agriculture news in Marathi heavy rain possibility in central Maharashtra and Vidarbha Maharashtra | Agrowon

मध्य महाराष्ट्र, विदर्भात वादळी पावसाचा अंदाज 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 30 मार्च 2020

राज्यात पुर्वमोसमी पावसाला पोषक हवामान आहे. शनिवारी (ता.२८) मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडला.

पुणे : राज्यात पुर्वमोसमी पावसाला पोषक हवामान आहे. शनिवारी (ता.२८) मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडला. आज (ता.३०) मध्य महाराष्ट्र, विदर्भात काही ठिकाणी वादळी, तर मराठवाड्यात विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे. मंगळवारपासून (ता.३१) राज्याच्या बहुतांशी भागात उन्हाचा चटका पुन्हा वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

राज्यात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली असली तरी बहुतांशी ठिकाणी ढगाळ हवामानासह उष्ण व दमट हवामान असल्याने उकाड्यात वाढ झाली होती. राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरू असून, अनेक ठिकाणी तापमान ३६ ते ३९ अंशांदरम्यान आहे. त्यामुळे चटका वाढला असून, उन्हाचा झळा अनुभवायला येत आहेत.

रविवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर व चंद्रपूर येथे प्रत्येकी ३९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उद्यापासून (ता.३०) तापमानात काहीशी वाढ होण्याची शक्यता आहे. 

दक्षिण छत्तीसगडपासून विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक, उत्तर केरळपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरातून होत असलेल्या बाष्पाच्या पुरवठ्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण होत आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी वादळी, तर मराठवाड्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

रविवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे किमाल व किमान (कंसात) तापमान, (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३५.१ (२०.४), जळगाव ३६.० (२०.४), कोल्हापूर ३६.३ (२४.४), महाबळेश्‍वर २७.९ (१८.७), मालेगाव ३४.६ (२०.८), नाशिक ३४.२ (१९.८), निफाड ३३.० (१७.०), सांगली ३६.८(२०.४), सातारा ३६.६ (२२.३), सोलापूर ३९.० (२४.०), डहाणू ३०.८ (२२.७), सांताक्रूझ ३४.९ (२३.२), रत्नागिरी ३४.८ (२४.०), औरंगाबाद ३४.९ (२१.२), परभणी ३७.९ (२२.०), अकोला ३८.०(२२.२), अमरावती ३७.२ (२३.२), बुलडाणा ३३.६ (२१.६), ब्रह्मपूरी ३७.७ (२३.८), चंद्रपूर ३९.० (२०.५), गोंदिया ३५.८ (२१.४), नागपूर ३६.१ (२२.८), वर्धा ३६.२ (२३.५). 


इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यात जोरदार पावसाचा पिकांना फटकाऔरंगाबाद, परभणी : औरंगाबाद, जालना, बीड, लातूर,...
हजारो टन कांदा निर्यातीच्या प्रतीक्षेतमुंबई/नाशिक : देशभरात कांदा निर्यातबंदी...
बीटी वांग्याच्या दुसऱ्या टप्प्यातील...पुणे : देशभरात चर्चेत असलेल्या बीटी वांग्याच्या...
साखर निर्यातीचे करार ५७ लाख टनांवरकोल्हापूर : देशातल्या साखर निर्यातीचे करार आता ५७...
तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यतापुणे ः बंगालचा उपसागर व उत्तर तामिळनाडूच्या...
दूध सल्लागार समिती कागदावरचपुणे : राज्यस्तरीय दूध सल्लागार समितीची एकही बैठक...
राज्यात मोसंबी १००० ते ४००० रुपये...औरंगाबादमध्ये १००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल...
कांदा, लसूण शेतीत बहिरवाडीने मिळवली...बहिरवाडी (ता. जि. नगर) हे छोटे गाव कांदा व लसूण...
स्पर्धेत टिकण्यासाठी ‘ई-नाम’केंद्र सरकारने कृषी, पणन व्यवस्थेत सुधारणा घडवून...
बाजार सुधारणांत नको राजकीय धुळवडकोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या संसद...
सुपारी फळगळीचे संकटसिंधुदुर्ग: मुसळधार झालेला पाऊस आणि सतत ढगाळ...
कोकण, मराठवाड्यात पावसाची शक्यतापुणे ः गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही...
कांदा निर्यातबंदीविरोधात मराठवाड्यातही...औरंगाबाद/परभणी: केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी...
निर्यातबंदीमुळे कांदा दरात मोठी घसरणनाशिक: केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्याचा...
कांदा निर्यातबंदी विरोधात नाशिक...नाशिक: प्रतिकूल हवामान, वाढलेला उत्पादन खर्च व...
‘स्मार्ट’च्या २८ पथदर्शक प्रकल्पांना...पुणे: कृषी खात्याच्या ‘स्मार्ट’ प्रकल्पातून...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष फळ छाटणी...सांगली ः जिल्ह्यात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात...
मराठवाड्यात पावसाचा जोर कायमपुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील...
राज्यात तीन वर्षांत ‘ई-नाम’द्वारे ...पुणे: केंद्र सरकारने सुरु केलेल्या राष्ट्रीय...
दर्जेदार रोपनिर्मिती पेपरपॉट, पीट मॉसचा...रोपनिर्मिती चांगल्या प्रकारे होण्यासाठी...