विदर्भात अतिवृष्टीचा इशारा

विदर्भात अतिवृष्टीचा इशारा
विदर्भात अतिवृष्टीचा इशारा

पुणे : बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आज (ता. २३) विदर्भात अतिवृष्टी होण्याचा इशारा आहे; तर कोकण, मध्य महाराष्ट्र तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा, तर मराठवाड्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. रविवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये वडगाव मावळ येथे सर्वाधिक २१० मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले. बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाबाचे क्षेत्र जमिनीवर आले असून, रविवारी सकाळी ते झारखंड आणि आेडिशा परिसरावर होते. जमशेदपूरच्या दक्षिणेला २२ किलोमीटर अंतरावर असलेली हे क्षेत्र निवळत आहे. या प्रणालीच्या प्रभावामुळे आज विदर्भ, ओडिशा, छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेशात अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, तर आज (ता. २३) कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे.  विदर्भात आणि मराठवाड्यात ढगाळ वातरण होते. रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये पुण्यातील वडगाव मावळ, लोणावळा, पालघरमधील जव्हार, नाशिकमधील घोटी, वेळुंजे येथे जोरदार पाऊस झाला. कोल्हापूरमधील साळवण येथे १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. पूर्व विदर्भातही तुरळक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली.  रविवारी (ता.२२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये - स्राेत कृषी विभाग) :  कोकण : गारेगाव ६४, नेरळ ८८, कळंब ७७, कामर्ली ६२, असुर्डे ९०, लांजा ७३, साईवन ७५, जव्हार १०६, साखर ९०, मोखडा ९५, विक्रमगड ६२.  मध्य महाराष्ट्र : उभेरठाणा ८२, बाऱ्हे ७४, मानखेड ७७, सुरगाणा ८१, नाणशी ६०, इगतपुरी ७०, घोटी १०३, धारगाव ७८, पेठ ६६, त्र्यंबकेश्‍वर ७७, वेळुंजे १२०, हर्सूल ७०, माले ६४, वडगाव मावळ २१०, कार्ला ६२, लोणावळा १०४, हेळवाक ७०, महाबळेश्‍वर ७०, गगनबावडा ८४, साळवण १२२, गवसे ७२.  विदर्भ : उमरेड ३९, सांगडी २०, पालंदूर ७१, पिसेवढथा २६, असारळी ४०, जरावंडी ३०, मुरूमगाव २६, पेंढरी ३२, कोर्ची ६६, बेडगाव ६०, कोटगुळ ५८.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com