agriculture news in Marathi heavy rain possibility in state Maharashtra | Agrowon

राज्यात वादळी पावसाचा अंदाज; विदर्भात गारपिटीचा अंदाज

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 17 मार्च 2020

पुणे: बंगालच्या उपसागरावरून होत असलेल्या बाष्पाच्या पुरवठ्यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. आजपासून (ता.१७) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्याच्या कमाल व किमान तापमानातही वाढ होण्याची शक्यता आहे.

पुणे: बंगालच्या उपसागरावरून होत असलेल्या बाष्पाच्या पुरवठ्यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. आजपासून (ता.१७) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्याच्या कमाल व किमान तापमानातही वाढ होण्याची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरात केंद्रभागी अधिक दाब असलेली चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. यामुळे पूर्व आणि मध्य भारतात समुद्रावरून बाष्पपुरवठा होत आहे. छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि विदर्भात जोरदार वारे वाहून विजा, मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता आहे; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर, नगर, जळगाव, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड, विदर्भात बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज आहे. 

राज्याच्या कमान आणि कमान तापमानात वाढ झाली आहे. सोमवारी (ता.१६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३८ अंश सल्सिअस तापमानाची नोंद झाली; तर दोन दिवस किमान तापमानाचा पारा घसरलेल्या उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानात वाढ झाली. निफाड व धुळे येथे नीचांकी ११.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. राज्यात कमाल तापमानाचा पारा ३० ते ३८ अंश, किमान तापमानाचा पारा १४ ते २५ अंशांवर पोचला आहे. कमाल आणि किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.   

सोमवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे किमाल व किमान (कंसात) तापमान, (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३४.६(१४.५), नगर -(१४.५), धुळे ३२.० (११.४), जळगाव ३३.०(१४.५), कोल्हापूर ३५.९(२२.५), महाबळेश्‍वर ३०.५(१७.३), मालेगाव ३१.८ (१५.८), नाशिक ३१.३(१५.२), निफाड ३०.०(११.४), सांगली ३६.६(२१.८), सातारा ३५.१(२१.८), सोलापूर ३८.०(२५.३), अलिबाग -(२१.०), डहाणू ३४.८ (२१.३), सांताक्रूझ ३७.०(२०.६), रत्नागिरी ३४.८(२१.४), औरंगाबाद ३३.०(१७.८), परभणी ३५.६(१९.५), नांदेड ३५.५(२१.०).


इतर अॅग्रो विशेष
राज्यात ३० टक्के दूध वापराविनापुणे: कोरोना विषाणुमुळे पसरलेल्या साथीनंतर सुरू...
औरंगाबाद : शेतकरी गटामार्फत ग्राहकांना...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
नगर जिल्ह्यात पाचशे टन भाजीपाला...नगरः कोरोना संसर्गाच्या पाश्वभूमीवर लॉकडाऊनमुळे...
जगभरात कोरोनामुळे ३० हजार मृत्यूः...जिनिव्हा: जगभरात कोरोना विषाणूचे थैमान सुरुच...
विदर्भात विजांसह पावसाची शक्यतापुणे : राज्यात सुरू असलेला पूर्वमोसमी पाऊस काहीशी...
थेट विक्रीने सोडविला दराचा प्रश्‍नऔरंगाबाद: कोरोनामुळे शेतमाल विक्रीचा प्रश्न...
पुणे, मुंबईतील सोसायटीधारकांनी...पुणे ः शहरी भागातील हाउसिंग सोसायटी भागातील...
खताचे आठ रेल्वे रेक ‘अनलोड’ पुणे : कोरोना लॉकडाऊननंतर राज्याच्या विविध भागात...
राज्यातील २२० बाजार समित्यांचे कामकाज...पुणे: कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी...
लॉकडाऊन वाढवण्याचा विचार नाही : कॅबिनेट...नवी दिल्ली: कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी १४...
उन्हाच्या चटक्यात महाराष्ट्र होरपळणारपुणे : यंदाच्या उन्हळ्यात महाराष्ट्र उन्हाच्या...
यंदाची चैत्री वारी रद्द, पंढरपुरात येऊ...सोलापूर ः पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेची...
पुणे बाजार समितीत १७ हजार क्विंटल फळे...पुणे: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
जळगाव बाजारसमितीत सोशल डिस्टन्सिंगकडे...जळगाव  ः येथील बाजार समितीत भाजीपाल्याची आवक...
देशात कोरोनाबाधीत १०७१ रुग्ण  नवी दिल्ली: देशात कोरोनाबाधीत रुग्णांची...
कोकण रेल्वेकडून अत्यावश्यक वस्तूंची जलद...रत्नागिरीः देशभरातील जनतेला आवश्यक वस्तूंचा...
सोनाई प्रकल्पात दहा लाख लिटर दूध नासले...पुणे: कोरोनामुळे राज्यात दुधाचा महापूर सुरू झाला...
बार्शी तालुक्यातील द्राक्षपट्टा...सोलापूर  ः कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर...
पुणे विभागात ३२९ क्विंटल भाजीपाल्याची...पुणे  ः ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
शाळांमध्ये शिल्लक धान्यांचे ...पुणे : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्यातील शाळांना...