agriculture news in Marathi heavy rain possibility in state Maharashtra | Agrowon

जोरदार पावसाची शक्यता 

टीम अॅग्रोवन
रविवार, 18 ऑक्टोबर 2020

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात पावसासाठी वातावरण तयार होत आहे. पुढील काही दिवस राज्यात पुन्हा मध्यम ते जोरदार पाऊस पडेल. 

पुणे ः कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात पावसासाठी वातावरण तयार होत आहे. पुढील काही दिवस राज्यात पुन्हा मध्यम ते जोरदार पाऊस पडेल. आज (ता.१८) धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, सातारा, सांगली, सोलापूर आणि संपूर्ण मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला. 

बंगालच्या उपसागरात नऊ ऑक्टोबरला कमी दाबाच्या क्षेत्र झाले होते. त्यानंतर उद्या (ता.१९) पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. बंगाल उपसागराचा पश्चिम भाग व व आंध्र प्रदेशाच्या दक्षिण भागात कमी दाबाचे क्षेत्र असून त्याचे चक्राकार वाऱ्यामध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे. ते पुन्हा अरबी समुद्र दिशेने सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा काही प्रमाणात पाऊस वाढणार आहे. आज खानदेश व मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडणार आहे. उद्यापासून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात विजांसह तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडेल. 

सध्या राज्यातील अनेक भागात ढगाळ हवामान आहे. त्यातच अरबी समुद्राकडे गेलेल्या चक्रीवादळाची तीव्रता कमी होऊन ते ओमानकडे सरकले आहे. त्यामुळे राज्यात पावसाचा प्रभाव कमी झाला. अनेक भागात पावसाने उघडीप दिली आहे. परंतु, राज्यात काही प्रमाणात पुढील काही दिवस ढगाळ वातावरणाची स्थिती कायम राहणार आहे. 

येथे पडणार जोरदार पाऊस ः 
सोमवार ः
ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, 
लातूर, उस्मानाबाद. 
मंगळवार ः ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, 
हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, संपूर्ण विदर्भ. 
बुधवारी ः ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, लातूर, 
उस्मानाबाद, संपूर्ण विदर्भ. 
 

 
 


इतर अॅग्रो विशेष
बुडून गेलं रान देवा, वाहून गेलं शिवार...कोल्हापूर : उसवलं गणगोत सारं, आधार कुनाचा न्हाई...
पांढऱ्या कापसाचे काळे वास्तवदेशातील सूत गिरण्या आता ९५ टक्के कार्यक्षमतेने...
शेतकऱ्यांच्या कष्टाचे झाले निर्माल्यरिमझिम पाऊस, थेंब पाकळीवर पडला ओघळून जाताना...
अतिवृष्टीचा मराठवाड्यात २३ लाख हेक्टरला...औरंगाबाद : यंदा खरिपात अतिवृष्टी व सततच्या...
केळी पीक विम्याबाबत आज बैठकजळगाव ः हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत केळी...
राज्यात पावसाचा प्रभाव कमी झालापुणे ः राज्यात गेल्या काही दिवस जोरदार पाऊस...
राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊसपुणे ः राज्यातील काही भागात पावसाने उघडीप दिली...
पीक विमा तक्रार निवारणासाठी कोठे जाल?राज्यात यंदा खरीप हंगामात उत्तम पेरा झाला होता....
राज्यात पावसाचा कमीअधिक जोर राहणारपुणे ः राज्यातील अनेक भागात पावसाने काहीशी उघडीप...
पणन सुधारणा कायदे शेतकरी हिताचेच!शेतीमालाच्या मार्केटमध्ये दराच्या बाबतीत कधीही...
रिसोर्स बॅंक ः स्तुत्य उपक्रमहवामान बदलाच्या चरम सीमेवर आता आपण आहोत. खरे तर...
कांदा दर नियंत्रणासाठी केंद्र सरकारचा...मुंबई : कांदा दर नियंत्रणासाठी केंद्र सरकारचा...
‘बायोमिक्स’ विक्रीतून कृषी विद्यापीठाला...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
जरासं पहा ना साहेब, पाणीच पाणी वावरात...परभणी ः सदोष बियाण्यांमुळे दुबार, तिबार पेरणी...
परतीचा मॉन्सून राज्यातून चार दिवसांत...पुणे ः परतीच्या पाऊस सुरू असताना बंगालच्या...
कृषी कायद्यांविरोधात पंजाबकडून स्वतंत्र...चंडीगड : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन...
खारपाणपट्ट्यातील समस्यांवर...दापुरा (ता. जि. अकोला) येथील स्वप्नील व संदीप या...
सुर्डीतील तरुणांनी तेरा पाझर तलावांना...वैराग, जि. सोलापूर ः ‘वॉटर कप’ स्पर्धेत राज्यात...
कापूस विक्रीसाठी नोंदणी थांबविलीजळगाव ः शासकीय केंद्रात कापूस विक्रीसाठी बाजार...
प्रयोगशील दुग्ध व्यवसायातून पुढारले...माळीसागज (जि. औरंगाबाद) गावात कोरडवाहू क्षेत्र...