agriculture news in Marathi Heavy rain possibility in several places Maharashtra | Page 2 ||| Agrowon

राज्यात ठिकठिकाणी मुसळधारेचा इशारा 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 21 जुलै 2021

महाराष्ट्राची कोकण किनारपट्टी ते कर्नाटक किनारपट्टीदरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे गेल्या आठवड्यापासून मुंबईसह, कोकणातील भागात मुसळधार पाऊस पडत आहे. 

पुणे : महाराष्ट्राची कोकण किनारपट्टी ते कर्नाटक किनारपट्टीदरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे गेल्या आठवड्यापासून मुंबईसह, कोकणातील भागात मुसळधार पाऊस पडत आहे. राज्यात रविवारपर्यंत कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्याला चार ते पाच दिवस रेड आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला. 

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्ट्याचे पश्‍चिमेकडील भाग त्याच्या नियमित स्थितीवर असून, तो उत्तरेकडे सरकणार आहे. तर पूर्वभाग काहीसा उत्तरेकडे असून, तो दक्षिणेकडे येणार आहे. यातच बंगालच्या उपसागरात शुक्रवारपर्यंत (ता. २३) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून, तो पुढील तीन ते चार दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भात विजांसह पाऊस पडण्यात अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

येथे होणार जोरदार पाऊस 
बुधवार ः
संपूर्ण कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, वाशीम, गडचिरोली, गोंदिया. 
गुरुवार ः संपूर्ण कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर, हिंगोली, नांदेड, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया. 
शुक्रवार ः संपूर्ण कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर, हिंगोली, नांदेड, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ. 
शनिवार ः संपूर्ण कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ. 

राज्यातील प्रमुख शहरांमध्ये मंगळवारी (ता.२०) सकाळी आठ वाजेपर्यंत नोंदवले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) कंसात सरासरीच्या तुलनेत झालेली वाढ : 

 • पुणे - २६.३ (-१.८) 
 • जळगाव - ३४.२ (१.७) 
 • कोल्हापूर - २४.७ (-२.१) 
 • महाबळेश्‍वर - १९.४ (-०.४) 
 • मालेगाव - २५.२ (-५.६) 
 • नाशिक - २५.९ (-२.६) 
 • सांगली - २६.७ (-२.२) 
 • सातारा - २५.५ (-१.४) 
 • सोलापूर - २९.२ (-२.५) 
 • मुंबई (कुलाबा) - २७.८ (-२.०) 
 • अलिबाग - २७.२ (-२.८) 
 • रत्नागिरी - २७.४ (-१.६) 
 • डहाणू - २९.६ (-०.९) 
 • औरंगाबाद - २९.६ (-०.५) 
 • परभणी - ३२ (०.४) 
 • बीड- ३०.८ (१.०) 
 • अकोला - ३२.५ (०.३), 
 • अमरावती - ३२ (१.६) 
 • बुलडाणा - ३१.५ (२.८) 
 • चंद्रपूर - ३३.८ (२.३) 
 • गोंदिया - ३३.६ (२.२) 
 • नागपूर - ३४.२ (२.७) 
 • वर्धा - ३४.५ (२.९) 

इतर अॅग्रो विशेष
‘गोकुळ’तर्फे दुभत्या जनावरांना लाखाचा...कोल्हापूर : दुभत्या जनावरांचा कोणत्याही आजाराने...
पितृपक्षामुळे सुकामेव्याला मागणी वाढलीपुणे : पितृपक्षाला प्रारंभ झाल्यानंतर काही...
साखर दरवाढीची गोडी कायमकोल्हापूर : गेल्या महिन्यापासून साखर दरात आलेल्या...
भाजीपाला निर्जलीकरण, मसालानिर्मितीलातूर जिल्ह्यातील वासनगाव येथील ‘सावित्रीबाई फुले...
राज्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारापुणे : राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी...
प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ मिळाले,...औरंगाबाद : गतवर्षीच्या रब्बी हंगामात आयोजित...
४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे आज...औरंगाबाद : ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे...
पीककर्जाचे ‘वरातीमागून घोडे’पुणे ः शेतकऱ्यांना खरिपासाठी दिल्या जाणाऱ्या पीक...
शेतकरी पुत्रांचा #सोयाबीन ट्रेंडनांदेड : सोयाबीनचे दर ११ हजारांवरून पाच हजार...
कोकणात पावसाचा जोर कायमपुणे : राज्यात गेले काही दिवस पावसाने हजेरी लावली...
एकोप्यातून पानोलीकरांचा ग्रामविकासात...गावकऱ्यांचा एकोपा, लोकसहभाग, श्रमदान आणि गावांतील...
विदर्भ, कोकणात पावसाचा अंदाजपुणे : राज्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर...
पाऊस सुरूच; ओल्या दुष्काळाचे सावटपरभणी ः राज्यात आठ दिवसांपासून पावसाचे पुनरागमन...
सेंद्रिय शेतीतून काळ्या आईचे आरोग्य जपा...नाशिक : रासायनिक शेतीचे परिणाम दिसत असल्याने...
मराठवाड्यात शेतीपिकांची पुन्हा दैनाऔरंगाबाद : मराठवाड्यात पुन्हा एकदा मंगळवारपासून (...
बेदाण्याला उठाव असल्याने दर स्थिरसांगली ः सणांमुळे बेदाण्याला चांगली मागणी आहे....
कापूस खरेदी नोव्हेंबरच्या पहिल्या...मुंबई : राज्यातील हंगाम २०२१-२२मधील शासकीय कापूस...
खरिपात तेलबिया उत्पादनात घट होणारपुणे : खरीप हंगाम २०२१-२२ मध्ये तेलबिया...
मराठवाड्यात पाऊस उठला पिकांच्या मुळावरऔरंगाबाद : आधी पावसाचा लहरीपणा आणि आता अतिपावसाने...
विदर्भात सोयाबीनला फुटले कोंब नागपूर : संततधार तसेच काही भागांत झालेल्या...