agriculture news in Marathi heavy rain possibility in Marathwada Maharashtra | Page 2 ||| Agrowon

मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता

टीम अॅग्रोवन
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडत आहे. आज (ता.२१) मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत विजांच्या कडकडाट वादळी पाऊस पडेल. 

पुणे ः राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडत आहे. आज (ता.२१) मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत विजांच्या कडकडाट वादळी पाऊस पडेल. तर, कोकणातील सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि उद्या (ता. २२) रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने वर्तविला आहे.

पुढील तीन ते चार दिवस कोकण किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. तर कोकणातील ठाणे, पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. बुधवारपासून या भागात पावसाचे प्रमाण कमी होणार आहे. मध्य महाराष्ट्रात पुणे, नगर, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. तर सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीप राहणार असून खानदेशातील धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यात मेघगर्नजेसह पाऊस पडेल.

सोमवारी औरंगाबाद, जालना, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत विजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल. लातूर, उस्मानाबाद, बीड जिल्ह्यांत काही प्रमाणात शिडकावा होईल. मंगळवारी औरंगाबाद वगळता इतर भागात अंशतः ढगाळ हवामान राहील. पश्चिम विदर्भातील अमरावती, बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडेल. तर गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व वर्धा काही ठिकाणी ढगाळ हवामानासह मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल. राज्यात अनेक ठिकाणी अधूनमधून ऊन पडणार असून काही प्रमाणात उकाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे.


इतर अॅग्रो विशेष
राज्यात उकाडा वाढण्यास सुरूवात  पुणे ः परतीच्या पावसाने संपूर्ण देशातून माघार...
पीकविमा परतावा तात्काळ द्या, अन्यथा...अमरावती : जिल्ह्यात एआयसी कंपनीच्या (ॲग्रिकल्चर...
कापूस उत्पादनात मोठी घट, पीक परवडेनाजळगाव ः अतिपावसात १२ एकर कापूस पिकात फूलगळ झाली....
बांगलादेशमधील संत्रा निर्यात लांबणीवरनागपूर : तांत्रिक कारणांमुळे बांगलादेशमध्ये...
साखरेचे नवे निर्यात करार ठप्पकोल्हापूर: देशातील साखर हंगामास सुरवात होत असली...
‘कडकनाथ’ कुक्कुटपालनात निर्माण केल्या...आडगाव (नाशिक) येथील संदीप सोनवणे यांचा १००...
व्यवहारापलिकडचा विचारदसऱ्याच्या पर्वावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘...
आत्मनिर्भर नव्हे, समृद्ध होऊ याशेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते स्व. भास्करभाऊ बोरावके...
ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला बळकटी...मुंबई: गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण...
व्यथा लई गंभीर हाय, पण करावंच लागतं !बीड: यंदा ऊस सोडून काहीच नाही. सोयाबीन पावसानं...
कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे काळ्या...नगर : कृषी विद्यापीठातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना...
कांदा दर पाडण्याचा डावनाशिक : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी कांदा लिलाव...
शेतकऱ्यांना मिळणार पिकांचे नवे १६ वाणपुणे: राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी...
उन्हाचा चटका वाढू लागलापुणे ः राज्यात पावसाने उघडीप देण्यास सुरूवात केली...
राज्यात सुधारित अंदाजानुसार ५९ लाख टन...पुणे: राज्यात यंदा उसाची उपलब्धता सुधारित...
‘पीएम-किसान’मध्ये बोगस लाभार्थींनी...मालेगाव, जि. नाशिक : पंतप्रधान किसान सन्मान...
शेतीसाठी परिपूर्ण आराखडा तयार करा:...अकोला : शेतकऱ्यांच्या आयुष्यात असलेली अस्थिरता...
व्यापाऱ्यांच्या मुजोरीला शेतकऱ्यांचे...अमरावती : ‘जशास तसे’च्या धर्तीवर उत्तर देत...
सरकारी मदतीबरोबरच विमा भरपाईही मिळणारपुणे: राज्यात पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसान...
आधुनिक बहुमजली कांदा साठवण तंत्रज्ञानचाळींद्वारे पारंपारिक कांदा साठवणुकीत होणारे...