agriculture news in Marathi heavy rain possibility in state Maharashtra | Agrowon

वादळी पावसाचा मंगळवारपासून अंदाज

टीम अॅग्रोवन
रविवार, 22 मार्च 2020

बंगालच्या उपसागरावरून होत असलेल्या बाष्पाच्या पुरवठ्यामुळे राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान आहे.

पुणे: बंगालच्या उपसागरावरून होत असलेल्या बाष्पाच्या पुरवठ्यामुळे राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान आहे. मंगळवारपासून (ता. २४) राज्यात वादळी पावसाचा अंदाज आहे. जोरदार वारे, वावटळी, मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. यातच कमाल तापमान पस्तिशीपार गेल्याने उन्हाचा चटकाही असह्य होऊ लागला आहे.

उन्हाचा ताप वाढल्याने शनिवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे उच्चांकी ३७.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मालेगाव, सांगली, परभणी, अकोला येथे ३७ अंशांपेक्षा अधिक, धुळे, अमरावती, चंद्रपूर येथे ३६ अंशापेक्षा अधिक, तर जळगाव, कोल्हापूर, सातारा, नांदेड, नागपूर, वर्धा येथे तापमान ३५ अंशांच्या पुढे गेले आहे. किमान तापमानातही चढ-उतार सुरूच असून, निफाड येथे नीचांकी ११.२ अंशा सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.  

बंगालच्या उपसागरात केंद्रभागी अधिक दाब असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून पूर्व आणि मध्य भारतात सातत्याने बाष्पाचा पुरवठा होत आहे. पश्‍चिम विदर्भापासून तमिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टाही सक्रिय आहे. मंगळवारपर्यंत राज्यात उन्हाच्या झळा वाढणार असून, ढगाळ व दमट हवामानाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

शनिवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे किमाल व किमान (कंसात) तापमान, (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३४ (१४.२), धुळे ३६ (१२.६), जळगाव ३५ (१६.०), कोल्हापूर ३५.६ (२०.५), महाबळेश्‍वर ३०.१ (१६.४), मालेगाव ३७ (१७), नाशिक ३१.८ (१५.४), निफाड ३० (११.२), सांगली ३७ (१७.३), सातारा ३५.५ (१५.८), सोलापूर ३७.९ (२२.२), अलिबाग ३०.२ (२०.१), डहाणू ३०.४ (२१.६), सांताक्रूझ ३१.७ (२०.२), रत्नागिरी ३४.३ (२०.६), औरंगाबाद ३४.६ (१५.७), परभणी ३७.१(१८.२), नांदेड ३५.५ (२१.५), अकोला ३७.५ (१८.५), अमरावती ३६.४ (१८.८), बुलडाणा ३४.२ (१८.६), चंद्रपूर ३६.५ (२०.५), गोंदिया ३१.२ (१८.८), नागपूर ३५.२ (१९.२), वर्धा ३५.५ (१९.८).


इतर अॅग्रो विशेष
तिढा सुटावा लवकर!मागील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असताना राज्यात...
कांदा निर्यातबंदी आवडे सरकारलाकेंद्र सरकारने अचानक कांद्यावर निर्यातबंदी लादली...
खानदेशातील सिंचन प्रकल्प भरलेजळगाव : खानदेशात या महिन्यातील जोरदार पावसाने...
मराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन...औरंगाबाद : सततच्या पावसाने औरंगाबाद, जालना, बीड...
खानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेगजळगाव : खानदेशात कांदेबाग केळी काढणी सुरू झाली...
शेती विधेयकांविरोधात शुक्रवारी बंदपुणे ः केंद्र सरकारने लोकसभेत पास केलेल्या...
राहुरी कृषी विद्यापीठासाठी नव्या...पुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...
कांदा बियाण्याची टंचाईनगरः गेल्यावर्षी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे...
‘कृषी’तील ‘वतनदारी’ निवृत्तीनंतरही कायमपुणे: कृषी आयुक्तालयात वर्षानुवर्षे राखलेली ‘...
वऱ्हाडातील मोठे, मध्यम प्रकल्प तुडुंबअकोला ः वऱ्हाडात बहुतांश तालुक्यांमध्ये पावसाने...
मध्य महाराष्ट्र, कोकणात वादळी पावसाचा...पुणे ः महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टीवर...
पावसाचा कहर, पिकांची नासाडी सुरुचपुणे ः राज्यात पावसाचा जोर वाढतच आहे. रविवारी (ता...
सांगली : डाळिंब बागांचे ५० कोटींहून...सांगली ः डाळिंबाला अगोदर निसर्गाची साथ मिळाली...
`क्रॉपसॅप`मध्ये ३३ कोटींची कपात पुणे: कोविड १९ मुळे ग्रामीण भागात तयार झालेल्या...
पशुपालन,दूध प्रक्रियेतून वाढविला नफाशिरसोली (जि.जळगाव) येथील डिगंबर रामकृष्ण बारी...
संरक्षित शेतीतून शाश्वत उत्पादनाकडे...वाढत असलेली दुष्काळी परिस्थिती आणि बदलते हवामान...
बळीराजालाच बळी देण्याचा प्रकार?शेती क्षेत्रातील सुधारणाविषयक तीन वटहुकूम असोत...
नाशिकमध्ये कांदा निर्यातबंदीमुळे कामकाज...नाशिक : केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूचऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे...
बुलडाणा : नवीन सोयाबीनला चिखलीत ३८८१...बुलडाणा ः या हंगामात लागवड केलेल्या सोयाबीनची...