगले ३५, सागाव ४८, निगवे २१, गडहिंग्लज ६७, हलकर्णी ६२, महागाव ३७, नेसरी ८०, कोवाड ५२. 

विदर्भ : चंद्रपूर २०, मूल २८, बेंबळ ३३, गोंडपिंपरी ५०, नावरगाव २०, शिंदेवाही २१, मोहाली २२, राजूरा २६, विरूर ३०, कोपर्णा २५, गडचांदूर २५, सावळी ३७, पाथरी ३५, विहाड ४०, बल्लारपूर ३८, पोंभुर्णा ३२, जेवती २९, पाटण २६, गडचिरोली ६२.२, पोरळा ५२.४, येवळी ४६.२, ब्राह्मणी २८, कुरखेडा २०, पिसेवढथा ३८, चामोर्शी ९३, कुंघाडा ७१, घोट ६२, आष्टी ७१, येनापूर ७४, सिरोंचा ५५, बामणी ४०, पेंटीपका ४०, असारळी २१, आहेरी ५३, अल्लापाल्ली ६२, पेरमिली ३८, धानोरा ३३, चाटेगाव ६३, मुलचेरा ५७, भामरागड खुर्द ३०, भामरागड ३२.

‘दाये’ चक्रीवादळ लगेच विरले
बंगालच्या उपसागरात बुधवारी तयार झालेल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत गेली. गुरुवारी (ता. २०) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास या प्रणालीचे ‘दाये’ चक्रीवादळात रूपांतर झाले. ताशी ७० ते ८० किलोमीटर वेगाने चक्राकार वारे वाहत असलेले हे चक्रीवादळ रात्री साडेबारा वाजता ओडिशातील गोपाळपूरजवळ जमिनीवर आले. त्यानंतर मात्र हे चक्रीवादळ निवळण्यास सुरवात झाली. शुक्रवारी (ता. २१) सकाळी त्याचे कमी तीव्रतेच्या वादळात (डीप डिप्रेशन) रूपांतर झाले. वायव्येकडे सकरत असलेले हे कमी दाब क्षेत्र हळूहळू निवळून जाणार आहे.   
 

इतर अॅग्रो विशेष
'पणन'ची २७ पासून कापूस खरेदी नागपूर ः सिसिआयची खरेदी सुरूच असली तरी कापूस पणन...
शेतीला व्यावसायिक दर्जा आवश्यक: सुहास...पुणे: भावनिकतेच्या आधारे शेती न करता शेतकरी...
एफआरपीची जुळवाजुळव करताना यंदाही कसरतचकोल्हापूर : गेल्या वर्षी वेळेत साखर विक्री न...
स्वतःच्या गरजेनुसार यंत्रांची केली...बदलत्या काळात शेतीत मजुरांची संख्या कमी झाली....
व्यापाऱ्यांनी शेतमाल बाजारातील बदल...पुणे ः बाजार समित्या बरखास्त केल्यास सक्षम...
नांदेड : सोयाबीनचा पेरणीपेक्षा अधिक...नांदेड  ः यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात...
पंचनाम्यांची ‘अतिवृष्टी’; रातोरात ९३...पुणे ः राज्य शासनाची यंत्रणा पिकाचे पंचनामे...
पीकविम्यापासून वंचित राहिल्यास कंपनी...अकोला ः जिल्ह्यात गेल्या महिन्यातील पावसाने...
उसावर आता तांबेरा, तपकिरी ठिबकेकोल्हापूर: सातत्याने पडणारे धुके व जमिनीतील...
राजू शेट्टीं थेट काश्‍मीरात;...कोल्हापूर : काश्मीरमधील सफरचंद, अक्रोड, केशर...
खरीप पिकांसाठी आठ हजार तर, फळबागांसाठी...मुंबई: राज्यात अवकाळी पावसाने नुकसान...
विदर्भ, मराठवाड्यात गारठा कायमपुणे : कोकण, मध्य महाराष्ट्राच्या विविध भागात...
बांबू कलाकारीतून तयार केली ओळखकला पदवीधर असलेल्या सौ. संगीता दिलीप वडे यांनी...
पर्यावरण संवर्धन, लोक शिक्षणामध्ये ‘...अकोला, वाशीम जिल्ह्यांतील सुमारे तीस...
सत्ता अन् जीवन संघर्षराज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून २२ दिवस...
नुकसानीचा बोजा केंद्रप्रमुख, जिनिंग...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) कापूस...
गडचिरोलीत रब्बी मक्‍यावर लष्करी अळीचा...गडचिरोली  ः धानकाढणीनंतर मका लागवड होणाऱ्या...
काटेकोर शेतीत द्राक्ष उत्पादक अग्रेसर:...पुणे : कष्ट व कौशल्याच्या बळावर कोणताही आकार आणि...
चीनमधील संत्रा खरेदीदारांचे शिष्टमंडळ...नागपूर ः चीनची बाजारपेठ मोठी असल्याने संत्रा...
रसायने, कीडनाशकांचा विवेकपूर्ण वापर...नवी दिल्ली: रसायने आणि कीडनाशकांचा अतिरेकी...