राज्यात ठिकठिकाणी मुसळधारेचा इशारा 

महाराष्ट्राची कोकण किनारपट्टी ते कर्नाटक किनारपट्टीदरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे गेल्या आठवड्यापासून मुंबईसह, कोकणातील भागात मुसळधार पाऊस पडत आहे.
राज्यात ठिकठिकाणी मुसळधारेचा इशारा 
राज्यात ठिकठिकाणी मुसळधारेचा इशारा 

पुणे : महाराष्ट्राची कोकण किनारपट्टी ते कर्नाटक किनारपट्टीदरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे गेल्या आठवड्यापासून मुंबईसह, कोकणातील भागात मुसळधार पाऊस पडत आहे. राज्यात रविवारपर्यंत कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्याला चार ते पाच दिवस रेड आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला. 

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्ट्याचे पश्‍चिमेकडील भाग त्याच्या नियमित स्थितीवर असून, तो उत्तरेकडे सरकणार आहे. तर पूर्वभाग काहीसा उत्तरेकडे असून, तो दक्षिणेकडे येणार आहे. यातच बंगालच्या उपसागरात शुक्रवारपर्यंत (ता. २३) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून, तो पुढील तीन ते चार दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भात विजांसह पाऊस पडण्यात अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  येथे होणार जोरदार पाऊस  बुधवार ः संपूर्ण कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, वाशीम, गडचिरोली, गोंदिया.  गुरुवार ः संपूर्ण कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर, हिंगोली, नांदेड, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया.  शुक्रवार ः संपूर्ण कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर, हिंगोली, नांदेड, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ.  शनिवार ः संपूर्ण कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ.  राज्यातील प्रमुख शहरांमध्ये मंगळवारी (ता.२०) सकाळी आठ वाजेपर्यंत नोंदवले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) कंसात सरासरीच्या तुलनेत झालेली वाढ : 

  • पुणे - २६.३ (-१.८) 
  • जळगाव - ३४.२ (१.७) 
  • कोल्हापूर - २४.७ (-२.१) 
  • महाबळेश्‍वर - १९.४ (-०.४) 
  • मालेगाव - २५.२ (-५.६) 
  • नाशिक - २५.९ (-२.६) 
  • सांगली - २६.७ (-२.२) 
  • सातारा - २५.५ (-१.४) 
  • सोलापूर - २९.२ (-२.५) 
  • मुंबई (कुलाबा) - २७.८ (-२.०) 
  • अलिबाग - २७.२ (-२.८) 
  • रत्नागिरी - २७.४ (-१.६) 
  • डहाणू - २९.६ (-०.९) 
  • औरंगाबाद - २९.६ (-०.५) 
  • परभणी - ३२ (०.४) 
  • बीड- ३०.८ (१.०) 
  • अकोला - ३२.५ (०.३), 
  • अमरावती - ३२ (१.६) 
  • बुलडाणा - ३१.५ (२.८) 
  • चंद्रपूर - ३३.८ (२.३) 
  • गोंदिया - ३३.६ (२.२) 
  • नागपूर - ३४.२ (२.७) 
  • वर्धा - ३४.५ (२.९) 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com