agriculture news in Marathi heavy rain possibility in several places Maharashtra | Agrowon

तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा

टीम अॅग्रोवन
बुधवार, 14 ऑक्टोबर 2020

बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी तीव्रतेचे वादळ महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहे. त्याची तीव्रता कमी असली तरी दोन ते तीन दिवस तुरळक ठिकाणी हलका ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी तीव्रतेचे वादळ महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहे. त्याची तीव्रता कमी असली तरी दोन ते तीन दिवस तुरळक ठिकाणी हलका ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज (ता.१४) सिंधुदुर्ग, कोल्हापूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टी होण्याचा इशारा दिला आहे.

तीन ते चार दिवसांपूर्वी पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रिवादळामध्ये रूपांतर झाल्याने मंगळवारी सकाळी आंध्र प्रदेशाच्या किनाऱ्यावरून जमिनीवर आले आहे. त्यामुळे राज्यातही काही प्रमाणात वेगाने वादळी वारे वाहत होते. त्याचा परिणाम राज्यातील वातावरणावर झाला असून अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडला. पुढील दोन दिवस राज्यात काही अंशी ढगाळ हवामान राहणार असून काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा होण्याचा अंदाज आहे.

चक्रीवादळाचा आंध्र प्रदेशाच्या उत्तर किनारपट्टीजवळ येताना त्याचा वेग ताशी ५५-६५ किलोमीटर ते जास्तीत जास्त ७५ किलोमीटरपर्यंत होता. काकिनाडापासून आग्नेयेकडे १५ किलोमीटर, तेलंगणातील खम्मनपासून आग्नेयेकडे २०० किलोमीटर अंतरावर होते. आंध्र प्रदेश व तेलंगाणा या भागातून हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दिशेने सरकले होते. त्यातच अरबी समुद्राच्या पश्चिम मध्य भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली. त्यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले होते.

येथे पडणार जोरदार पाऊस 
बुधवार ः
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, बुलडाणा, चंद्रपूर, वाशीम, यवतमाळ.  
गुरूवार ः ठाणे, पालघर, रायगड, धुळे, नंदुरबार, नाशिक, पुणे.
शुक्रवार ः मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नगर, पुणे.
शनिवार ः सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, नाशिक.

राज्यातून मॉन्सूनची माघार २० ऑक्टोबरला?
सध्या परतीच्या पावसाला राज्यातून माघार घेण्यासाठी पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता असून येत्या दोन ते चार दिवसांत पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर साधारणपणे २० ऑक्टोबरच्या दरम्यान परतीच्या मॉन्सूनची राज्यातून माघार घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस राज्यातील अनेक भागात ढगाळ हवामान राहील. तर अधूनमधून उन्हासह तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला. 


इतर अॅग्रो विशेष
राज्यात आठवडाभर हलक्या पावसाची शक्यतापुणे : कोकणसह राज्यातील काही भागांत पावसाने...
देशात सव्वादोन लाख हेक्टरवर हळद लागवडसांगली ः यंदा देशात हळदीची लागवड अंतिम टप्प्यात...
आयातशुल्क वाढीचा संत्रा निर्यातीवर...अमरावती : संत्र्याचा मुख्य आयातदार असलेल्या...
मध्य प्रदेशात सोयाबीनचे क्षेत्र कमी...नागपूर : मध्य प्रदेशात पिवळं सोनं म्हणून ओळखल्या...
प्रक्रिया उद्योगातून ‘सूर्या’ची झळाळी तेलगाव (ता. वसमत. जि. हिंगोली) येथील सूर्या...
संकटांमधून जांभूळ शेती उद्योगाची वाटचालसिंधुदुर्ग जिल्ह्यातील निरुखे येथील अनिरुद्ध...
पावसाचा जोर कमी होणार पुणे : कोकण, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे व...
कोकणात पावसाचा जोर ओसरला पुणे : कोकणात धुमाकूळ घातलेल्या पावसाचा जोर...
सोसायट्यांवर बॅंकिंग सुधारणांचा परिणाम...पुणे ः बॅंकिंग नियमन कायद्यात झालेल्या...
राज्यात ‘एचटीबीटी’च्या ७५ लाख पाकिटांची...पुणे ः बंदी असूनही देशात कपाशीच्या तणनाशक सहनशील...
राज्यातील धरणांत २३४ टीएमसी पाणीसाठानगर ः राज्याच्या एकूण सहा महसूली विभागांतील...
कोकण, विदर्भात मुसळधारेचा अंदाज पुणे : दक्षिण कोकणची किनारपट्टी ते उत्तर...
राज्यात ठिकठिकाणी मुसळधारपुणे : कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग...
उत्तरेत मॉन्सूनचा वेगाने प्रवास पुणे : गेल्या दोन दिवसांपासून उत्तर भारतात पुन्हा...
तुम्हीच अभ्यास करा, अन् विम्याचे ठरवा...सोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक...
चिकू विमा हप्त्यात सहा पटीने वाढ पालघर ः कोरोनाच्या संकटात चहूबाजूंनी शेतकरी...
फळपीक विमा योजनेत हवामान धोके कायम, ...सोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा...
चार पिकांमध्ये पूर्ण बियाणे बदल नगर ः चांगले उत्पादन घ्यायचे तर नवी सुधारित...
द्राक्ष उत्पादकांची फसवणूक, ५...नाशिक : दिंडोरी तालुक्यातील वळखेड, निगडोळ, नळवाडी...
राज्यात ३.१४ लाखांवर नवीन वीजजोडण्या सांगली ः कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत मार्च...