agriculture news in Marathi heavy rain possibility in Kokan Maharashtra | Agrowon

कोकणात मुसळधारेची शक्यता 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 28 जुलै 2021

कोकणसह संपूर्ण राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. कोकणात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे.

पुणे : कोकणसह संपूर्ण राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. कोकणात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. त्यामुळे संपूर्ण कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या भागात पुढील काही दिवस जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला. 

सध्या बंगालच्या उपसागरात उत्तर भागात कमी दाब क्षेत्र आहे. तसेच उत्तर भारतात मॉन्सूनचा ट्रफ गंगानगर, हिस्सार हारडोई, दाल्तोगंज, दिगा या भागात सक्रिय आहे. मध्य प्रदेशच्या वायव्य भाग आणि उत्तर प्रदेश मध्य भाग या भागात चक्रिय वाऱ्याची स्थिती कायम आहे. त्यामुळे कोकणात जोरदार पावसासाठी पोषक स्थिती तयार होत आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर या भागातही कमी झालेला पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे. येत्या चार ते पाच दिवस रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात मध्यम ते जोरदार स्वरूपात पाऊस पडेल. 

येथे होणार जोरदार पाऊस 
बुधवार ः
रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, 
गुरुवार ः ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर 
शुक्रवार ः ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर 
शनिवार ः ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर 

राज्यातील प्रमुख शहरांमध्ये मंगळवारी (ता.२७) सकाळी आठ वाजेपर्यंत नोंदवले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) कंसात सरासरीच्या तुलनेत झालेली वाढ : 

 • पुणे - २७.७ (०.३) 
 • जळगाव - ३१.६ (०.३) 
 • कोल्हापूर - २८.३ (२.१) 
 • महाबळेश्वर - १९.६ 
 • मालेगाव - ३०.६ (०.६) 
 • नाशिक - २८.१ (०.७) 
 • सांगली - २८.४ (०.३) 
 • सातारा - २६.५ ( ०.३) 
 • सोलापूर - ३३.० (१.९) 
 • मुंबई (कुलाबा) - ३०.६ (०.८) 
 • अलिबाग - ३०.५ (०.८) 
 • रत्नागिरी - ३०.२ (१.८) 
 • डहाणू - ३१.२ (०.९) 
 • औरंगाबाद - २९.७ (०.७) 
 • परभणी - ३२.३ (१.६) 
 • नांदेड- ३१.५ (०.२) 
 • अकोला - ३१.९ (१.१), 
 • अमरावती - ३०.० 
 • बुलडाणा - २८.५ (०.७) 
 • ब्रम्हपुरी - ३२.८ (२.६) 
 • चंद्रपूर - ३४.० (३.०) 
 • गोंदिया - ३१.२ (०.२) 
 • नागपूर - ३२.५ (१.९) 
 • वर्धा - ३७.५ (७.२) 
   

इतर अॅग्रो विशेष
बीजोत्पादनातून साधली कुटुंबाची भरभराटसुरेश हुसे यांना वडिलोपार्जित केवळ दीड एकर शेती....
ऑनलाइन ठिबक योजनेत पुन्हा कागदपत्रांचा...पुणे : कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याची परंपरा...
सर्वदूर जोरदार पावसाची शक्यतापुणे : बंगालच्या उपसागरातील ‘गुलाब’...
प्रगतिपथावरील जलसंधारण प्रकल्प लवकर...औरंगाबाद : जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साध्य...
‘रूफटॉप सौरऊर्जे’ला कसे मिळणार बूस्टर?नागपूर ः दीर्घ खोळंब्यानंतर महावितरणने पुन्हा...
केळी, संत्रा क्लस्टरमध्ये वर्ध्याचा...वर्धा : केंद्राच्या धर्तीवर राज्याने निर्यात धोरण...
सांगलीत ३० टक्के द्राक्ष फळछाटणी पूर्णसांगली ः जिल्ह्यात यंदाच्या द्राक्ष फळ छाटणीस...
‘अलमट्टी’ची उंची वाढवू नका ः राजू शेट्टीकोल्हापूर : कोल्हापूर, सांगली व बेळगाव...
'गुलाब' चक्रीवादळ कलिंगापट्टणमनजीक...पुणे : बंगालच्या उपसागरात घोंगावणारे 'गुलाब'...
येवला बाजार समितीचा ‘अंनिस’कडून गौरवयेवला, जि. नाशिक : ६४ वर्षांची परंपरा मोडीत काढत...
सोयाबीन विक्रीची घाई नकोनागपूर : मुहूर्ताचे दर पाहून शेतकऱ्यांकडून अधिक...
‘गुलाब’ चक्रीवादळ आज पूर्व किनाऱ्याला...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
राज्यात पावसाचा जोर वाढणारपुणे : बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीमुळे...
साहित्य संमेलनातून वैचारिक दिशा...औरंगाबाद : साहित्य हे समाजाच्या विकासासाठी...
लहान संत्रा फळांचे करायचे काय?नागपूर : लहान आकाराच्या संत्रा फळांवर नांदेड...
दहा जिल्ह्यांत ‘कृषी तंत्रज्ञान पारायण’नगर ः फळबागा, शेतीपिके आणि पशुसंवर्धनाबाबत ऐनवेळी...
दुग्ध व्यवसायातून उंचावले शेती-...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवजे (ता. कुडाळ) येथील...
सोनपेठ तालुक्यातील शेतकरी महिलांचा...परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथे महिला आर्थिक विकास...
बंगालच्या उपसागरात घोंघावतेय चक्रीवादळपुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
शेतीसह पर्यावरणाचे संवर्धनमान्हेरे (ता. अकोले, जि. नगर) येथील तुकाराम भोरू...