agriculture news in Marathi heavy rain possibility in east Vidarbha Maharashtra | Agrowon

पूर्व विदर्भात मुसळधार शक्य 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 23 जून 2021

कोकण ते केरळ दरम्यान असलेले कमी दाबाचे क्षेत्र निवळून गेले आहे. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव कमी झाला आहे. 

पुणे : कोकण ते केरळ दरम्यान असलेले कमी दाबाचे क्षेत्र निवळून गेले आहे. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव कमी झाला आहे. पुढील चार ते पाच दिवस पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तविला आहे. 

मराठवाडा, विदर्भात दोन दिवसांपासून उघडीप दिली आहे. मध्य महाराष्ट्राच्या पूर्व भाग व खानदेशातही अंशतः ढगाळ वातावरण आहे. कोकण व मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागात तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडत आहे. मंगळवारी (ता.२२) सकाळच्या आठ वाजेपर्यंत विदर्भातील चंद्रपूर येथे ३६.२ अंश सेल्सिअसची सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली. पावसामुळे तापमानात चांगलीच घट झाली आहे.

विदर्भात कमाल तापमानात ३० ते ३६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. मराठवाड्यातही ३२ ते ३४ अंश सेल्सिअस, मध्य महाराष्ट्रात तापमान १९ ते ३४ अंश सेल्सिअस, तर कोकणात ३१ ते ३३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. पुणे परिसरातही तापमानात काही अंशी घट झाली असून अंशतः ढगाळ वातावरण आहे. 

मॉन्सूनचा प्रवास मंदावला 
गेल्या दोन दिवसांपासून नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची (मॉन्सून) प्रवास उत्तर भारतात मंदावला आहे. मंगळवारी मॉन्सूनच्या प्रवासात फारशी प्रगती झाली नसल्याचे मॉन्सून जैसे थे आहे. त्यातच पुढे सरकण्यासाठी पुरेसे पोषक हवामान नसल्याने पुढील प्रवास संथगतीने सुरू राहणार असल्याची शक्यता आहे. पश्चिमेकडून वाहणारे वारे आणि अनुकूल वातावरणीय स्थिती नसल्याने मॉन्सूनचा पुढची वाटचाल अडखळली आहे. 

या जिल्ह्यांमध्ये होणार जोरदार पाऊस 
बुधवार ः
भंडारा, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया 
गुरुवार ः भंडारा,नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया 

मंगळवारी (ता.२२) सकाळपर्यंतच्या २४ तासांत विविध शहरातील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) 

 • मुंबई (सांताक्रुझ) ३३.४ 
 • अलिबाग - ३२.८ 
 • रत्नागिरी - ३१.५ 
 • डहाणू - ३३.५ 
 • पुणे - २९.८ 
 • कोल्हापूर - २९.७ 
 • महाबळेश्वर - १९.९ 
 • मालेगाव -- ३३.२ 
 • नाशिक - २९.५ 
 • सांगली - ३०.९ 
 • सातारा - २८.१ 
 • सोलापूर - ३४.८ 
 • औरंगाबाद - ३२.४ 
 • परभणी -- ३४.७ 
 • बीड -- ३३.२ 
 • अकोला - ३५.९ 
 • अमरावती - ३४.० 
 • बुलडाणा - ३०.४ 
 • ब्रम्हपुरी - ३५.७ 
 • चंद्रपूर - ३६.२ 
 • गोंदिया - ३४.८ 
 • नागपूर - ३६.० 
 • वर्धा - ३६.० 
   

इतर बातम्या
पशुचिकित्सा व्यवसायी आंदोलनाने पशुसेवा...नगर : पशुचिकित्सा व्यवसायी (डिप्लोमा, पदविकाधारक...
अमरावती जिल्ह्यात १८३ जणांना ...अमरावती ः २०१७-१८ मध्ये फवारणीदरम्यान विषबाधेत...
पीकविम्यातील सूचनांचा केंद्राकडून...पुणे ः पंतप्रधान पीकविमा योजनेत विमा कंपन्यांच्या...
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी साडेअकरा हजार...मुंबई ः राज्यातील विविध जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे...
कोकणात काही ठिकाणी मुसळधार पुणे : कोकणात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस...
निविष्ठा वितरणातील अडचणींत लक्ष घालणार...पुणे ः राज्यात निविष्ठा वितरणात अडचणी येत असल्यास...
मराठवाड्यात सव्वा लाख हेक्टरवरील...औरंगाबाद : मराठवाड्यातील सात जिल्ह्यांतील १००३...
गोंदिया जिल्ह्यात विमाधारक शेतकरी...गोंदिया : गेल्या वर्षी जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात...
साखरेचे किमान विक्री मूल्य तातडीने...कोल्हापूर : सध्या साखर उद्योग संकटात असून,...
वर्धा : पीककर्जप्रकरणी १६ बॅंकांना नोटीसवर्धा : पीककर्ज वाटपात दरवर्षी प्रमाणे या वर्षी...
आपद्‌ग्रस्त कुटुंबांना मिळणार पाच हजाररत्नागिरी : अतिवृष्टीचा सर्वाधिक तडाखा चिपळूण,...
पूरबाधित कर्जदारांना सहकार्याची भूमिका...कोल्हापूर : जिल्ह्यात पूर परिस्थितीमुळे नागरिक व...
सेंद्रिय शेतीचे तंत्र अंगीकारा ः डॉ. ढवणबदनापूर, जि. जालना : अधिक उत्पादन देणाऱ्या संकरित...
अकोल्यात ३७ हजार हेक्टरचे पंचनामेअकोला : अतिवृष्टीने नुकसान झालेल्या झालेल्या...
रुग्णालयांच्या सुरक्षेचा तपशील दाखल करा...मुंबई : रुग्णालयांच्या सुरक्षेसाठी आतापर्यंत...
परभणीत पशुधन पदविकाधारकांचे आंदोलनपरभणी ः पशुधन पदवीधारकांची जिल्हास्तरावर नोंदणी...
सातारा :बेसुमार वृक्षतोडीमुळे कोयनेचे...सातारा : कोयना धरण परिसरात मोठ्या प्रमाणात...
‘महसूल’ लोकाभिमुख करा ः आयुक्त गमेनाशिक : प्रशासनात चांगले काम केल्यास समाज देवत्व...
मोहोळ, उत्तर सोलापुरात बिबट्याची दहशत...सोलापूर ः चिंचोली, शिरापूर (ता. मोहोळ) अकोलेकाटी...
लासलगाव बाजार समितीत टोमॅटो लिलावास...नाशिक : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प.पू...