agriculture news in Marathi, Heavy rain possibility in Kokan and central Maharashtra, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

पुणे: अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटे आणि परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. या प्रणालीच्या प्रभावामुळे पोषक हवामान झाल्याने दक्षिण भारतासह राज्यातही पावसाला सुरवात झाली आहे. आज (ता. १९) कोकण मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.     

पुणे: अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटे आणि परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. या प्रणालीच्या प्रभावामुळे पोषक हवामान झाल्याने दक्षिण भारतासह राज्यातही पावसाला सुरवात झाली आहे. आज (ता. १९) कोकण मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.     

देशभरातून मॉन्सून परतला आहे. यातच वाढलेल्या उन्हामुळे राज्यात चटका वाढला आहे. दोन दिवसांपासून राज्यात ढगाळ हवामान होत असल्याने तापमानात चढ-उतार सुरू आहे. पहाटेच्या वेळी पडणारे धुके, हवेत आलेल्या गारठ्यानंतर दुपारी उन्हाचा चटका वाढला आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत जाऊन सोमवारपर्यंत (ता. २१) कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाची शक्यता आहे. शुक्रवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सांताक्रूझ येथे सर्वाधिक ३६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

शुक्रवारी (ता. १८) सकाळपासूनच राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. नगर जिल्ह्यातील राहुरी तालक्यातील ब्राह्मणी येथे जोरदार सरी पडलाल्या. तर पुणे जिल्ह्यातही रिमझिम पाऊस झाला. तर गुरुवारी (ता. १७) सिंधुदुर्ग जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून जिल्ह्याच्या काही भागांत रिमझिम पाऊस झाला. त्यामुळे भातकापणीत अडथळा निर्माण झाला आहे. गुरुवारी रात्री काही भागांत तुरळक पाऊसदेखील झाला. शुक्रवारी (ता. १८) पहाटेपासून ढगाळच वातावरण आहे. काही भागांत रिमझिम पाऊसदेखील झाला. या पावसामुळे काही शेतकऱ्यांनी कापणी केलेला भात भिजला. काही शेतकऱ्यांनी लगबगीने भाताची बांधणी करून ठेवली आहे.

सांगली पाऊस, धुके, ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतातूर झाला आहे. गेल्या आठवड्यात जिल्ह्यात परतीचा पाऊस झाला. शेतात पाणी साचून राहिले होते. गेल्या तीन ते चार दिवसांपासून वातावरणात बदल होऊ लागले आहेत. धुकेही पडले होते. गुरुवारी सांगली जिल्ह्याच्या काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. कोल्हापूरमध्येही दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ हवामान होत आहे. शुक्रवारी (ता. १८) सकाळपासून जिल्ह्यात काही ठिकाणी धुके, तर बहुतांशी ठिकाणी ढगाळ हवामान होते. हवामान बदलाचा फटका प्रामुख्याने भाजीपाला पिकाला बसत आहे.
 
शुक्रवारी (ता. १८) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३१.१ (-०.८), जळगाव ३३.४(-१.६), कोल्हापूर ३१.०(०.७), महाबळेश्वर २६.१(०.४), मालेगाव ३२.५ (-१.१), नाशिक ३०.४ (-२.१), सातारा ३०.० (-०.८), सोलापूर ३३.२ (-०.१), अलिबाग ३४.२ (१.८), डहाणू ३५.६ (२.८), सांताक्रूझ ३६.० (२.६), रत्नागिरी ३५.०(२.८), औरंगाबाद ३०.७ (-१.४), परभणी ३३.२ (०.१), नांदेड ३३.० (-०.६), अकोला ३३.६ (-०.३), अमरावती ३३.४ (-०.६), बुलडाणा ३०.० (-१.०), चंद्रपूर ३२.८(-०.५), गोंदिया ३२.५(-०.७), नागपूर ३२.६ (-०.७), वर्धा ३२.५ (-०.८), यवतमाळ ३२.०(०.३).


इतर अॅग्रो विशेष
संजीवनी गटाचे रास्त दरात खात्रीशीर...नाशिक जिल्ह्यातील मोह (ता.सिन्नर) येथील तरुण...
शेतकऱ्यांसाठी ‘दीपस्तंभ’ ठरलेली...मानोरी (ता. राहुरी, जि. नगर) येथील कृषीभूषण डाॅ....
बळीराजा चेतना अभियान बंद करण्याचा निर्णयमुंबई : विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या...
विदर्भातून सूर्यफूलाचे पीक झाले हद्दपारनागपूर : सूर्यफुलाकरिता प्रसिद्ध असलेल्या भागात...
पीक कर्ज वाटपात हलगर्जीपणा करणाऱ्या...पुणे: महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत...
ग्रामपंचायतींचे लेखापरीक्षण होणारपुणे: पंचायत राजच्या माध्यमातून देशभरातील...
सतर्क राहून मदत कार्य कराः मुख्यमंत्रीमुंबई: मुसळधार वृष्टी आणि जोरदार वारे यामुळे...
कोकणाला दणका, मराठवाड्यात दिलासापुणे: मुंबईसह कोकणला पावासाने चांगलेच झोडपून...
कोकणात पावसाचा जोर वाढणार पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून अरबी...
`कृषी’चे प्रवेश सीईटीनेच होणार पुणे: राज्यात कृषी पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश ‘...
महागाई नियंत्रणासाठी रेपो दर 'जैसे थे' मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँकेने आपले ऑगस्ट आणि...
पिराचीवाडी झाली उपक्रमशील गावकोल्हापूर जिल्ह्यातील पिराचीवाडी(ता.कागल) हे...
शेती शाश्वत अन् आश्वासकही!चार महिन्यांपासून देशभर सुरु असलेले लॉकडाउन आता...
दूध दराचे दुखणेइतर व्यवसाय व दूध व्यवसायातील फरक हा की कारखाने...
उद्दिष्ट - मुदतवाढीत अडकवू नका मका...‘‘आ धी नोंदणी केल्यानंतर ११ जुलैला एसएमएस...
मराठवाड्यात कर्ज पुरवठ्याचं घोडं ३७...औरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीक कर्ज पुरवठा...
मुगाचे अर्धेअधिक क्षेत्र रोगाच्या...अकोला : यंदाच्या खरिपात मुगाच्या पिकावर लिफ...
दादाजींचे कुटुंबीय जगतेय केवळ...चंद्रपूर: ‘एचएमटी’सह तब्बल ९ धानाचे वाण विकसित...
सियावर रामचंद्र की जय ! अयोध्येत रंगला...अयोध्या : राम नामाच्या भक्तिसागरात आकंठ बुडालेली...
पालघरमध्ये महावृष्टी; मुंबई, कोकणला...पुणे : गेल्या दोन दिवसांपासून कोकणात पावसाने...