agriculture news in Marathi heavy rain possibility in several places Maharashtra | Agrowon

काही ठिकाणी जोरदार सरी

टीम अॅग्रोवन
रविवार, 25 ऑक्टोबर 2020

राज्यातील काही भागांत पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र, मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. 

पुणे ः राज्यातील काही भागांत पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र, मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. कोकणातही हलक्या सरी पडत आहे. तर मराठवाडा व विदर्भात पावसाने काहीशी उघडीप दिली आहे. मध्य महाराष्ट्रात सततच्या पावसाने नुकसानीत वाढ होत आहे. 

गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला. सोयाबीन, कांदा, बाजरी पिके सडल्यात जमा झाली आहेत. ऊस पिकेही आडवी झाल्याने वजन कमी होण्यास सुरूवात झाली आहे. शेतातील पाणी अजूनही कमी न झाल्याने पिके पूर्णता वाया गेली आहेत. ज्या ठिकाणी पावसाने उघडीप दिली आहेत. तेथे भात काढणीला सुरूवात झाली असली तरी तुरळक ठिकाणी होत असलेल्या पावसाने भात कामे खोळंबत आहे. अनेक भागांत भात काढणी केलेली पिके पाण्यातच असल्याचे चित्र आहे. 

मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाने शुक्रवारी (ता.२३) सायंकाळी चांगलीच हजेरी लावली. इंदापूर, राजगुरुनगर येथे ४६ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तर नगरमधील श्रीगोंदा येथेही जोरदार पाऊस पडला. कोल्हापूर, सातारा, सांगली भागातही पावसाच्या बऱ्यापैकी सरी पडल्या. मराठवाडा व विदर्भात पावसाचा जोर ओसरला आहे. हलक्या जमीनी असलेल्या भागात वाफसा येत असल्याने शेती कामांना वेग येत आहे. त्यामुळे शेतात बाजरी, सोयाबीन, कापूस पिकांची काढणी सुरू आहे. 

विदर्भात गेल्या आठवड्यापासून पाऊस नसल्याने रब्बी हंगामाची तयारी वेगाने सुरू आहे. काही ठिकाणी रब्बी ज्वारीच्या पेरण्या झाल्या. पाऊस नसल्याने ओढे, नाल्यातील पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने धरणातील पाण्याचा विसर्ग बंद केल्या असून पाण्याची स्थिती स्थिर झाली आहे. 

शनिवारी (ता.२४) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला पाऊस (मिलिमीटर) स्त्रोतः हवामान विभाग 
कोकण : सावंतवाडी १०. 
मध्य महाराष्ट्र : श्रीगोंदा २३, राधानगरी २६, निफाड १३.४, येवला ३०, बारामती १७.६, भोर ६५, इंदापूर ४६, राजगुरुनगर ४६, शिराळा ३२. दहीवडी ३५, कराड २९, खटाव २४.३, सातारा १३.९. 
मराठवाडा ः पैठण १६. 
 


इतर अॅग्रो विशेष
‘सूक्ष्म सिंचन’प्रकरणी चौकशी...औरंगाबाद/जालना : जालना जिल्ह्यात सूक्ष्म सिंचन...
बीजोत्पादन क्षेत्र नोंदणीला मुदतवाढपुणे : राज्यात रब्बी हंगामासाठी घेतल्या जाणाऱ्या...
कमी कालावधीत पक्व होणारे मधुर कलिंगड...नाशिक : बंगळूर येथील भारतीय फलोत्पादन संशोधन...
किमान तापमानात घट होणार पुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेले निवार...
डाळिंब दरात मोठी सुधारणासांगली ः राज्यातील डाळिंब पीक यंदा सततचा पाऊस आणि...
पामतेल आयात शुल्कात कपात; केंद्र...नवी दिल्ली ः केंद्र सरकारने कच्च्या...
टंचाईग्रस्त दहीगाव झाले लोकसहभागातून...सातारा जिल्ह्यातील दहीगाव गावातील ग्रामस्थांनी...
'निवार’ चक्रीवादळाचा प्रभाव; राज्यात...पुणे ः बंगालच्या उपसागरात पूर्व किनाऱ्याकडे...
केळीची मागणी कायम, दर टिकून जळगाव : दाक्षिणात्य व गुजरातमधील केळीची उत्तर...
तमिळनाडू, पुद्दुचेरीत धुमाकूळचेन्नई  ः निवार चक्रीवादळामुळे वेगवान...
गहू, हरभरा पेरणीला वेगपुणे : यंदा चांगल्या पाणीसाठ्यामुळे गहू व...
पहिल्याच टप्प्यात थकवली ३५० कोटींची ‘...पुणे : राज्याचा ऊस गाळप हंगाम सुरू झाल्यानंतर...
आर्थिक चणचण,‘लम्पी’चे पशुधन बाजारावर...सांगली ः लॉकडाउनमुळे पशुधानाचे आठवडे बाजार तब्बल...
ऊसतोडणी मजुरांची संख्या यंदा दोन...नगर : राज्यातील साखर कारखान्यांवर ऊसतोडणी...
पणन महासंघाची खरेदी उद्यापासूननागपूर : महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक...
मराठवाड्यातील बहुतांश धरणे तुडुंबऔरंगाबाद : यंदा जोरदार पावसामुळे मराठवाड्यातील...
संकटकाळात श्री ब्रॅण्डद्वारे दर्जेदार...नाशिक जिल्ह्यातील वनसगाव येथील शैलेश व संदीप या...
सणांच्या हंगामात भाव खाणारी गाडे यांची...कांजळे (ता. भोर, जि. पुणे) येथील विलास गाडे यांनी...
महाटीत उपसरपंचपदासाठी साडेदहा लाखांची...नांदेड ः ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी उपसरपंचपदाचा...
राज्यात शनिवारपासून ‘जनप्रबोधन यात्रा’नगर/पुणे ः शेतकरी आत्महत्येला कारणीभूत असलेल्या...