agriculture news in Marathi heavy rain possibility in state from today Maharashtra | Agrowon

राज्यात आजपासून वादळी पावसाचा अंदाज

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 24 मार्च 2020

राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान असल्याने आज (ता. २४) दुपारनंतर आकाशात ढग दाटून येत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे.

पुणे: राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान असल्याने आज (ता. २४) दुपारनंतर आकाशात ढग दाटून येत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट होण्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे. राज्यात उन्हाचा चटका वाढला असून, कमाल तापमानातही वाढ होत आहे.

बंगालच्या उपसागरावरून होत असलेला बाष्पाचा पुरवठा, विदर्भापासून तमिळनाडूपर्यंत असलेली खंडित वाऱ्यांची स्थिती, यामुळे राज्यात वादळी पावसाची शक्यता आहे. अनेक भागांत जोरदार वारे, विजा, मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्रातील नगर, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, मराठवाड्यातील उस्मानाबाद, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत गारपीट होण्याचा इशारा आहे. तर विदर्भातही मेघगर्जना, विजांसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे.  

राज्याच्या तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. सोमवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे उच्चांकी ३८.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर, बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा ३५ ते ३६ अंशांदरम्यान असल्याने उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. अंशत: ढगाळ हवामानामुळे राज्याच्या उकाड्यात वाढ होऊन घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. पावसाळी वातावरणामुळे तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.

सोमवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे किमाल व किमान (कंसात) तापमान, (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३६.२ (१७.६), धुळे ३५.८ (१६.०), जळगाव ३६.४ (१७.०), कोल्हापूर ३६.७ (२१.९), महाबळेश्‍वर ३१.६ (१८.४), मालेगाव ३६.० (२१.२), नाशिक ३४.९ (१९.८), निफाड ३४.० (१३.२), सांगली ३७.८ (२०.६), सातारा ३६.६ (१८.५), सोलापूर ३८.१ (२१.५), अलिबाग २९.२ (२१.८), डहाणू ३१.५ (२३.०), सांताक्रूझ ३१.९ (२३.२), रत्नागिरी ३२.३ (२२.९), औरंगाबाद ३५.३ (२०.८), परभणी ३७.६ (१८.९), अकोला ३७.३ (१९.१), अमरावती ३६.६ (१९.६), बुलडाणा ३४.४ (२१.२), चंद्रपूर (२०.०), गोंदिया ३२.५ (१९.३), नागपूर ३६.५ (१६.५), वर्धा ३६.४ (१९.९).


इतर अॅग्रो विशेष
सक्रिय रुग्णांची संख्या घटली; एका...नवी दिल्ली : कोरोना महामारीविरूद्धच्या...
विदर्भात टोळधाडीची अस्तित्व कायमनागपूर : कृषी विभागाकडून टोळधाड नियंत्रणासाठी...
राज्यातील भाजीपाला लागवड खोळंबली कोल्हापूर: सध्याच्या स्थितीत भाजीपाल्याचे...
राज्यात देशी कोंबडी पिलांना मागणी वाढली नगर ः काही महिन्यांपूर्वी कोरोना आणि चिकनबाबत...
शेतकऱ्यांची खत विक्री दरात फसवणूक करू...बुलडाणा ः या खरीप हंगामात शेतकऱ्यांना रास्त...
राज्यात बेदाण्याचे सव्वा दोन लाख टन...सांगली : यंदा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर ‘कोरोना...
मॉन्सूनची आणखी प्रगती शक्यपुणे  : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) मजल...
राज्यात ५८२० पाणी वापर सोसायट्या स्थापन...पुणे  : राज्यातील विविध धरणांच्या क्षेत्रात...
राज्यात आजपासून वादळी पावसाची शक्यतापुणे  : राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक...
टोळधाडीचा राजस्थानमधील ९० हजार हेक्टरला...जयपूर, राजस्थान  ः राज्यातील २० जिल्ह्यांतील...
यंदा पायी वारी नाही; दशमीला पंढरीत...पुणे : आषाढी वारीची परंपरा जपण्यासाठी राज्य शासन...
अरबी समुद्रातून मॉन्सूनची पुढे चालपुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
राज्यात आजपासून पूर्वमोसमी पावसाची...पुणे  : राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक...
टोळधाडीच्या अस्तित्वाने विदर्भात पसरली...नागपूर   ः टोळधाड मध्यप्रदेशात...
दूध संघांना पेमेंट वाटप सुरुपुणे : राज्यातील दूध संघांनी शेतकऱ्यांना दिलेल्या...
वस्त्रोद्योग येतोय पूर्वपदावरजळगाव ः लॉकडाउनमुळे ठप्प असलेला देशातील...
नाशिक बाजार समिती पुन्हा सुरु;...नाशिक  : नाशिक बाजार समितीत दोन कोरोनाबाधित...
थेट पपई विक्रीतून मिळविला तिप्पट दर !परभणी ः कोरोनाच्या स्थितीमध्ये लॉकडाऊन व...
शेतमालाचे ऑनलाइन तारण कर्ज होणार उपलब्ध...मुंबई : टाळेबंदी कालावधीत शेतकऱ्यांना राज्य वखार...
अतिवृष्टी आणि अतिक्रमणामुळेच पूरस्थिती...मुंबई : अतिवृष्टी आणि अतिक्रमणामुळेच...