agriculture news in Marathi heavy rain possibility in state Maharashtra | Agrowon

मध्य महाराष्ट्र, कोकणात वादळी पावसाचा इशारा 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020

आज (ता.२२) कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गासह मुंबई आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांत वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाच्या सूत्रांनी दिला.

पुणे ः महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यामुळे आज (ता.२२) कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गासह मुंबई आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांत वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाच्या सूत्रांनी दिला. 

कोकण किनारपट्टीलगत दोन ते तीन दिवस सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. कोकणातील पालघर, मध्य महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक, सांगली, मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होईल. उद्या (बुधवारी) ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, जिल्ह्यांत काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलका ते जोरदार पाऊस पडेल. तर नगर, सोलापूर, खानदेशातील धुळे, नंदुरबार, मराठवाड्यातील 
बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक भागात हलक्या पावसाचा शिडकावा होईल. विदर्भातील सर्वच जिल्ह्यात आज हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. उद्यापासून तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसतील. राज्यात गुरूवार (ता.२४) पासून काही प्रमाणात जोर कमी होऊन पावसाची उघडीप राहील. 

राज्यातील अनेक भागात दोन दिवसांपासून जोर वाढला आहे. त्यामुळे राज्यात ढगाळ हवामानासह अधूनमधून ऊन पडत आहे. तर काही वेळा हलका ते मुसळधार पाऊस पडत असल्याची स्थिती आहे. त्यामुळे वातावरणात उकाडा वाढत असून हवामानात चांगलेच बदल होत आहे. पुणे परिसरातही मध्यम स्वरूपाचा तर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. उद्या मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 


इतर अॅग्रो विशेष
मोह फुलांचा वाढेल गोडवाराज्यामध्ये ऐन नवरात्रीमध्ये मॉन्सून देवतेने...
देखो तो कहीं चुनाव है क्या?‘स रहद पर तनाव है क्या, देखो तो कहीं चुनाव है...
कांदा खरेदीनंतर व्यापाऱ्यांना मिळणार...नाशिक : बाजार समितीत कांदा खरेदी केल्यानंतर...
मराठवाड्यात साठ टक्के कपाशीवर गुलाबी...नांदेड : ‘‘मराठवाड्यात लवकर येणारे कापूस वाण...
कंपन्यांनी सर्वेक्षण न केल्यास विमा...पुणे: राज्यात विमा कंपन्यांनी पीक नुकसानीचे...
इथेनॉल दरात तीन रुपयांपर्यंत वाढकोल्हापूर : यंदाच्या हंगामात इथेनॉलनिर्मितीला गती...
एक लाख टन कांदा आयातीची शक्यतानवी दिल्ली ः देशातील कांदा दरवाढीवर नियंत्रण...
कापूस खरेदीसाठी तीस केंद्रे अंतिमनागपूर : गेल्या हंगामात नव्वद केंद्र आणि १५०...
फळ पीकविमा योजनेवर केळी उत्पादकांचा...जळगाव ः हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत केळी...
द्राक्ष निर्यातदार, पॅकहाउसवरील निलंबन...नाशिक: नाशिकमधून गेलेल्या ४१ कंटेनरमध्ये कीड...
हातचं सारं गेलं, आता जगावं कसं?नाशिक : यंदा वेळेवर पाऊस नसल्याने भाताची रोपे...
धानाच्या हमीभावात ११ वर्षांत केवळ एक...भंडारा: व्यवस्थापन खर्चात दरवर्षी होणारी वाढ,...
राज्यात उन्हाची तीव्रता वाढली पुणे ः राज्यातील अनेक भागात उन्हाची तीव्रता वाढली...
कांदा लिलाव सुरू करण्याचे आदेशनाशिक : जिल्ह्यात विविध बाजार समित्यांमध्ये...
सर्वांगीण विकासातून गुंडेगावचा झाला...गुंडेगाव (ता. जि. नांदेड) या गावाने शेती,...
कृषी उद्योजकतेची ‘एबीसी’सन २०२० च्या दुसऱ्या तिमाहीत भारताचा जीडीपी ...
आयकर भरणाऱ्या ६५१ शेतकऱ्यांना नोटिसाशहादा, जि. नंदुरबार : आयकर भरत असूनही केंद्र...
कांद्याची कोट्यवधीची उलाढाल ठप्प नाशिक: केंद्र सरकारने कांद्याच्या वाढत्या दरावर...
करार शेतीची जबाबदारी कृषी विभागाकडेचपुणे: करारशेतीचा नवा कायदा अस्तित्वात आल्यानंतर...
मॉन्सूनने घेतला देशातून निरोपपुणे ः परतीच्या पावसाला देशातून माघार घेण्यासाठी...