agriculture news in marathi, heavy rain possibility, Maharashtra | Agrowon

पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज
टीम अॅग्रोवन
रविवार, 22 जुलै 2018

पुणे : बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाबाचे क्षेत्र (डिप्रेशन) सक्रिय झाल्याने राज्यात सोमवारपर्यंत (ता. २३) पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. आज (ता. २२) विदर्भात अतिवृष्टी, तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

पुणे : बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाबाचे क्षेत्र (डिप्रेशन) सक्रिय झाल्याने राज्यात सोमवारपर्यंत (ता. २३) पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. आज (ता. २२) विदर्भात अतिवृष्टी, तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

  शुक्रवारी (ता. २०) बंगालच्या उपसागरात ठळक कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली होती. त्याची तीव्रता शनिवारी वाढून हे क्षेत्र ओडिशाच्या किनाऱ्याकडे सरकत होते. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा त्याच्या सर्वसाधारण स्थितीमध्ये आहे, त्यामुळे मध्य भारतासह महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्यास पोषक हवामान आहे. शनिवारी ओडिशा, उत्तर आंध्र प्रदेश, छत्तीसगडमध्ये ढगांची दाटी झाली होती, तर महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात ढग जमा होत होते. शनिवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार, तर विदर्भ, मराठवाड्यासह तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडल्या. 

शनिवारी (ता.२१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये - स्रोत कृषी विभाग) : 
कोकण : कर्जत ७९, नेरळ ९२, कडाव ८०, कळंब ८९, कशेळे ८५, कोप्रोळी ७१, हमारपूर ७५, वाकण ८४, विलवडे ७२, अंबोली ८०, साईवन ८९, कसा ८९, जव्हार १४७, साखर १६८, मोखडा १०५, तळवडा ११५.

मध्य महाराष्ट्र : नाणशी ५८, इगतपुरी ७५, घोटी ५२, धारगाव ८०, पेठ ६८, जागमोडी ५०, वेळुंजे १११, हर्सूल ५४, विसरवाडी ७०, अक्कलकुवा ९८, खापर ९९, मोरांबा ६७, दाब ६१, मोलगी ५५, वडफळी ६४, शेंडी ८९, माले ५४, मुठे ६९, भोलावडे ८०, कार्ला ८६, लोणावळा १४७, राजूर ६५, अापटाळे ३५, हेळवाक ५५, महाबळेश्‍वर ८१, तापोळा ९८, लामज १४५, आंबा ५९, राधानगरी ५१, साळवण ६७, गवसे ६४.

मराठवाडा : उस्मानपुरा ५८, वागरूळ २७, गोंधी २१, शृष्टी ३३, सातोणा २२, घनसांगवी २५, जांबसमर्थ २१, लिंबगाव २२,  बिलोली २०, सगरोळी २४, अदमपूर २७, मुखेड २६, येवती २५, जाहूर २६, चांडोळा ३४, पेठवडज ४२, किनी २७, मालेगाव २८, पूर्णा २१, चुडवा २१, सेलू २१, जवळा २०.

विदर्भ : खेर्डा २४, इंझोरी २०, पांढरकवडा २०, पाहापळ २०, चालबराडी २०, कोपर्णा २२, सिरोंचा ४०, बामणी २७, पेंटीपका २६, असारळी २९, जिमलगट्टा ७८, कासंसूर ३८, तरडगाव ३६.

इतर अॅग्रो विशेष
बागलाण तालुक्यात पूर्वहंगामी...नाशिक ः पूर्वहंगामी अर्ली द्राक्ष उत्पादनासाठी...
नांदेड, परभणी जिल्ह्यात गुलाबी बोंड...परभणी: परभणी, नांदेड जिल्ह्यांतील बीटी कपाशीवरील...
राज्यात पावसाची उघडीपपुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला मुसळधार...
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील ऊस...कोल्हापूर : साखर कारखाने म्हटले की सर्वांच्या...
परभणी दुग्धशाळेतील संकलनात सव्वादोन लाख...परभणीः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी येथील...
आवळा प्रक्रिया उद्योगातून बनविली ओळखजाचकवस्ती (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील सुमन...
फळबागेतून शेती केली किफायतशीरकनका बुद्रुक (ता. मेहकर, जि. बुलडाणा) शिवारात...
युवा शेतकऱ्याने केले यशस्वी ब्रॉयलर...लातूर जिल्ह्यातील हडोळती येथील महेश गोजेवाड या...
मराठवाड्यातील खरिपावर संकटाचे ढग गडदऔरंगाबाद : गेल्या हंगामात दुष्काळाने पिचलेल्या...
दक्षिण महाराष्ट्रात उसाचे वैभव लयालाकोल्हापूर/सांगली : पंचगंगा, कृष्णा, वारणा,...
तीन लाखाची लाच घेताना नाशिक बाजार...नाशिक: नाशिक  कृषी उत्पन्न बाजार...
कातळावर लिली; तर टायरमध्ये फुलला...रत्नागिरी जिल्ह्यातील मेर्वी येथील प्रगतिशील...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यतापुणे ः पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने पावसाचा...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब...
कोल्हापूरमध्ये पुरात घट, धरणातून विसर्ग...कोल्हापूर  : जिल्ह्यातील पुराची परिस्थिती...
ग्लायफोसेट तणनाशक कर्करोगकारक नाही :...वॉश्‍गिंटन : ग्लायफोसेट हे तणनाशक मानवास कर्करोग...
ऑगस्ट महिन्यातही पाणीटंचाई कायम; २ हजार...पुणे : पावसाने दमदार हजेरी लावल्याने कोकण,...
पिंपळगावकरांनी भाजीपाला शेतीतून साधली... बीड जिल्ह्यात अहमदनगर- अहमदपूर राज्य...