मराठवाडा, विदर्भात वादळी पावसाची शक्यता

मराठवाडा, विदर्भात वादळी पावसाची शक्यता
मराठवाडा, विदर्भात वादळी पावसाची शक्यता

पुणे ः उत्तर प्रदेशाच्या मध्य भागात चक्राकार चक्राकार स्थिती आहे. त्याचा परिणाम राज्यातील हवामानावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मराठवाडा व विदर्भाच्या काही भागांत हवामान अंशतः ढगाळ राहणार आहे. आज (ता.१) मराठवाडा व विदर्भात हवामान ढगाळ राहणार असून, पुढील दोन ते तीन दिवस मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाचा शिडकावा होण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे.  

उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशात असलेल्या चक्रावाताचा परिणाम विदर्भाच्या काही भागांत होत आहे. यामुळे या भागात हवामान अंशतः ढगाळ आहे. अमरावतीतील तळेगाव, अकोला या जिल्ह्याच्या परिसरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. उर्वरित काही भागांत वाढलेल्या थंडीचा कडाका अजूनही कायम असून, नववर्षाची सुरुवात थंडीने झाली आहे. मंगळवारी (ता. ३१) सकाळी विदर्भातील चंद्रपूर येथे ५.७ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नीचांकी नोंद झाली आहे.

उत्तर भारतात तीव्र थंडीची लाट अजूनही कायम आहे. उत्तर भारताकडून मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या दिशेने थंड वाऱ्याचे प्रवाह वाहत आहे. दरम्यान, राज्यात काही प्रमाणात असलेले कोरडे हवामानामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात कडाक्याची थंडी वाढली आहे. या वाढलेल्या थंडीमुळे ऊब मिळविण्यासाठी राज्यातील अनेक भागांत शेकोट्या पेटल्या आहेत. मध्य महाराष्ट्रात धुळे कृषी महाविद्यालय, निफाड, महाबळेश्वर आणि विदर्भातील चंद्रपूर या भागात थंडीचा कडाका कायम आहे. अनेक ठिकाणी कडाक्याची थंडी वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून थंडीत वाढ झाली असून, सरासरीच्या तुलनेत किमान तापमानात आठ अंश सेल्सिअसने घट झाली आहे. त्यामुळे विदर्भातील बहुतांशी भागात थंडी वाढली असून, किमान तापमानाचा पारा चांगलाच खाली आहे. विदर्भातील चंद्रपूर येथील किमान तापमानाचा पारा दहा अंश सेल्सिअसच्या खाली आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे असल्याने थंडी किंचित वाढली आहे. त्यामुळे किमान तापमानात काही प्रमाणात घट झाली आहे. मराठवाडा व विदर्भात काही भागांत ऊन आणि ढगाळ हवामानाची स्थिती असल्याने थंडी काही प्रमाणात कमी-अधिक आहे. मात्र, तुरळक ठिकाणी कोरडे हवामान असल्याने उत्तरेकडून वाहत असलेल्या थंड वाऱ्यांमुळे किंचित थंडी आहे. मराठवाडा व विदर्भात ऊन पडत असल्याने ढगाळ हवामानाची स्थिती निवळत आहे. मात्र, संध्याकाळी काही प्रमाणात गारठा जाणवत आहे. कोकणातील अलिबाग, रत्नागिरी, ठाणे, मुंबई या परिसरांत थंडी काही प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे या भागात १६ ते २० अंश सेल्सिअसच्या दरम्यान किमान तापमान होते. मध्य महाराष्ट्रासह, खानदेशातही ढगाळ हवामानामुळे गारठा कमी अधिक स्वरूपात आहे. तर धुळे कृषी महाविद्यालय, महाबळेश्वर, निफाड, पुणे परिसरांत किंचित थंडी आहे. उर्वरित भागात किमान तापमान १० ते २० अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. मराठवाड्यातही ढगाळ हवामानाची स्थिती असल्याने गारठा किंचित कमी झाला आहे. यामुळे किमान तापमान १४ ते १५ अंश सेल्सिअस या दरम्यान होते.    मंगळवारी (ता. ३१) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांतील विविध ठिकाणचे किमान तापमान, अंश सेल्सिअसमध्ये, कंसात वाढ, घट ः  अकोला १३.२, अलिबाग १८.९ (१), अमरावती १५.० (१), औरंगाबाद १४.२ (१), बुलडाणा १५.८ (३), चंद्रपूर ५.७ (-८), डहाणू १६.९(-१), गोंदिया १३.८ (२), जळगाव १४.४ (३), कोल्हापूर १६.७ (१), महाबळेश्वर १०.६ (-३), मुंबई १६.४ (-१), नागपूर १३.८ (१), नांदेड १७.० (४), नाशिक १२.२ (२), निफाड ११.२, धुळे कृषी महाविद्यालय १०.२, उस्मानाबाद १५.० (२), परभणी १५.४ (२), परभणी कृषी विद्यापीठ १५.६, लोहगाव १५.३ (३), पाषाण १५.५ (४), पुणे १४.० (३), रत्नागिरी २०.४ (१), सांगली १६.० (-१), सातारा १२.१ (-१), सोलापूर २०.१ (४), ठाणे १९.०, वर्धा १५.७ (३), यवतमाळ १७.० (३).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com