agriculture news in Marathi heavy rain possibility in Marathwada Maharashtra | Agrowon

मराठवाड्यात आजही वादळी पावसाची शक्यता 

टीम अॅग्रोवन
रविवार, 5 एप्रिल 2020

पावसाला पोषक हवामान असल्याने मराठवाड्यात वादळी पावसाचा, तर विदर्भ, कोकणात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे.

पुणे: उन्हाचा ताप वाढल्याने सोलापूर, मालेगाव, सांगली, बीड, अकोला येथे तापमान चाळीशी पार गेले आहे. शनिवारी (ता.४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे उच्चांकी ४१.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पावसाला पोषक हवामान असल्याने मराठवाड्यात वादळी पावसाचा, तर विदर्भ, कोकणात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. उन्हाचा चटकाही कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

पूर्वमोसमी पावसाने उघडीप दिल्याने राज्यात अनेक ठिकाणी तापमान ३७ अंशांच्यावर गेले आहे. दुपारच्या वेळी उन्हाच्या झळा वाढून उकाड्यातही वाढ होत आहे. विदर्भ आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून २.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. तर उत्तर महाराष्ट्रापासून कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे आज (ता.५) मराठवाड्यात मेघगर्जना, विजांसह वादळी पावसाचा, तर कोकण, विदर्भात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

शनिवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे किमान व किमान (कंसात) तापमान, (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३८.३, जळगाव ३९.६, कोल्हापूर ३८.७, महाबळेश्‍वर ३२.६, मालेगाव ४०.६, नाशिक ३७.७, निफाड ३७.०, सांगली ४०.०, सातारा ३९.१, सोलापूर ४१.०, डहाणू ३४.१, सांताक्रूझ ३४.१, रत्नागिरी ३४.१, औरंगाबाद ३८.४, बीड ४०, परभणी ३९.५, अकोला ४०.८, अमरावती ३८.८, बुलडाणा ३६.६, ब्रह्मपूरी ३९.०, गोंदिया ३७.६, नागपूर ३७.४, वर्धा ३७.९.


इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधारपुणे : राज्यातील बहुतांशी भागातील पावसाचे...
राज्यात हलक्या पावसाची शक्यतापुणे : काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस...
एक हजार प्राध्यापकांनी वयाची साठी...पुणे: राज्यातील कृषी विद्यापीठांमधील...
सूक्ष्म अन्न उद्योगांना मिळणार आता दहा...पुणे: राज्यात लवकरच पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग...
कृषी, कामगार विधेयकांची राज्यात...पुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर करुन घेतलेली...
शेतकरी आंदोलनाचे सात राज्यांत पडसादचंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांना विरोध...
सोयाबीन बियाणे प्लॉटना फटकाऔरंगाबाद: सध्याचे पावसाचे प्रमाण व त्यामुळे...
केळी विमा निकषांबाबत उत्सुकताजळगाव ः राज्य सरकारच्या चुकांमुळे हवामानावर...
अडीच हजार हेक्टर भातशेती सततच्या...सिंधुदुर्ग ः हळवी आणि भिजवणीची लागवड केलेली...
कृषी विधेयकांविरोधात राज्यात शेतकरी...पुणेः केंद्र सरकारने नुकतेच मंजूर केलेल्या कृषी...
सेंद्रिय व्यवस्थापनाच्या बळावर रोखली...सर्वाधिक संत्रा लागवडीखाली क्षेत्र असल्यामुळे ‘...
ऑनलाइन शिक्षणात बरेच ऑफलाइन! पाऊस आणि शाळा, महाविद्यालयं सुरू होण्याचा काळ...
आता शेतमाल खरेदीचे बोला!ऑगस्ट २०२० च्या पहिल्या आठवड्यात देशभरातील खरीप...
उद्योजकांच्या कर्जमाफीवर सर्वांचीच...भारतात शेती आणि शेतकरी याला खूप महत्त्व आहे....
खरीप धान्योत्पादन १४४ दशलक्ष टनांवर नवी दिल्ली ः कोरोना पुणे मुंबई बातमी ...
ऊसतोड कामगार मंडळाची रचना, धोरण लवकरचः...मुंबई : ऊसतोड कामगारांचे विविध प्रश्न व समस्यांवर...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हलक्या...पुणे ः राज्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे. पुढील...
‘पोकरा’मधून फळबाग, वनशेती, बांबू, तुती...औरंगाबाद: नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
पावसाळ्यापूर्वीच कापूस खरेदीचे नियोजन अमरावती : गेल्या हंगामात पावसामुळे कापसाचे नुकसान...
सुधारित शेती, पूरक व्यवसायाचा ‘निवजे...निवजे (ता.कुडाळ,जि.सिंधुदुर्ग) गावकऱ्यांनी शेती...