agriculture news in Marathi heavy rain possibility in Kokan Maharashtra | Agrowon

कोकण, घाटमाथ्यावर मुसळधारेचा अंदाज 

टीम अॅग्रोवन
रविवार, 2 ऑगस्ट 2020

राजस्थानचा दक्षिण भाग ते उत्तर गुजरात या दरम्यान चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे.

 पुणे ः राजस्थानचा दक्षिण भाग ते उत्तर गुजरात या दरम्यान चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. याशिवाय पंजाब व मेघालय या परिसरातही चक्राकार वाऱ्यांची स्थिती असल्याने राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे.

यामुळे आज (ता.२) पासून राज्यात पाऊस जोर धरणार असून उद्या (ता.३) कोकण व घाटमाथ्यावर मुसळधार तर विदर्भात मध्यम ते जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे. उत्तर भारतात मॉन्सनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा गंगानगर, पिलानी, बांडा, चुर्क, हजारीबाग, बेहरामपोर ते मिझोराम, मेघालयपर्यंत आहे. यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरणाची स्थिती तयार होत आहे. तसेच मराठवाडा ते उत्तर तमिळनाडूच्या दरम्यान काही प्रमाणात कमी दाबाचे क्षेत्र आहे.

यामुळे नगर, औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. शनिवारी (ता.१) सकाळी आठ वाजेपर्यंत औरंगाबादमधील कन्नड येथे १०२.० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. नगरमधील  राहुरी, नेवासा, अकोले या परिसरात जोरदार पाऊस पडल्याने खरिपातील पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. अनेक भागात ढगाळ असून काही ठिकाणी ऊन पडल्याची स्थिती होती. 

शनिवारी (ता.१) सकाळी आठ वाजेपर्यतच्या चोवीस तासात झालेला पाऊस, मिलिमीटरमध्ये
कोकण :  भिरा ४२, पोलादपूर ११, रोहा २८, तळा २०, लांजा २७, मंडणगड १०, कुडाळ ३१.  
मध्य महाराष्ट्र :  अकोले ३१, कोपरगाव १५, नेवासा ४२, राहुरी ४८.६, संगमनेर १४.०, सावळीविहीर २४.०, शेवगाव १२.०, श्रीगोंदा ११.०, चाळीसगाव १२.०, दहीगाव ११.६, चंदगड १९.०, गगनबावडा १५.०, हातकणंगले १२.०, राधानगरी २५.०, नवापूर २०, गिरणाधरण ३५.६, इगतपुरी ११.०, नांदगाव २३.०, नाशिक १९.२, सिन्नर १२.०,  सुरगाणा २७.१, घोडेगाव १६.०, भोर २१.०, जुन्नर १९.०, राजगुरूनगर १८.०, खंडाळा १३.४, फलटण २१, बार्शी १८.०, करमाळा १५.०, माळशिरस ३३.०.
मराठवाडा : औरंगाबाद ८५.२, गंगापूर ८२.०, कन्नड १०२.०, खुल्ताबाद ७७.०, पैठण २.०, फुलंब्री २५.०, सिल्लोड ४०.०, सोयगाव ११.०, वैजापूर ३३.०, बीड १४.०, औंढा नागनाथ १४.०, बदनापूर ३५.०, भोकरदन ३६.०, जाफ्राबाद ४३.०, देगलूर १३.०, हादगाव ४२.०, माहूर ३०.०, गंगाखेड ३७.०.
विदर्भ ः अमरावती १५.०, मोर्शी ११.४, बुलडाणा २२.०, जळगाव जामोद १३.६, भिवापूर १४.६, देवळी १३.७, अर्णी १०.७, उमरखेड १४.७.


इतर अॅग्रो विशेष
सदोष बियाण्यांत शेतकरी दोषी कसा? सोयाबीनच्या सदोष बियाण्यांचा विषय यंदा...
बियाणे दहशतवाद गंभीरच!तणनाशक सहनशील अवैध एचटीबीटी कापूस बियाण्याच्या...
कोकण, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता पुणे : मध्य महाराष्ट्र व विदर्भात पावसासाठी...
मराठवाड्यात कपाशी लागवडीत सव्वा लाख...औरंगाबाद : मराठवाड्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या...
सूक्ष्म सिंचन प्रस्तावांना पूर्वसंमतीची...अकोला ः  कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा...
साडेतीन हजार शेतकऱ्यांना शेतमाल तारण...पुणे ः शेतमालाच्या काढणीनंतर बाजारपेठेत एकाचवेळी...
आपत्कालीन परिस्थितीत राज्य सरकारांसोबत...मुंबई : आपत्कालीन परिस्थितीत केंद्र सरकार राज्य...
कीडनाशकांवर बंदीबाबत अभ्यासच झालेला नाहीपुणे: कृषी रसायन क्षेत्रात काही कीडनाशकांवर...
जालन्यात रेशीम कोषांची उलाढाल ६६...जालना: येथील रेशीम कोष खरेदी बाजारपेठेची यंदाच्या...
कलिंगड, भातशेतीसोबत ब्रॉयलर पक्षांची...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पेंडूर कनकवाडी येथील दीपक...
दूध आंदोलनाची पुढील दिशा आज ठरणारनगर ः दुधाला प्रतिलिटर तीस रुपये दर मिळावा आणि...
पॉवर टीलर आयातीवर निर्बंधपुणे: भारत-चीन वादाचा फटका आता पॉवर टीलर...
नगर जिल्ह्यात तेलकट डागांमुळे डाळिंब...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा छोटी तसेच तोडणीला...
शेळीपालन, श्‍वान, देशी कोंबडीपालनातून...शेळीपालन, मग श्‍वानपालन व आता देशी कोंबडीपालन अशी...
राज्यात ठिकठिकाणी पावसाच्या हलक्या सरीपुणे ः  कोकण, मध्य महाराष्ट्र, खानदेश,...
लक्ष वळविण्याची राजकीय खेळी!एखाद्या महासंकटाचा राजकीय लाभ कसा उठवायचा हे...
जो पारदर्शी तोच टिकेलकेंद्र सरकारने ‘एक देश एक बाजार’ योजनेची घोषणा...
आदिवासी महामंडळातर्फे ४९ लाख क्विंटल...नाशिक : कोरोनाच्या संकट काळात आदिवासी विकास...
संशोधनासाठी मोसंबी वाणांचे जतन फायदेशीर...बदनापूर, जि. जालना : मोसंबी फळपिकांच्या विविध...
परभणी जिल्ह्यात कापसाची ३६ लाख क्विंटल...परभणी ः कोरोना साथीमुळे लांबत गेलेला परभणी...