agriculture news in Marathi, heavy rain possibilities in several places Kokan and central Maharashtra, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

पुणे: ऑगस्ट महिन्याच्या अखेरपासून जोर धरलेल्या पावसाने काहीशी उसंत घेतली आहे. कोकणासह, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी येत आहेत. सोमवारी (ता. ९) महाबळेश्‍वर येथे सर्वाधिक १३६ मिलिमीटर; तर लांजा येथे १२० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पावसाचा जोर ओसरला असला तरी आज (ता. १०) कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार; तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

पुणे: ऑगस्ट महिन्याच्या अखेरपासून जोर धरलेल्या पावसाने काहीशी उसंत घेतली आहे. कोकणासह, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी येत आहेत. सोमवारी (ता. ९) महाबळेश्‍वर येथे सर्वाधिक १३६ मिलिमीटर; तर लांजा येथे १२० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पावसाचा जोर ओसरला असला तरी आज (ता. १०) कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार; तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

मध्य भारतात असलेले कमी दाबाचे क्षेत्र पश्‍चिमेकडे सरकून मध्य प्रदेशात आले आहे. या कमी दाब क्षेत्राची तीव्रताही कमी होत आहे. सोमवारी (ता.९) दुपारी उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात ढगांची दाटी होती. तसेच हलक्या ते जोरदार सरी येत होत्या. आज (ता.१०) मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा हिमालयाच्या पायथ्याकडे सरकण्याची शक्यता असल्याने पावसाचा जोरही ओसरणार आहे. गुजरातपासून केरळपर्यंत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार शक्य आहे, उर्वरित राज्यात मात्र पाऊस काहीसा कमी होण्याची शक्यता आहे.
    
सोमवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये स्रोत - हवामान विभाग) :  

कोकण : जव्हार ८१, पालघर ६७, तलासरी ७२, विक्रमगड ७२, वाडा ७३, चिपळूण ६८, दापोली ७७, गुहागर ६७, खेड ७०, लांजा १२०, मंडणगड ५५, कल्याण ५१, शहापूर ६०, उल्हासनगर ५०.
मध्य महाराष्ट्र : साक्री ४९, शिरपूर ५७, चंदगड ४३, राधानगरी ९३, शाहूवाडी ४५, इगतपुरी ६५, लोणावळा कृषी ६७, महाबळेश्वर १३६.
मराठवाडा : सिल्लोड ५१.
विदर्भ : पातूर ३९, पारशिवनी ३३.

इतर अॅग्रो विशेष
शेतकऱ्यांसाठी 'इर्मा' लागू करण्याचा...पुणे : राज्यात शेतकऱ्यांसाठी इर्मा अर्थात ‘‘इनकम...
दसरा-दिवाळीपर्यंत अभूतपूर्व 'कांदाटंचाई'पुणे : राज्यातील बाजार समित्यांत दोन दिवसांत...
कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : कर्नाटक, गोवा, अरबी समुद्र, कोकण आणि...
ठिकठिकाणी पावसाची हजेरीपुणे ः कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाल्याने...
पाच कीटकनाशकांवर अमरावती विभागात दोन...मुंबई : कीटकनाशकांच्या वापरामुळे शेतकरी व...
मज चंद्र हवास्थळ बंगळूर, सात सप्टेंबरची मध्यरात्र, वेळ १...
विविधतेतच एकताहिंदी भाषा दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित...
एकत्रित प्रयत्नांमधून झाले लष्करी अळी...नाशिक येथील के. के. वाघ कृषी महाविद्यालयाने...
पुरंदर, सासवडच्या सीताफळांची परराज्यात...पुणे जिल्ह्यातील पुरंदर, सासवडचे नाव काढताच...
कापडे, हळनोर, कांबळे यांना यंदाचा ‘डॉ....पुणे ः ‘सकाळ माध्यम समूहा’तील ‘ॲग्रोवन’चे...
जल ‘अ’नीतीया वर्षी महापूर आणि दुष्काळ या दोन्ही समस्यांचा...
‘लष्करी अळी’बाबत सरकार उदासीनच!देशातील वीसपेक्षा जास्त राज्यांमध्ये आणि एक कोटी...
मराठवाड्यात २६ तालुक्‍यांत...औरंगाबाद  : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
दरकवाडीच्या दावणीला चाराप्रश्‍नाने...औरंगाबाद : आधी दुष्काळ मग खरिपातील चारा पिकांवर...
शेतकऱ्यांच्या समुपदेशनासाठी राज्यात ...नागपूर : शेतकऱ्यांना पेरणी ते काढणीपर्यंत...
आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या जोरावर कडदे...पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील कडदे येथील...
कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा...पुणे : कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्राच्या पश्‍...
विविधरंगी फुले, फीलर्सला गणेशोत्सवात...फुलांना वर्षभर मागणी राहते. मात्र, वर्षांतील काही...
एकरी सात टन भाताचे विक्रमी उत्पादनरत्नागिरी जिल्ह्यातील रीळ येथील मिलिंद वैद्य...
लष्करी अळीमुळे येतेय दूध व्यवसायावर संकटनगर ः मक्यावर आलेल्या अमेरिकन लष्करी अळीच्या...