कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधारेचा इशारा

राज्यात मॉन्सून सक्रीय होण्यास पोषक हवामान तयार झाले असल्याने ढगांची दाटी झाली आहे. मुंबईसह कोकणात विविध ठिकाणी पावसाने जोर धरला आहे. आज (ता. १५) कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Hawaman
Hawaman

पुणे : राज्यात मॉन्सून सक्रीय होण्यास पोषक हवामान तयार झाले असल्याने ढगांची दाटी झाली आहे. मुंबईसह कोकणात विविध ठिकाणी पावसाने जोर धरला आहे. आज (ता. १५) कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मराठवाडा, विदर्भातही पावसाचा जोर वाढणार असून, काही ठिकाणी मेघगर्जना, वीजांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.  मंगळवारी सकाळपर्यंत काही ठिकाणी, तर उर्वरीत महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाने हजेरी लावली. सिंधुदुर्ग जिल्‍ह्यात पावसाचा जोर अधिक होता. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे सरकून अमृतसर ते बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे. पश्‍चिम किनारपट्टीला सामांतर कमी दाबाचा पट्टा दक्षिण महाराष्ट्रपासून केरळपर्यंत सक्रीय आहे. अरबी समुद्रावरून वाहणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे पावसाला सुरवात झाली आहे.  आज (ता.१५) उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मुंबईसह, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर अतिजोरदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. या शिवाय नाशिक, सातारा, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, लातूर, उस्मानाबाद, नांदेड या जिल्ह्यांसह विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली  आहे. 

मंगळवारी (ता.१४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्त्रोतः हवामान विभाग) कोकण : माथेरान ५२, मुरूड ६६, पेण ४०, पोलादपूर ४३, श्रीवर्धन ४७, उरण ५९, दापोली ६०, गुहागर ५३, हर्णे ९०, खेड ४७, देवगड ९०, मालवण ११२, वैभववाडी ४८, वेंगुर्ला ४०, भिवंडी ४१, शहापूर ४९.  मध्य महाराष्ट्र : भाडगाव ५२, बोधवड ३३, दहीगाव ७६, जामनेर ५८, पाचोरा ६०, गगनबावडा ३९, नांदगाव ४२, महाबळेश्वर ४६. मराठवाडा : औरंगाबाद ५५, फुलंब्री ३१, सिल्लोड ४२, सोयगाव ६३, केज ४२, बदनापूर ७७,  विदर्भ : लाखणी ४८, साकोली ५४, नागभिड ३३, सावळी ४८, नेर ५७.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com