agriculture news in Marathi, heavy rain possibility from Thursday, Maharashtra | Agrowon

गुरुवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 23 जुलै 2019

पुणे: राज्याच्या बहुतांशी भागांत पावसाने उघडीप दिली आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे सरकण्याचे संकेत असल्याने गुरुवारपासून (ता. २५) राज्यात पाऊस जोर धरण्याची शक्यता आहे. आज (ता. २३) कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

पुणे: राज्याच्या बहुतांशी भागांत पावसाने उघडीप दिली आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे सरकण्याचे संकेत असल्याने गुरुवारपासून (ता. २५) राज्यात पाऊस जोर धरण्याची शक्यता आहे. आज (ता. २३) कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

सोमवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. तर उर्वरित राज्यात बहुतांशी ठिकाणी पावसाची उघडीप होती. तर दिवसभर ऊन सावल्यांचा खेळ सुरू होता. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेशात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मॉन्सून प्रवाह वाढल्याने दक्षिण भारतातील केरळ, कर्नाटक, तमिळनाडूच्या घाटमाथ्यावर पावसाने जोर धरला आहे. 

मॉन्सूनचा आस बुधवारपर्यंत (ता. २४) दक्षिणेकडे सरकणार आहे, तसेच त्याची तीव्रताही वाढण्याचे संकेत असल्याने गुरुवारपासून (ता. २५) कोकण, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मराठवाडा आणि विदर्भातही अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

सोमवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत - हवामान विभाग) :कोकण : देवगड, रत्नागिरी प्रत्येकी ८०, लांजा ७०, सावंतवाडी, कणकवली प्रत्येकी ५०, कुलाबा, वाडा, मालवण, वैभववाडी, वेंगुर्ला प्रत्येकी ४०, राजापूर, हर्णे, चिपळून, कुडाळ, शहापूर प्रत्येकी ३०. 
मध्य महाराष्ट्र : महाबळेश्वर ६०, गगणबावडा ५०, चंदगड, पेठ, वेल्हे प्रत्येकी ४०, कागल, शिरोळ, हातकणंगले, धरणगाव प्रत्येकी ३०, कोल्हापूर, सातारा, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, खेड, घोडगाव प्रत्येकी २०.
विदर्भ : वर्धा, देवळी प्रत्येकी २०, बार्शी टाकळी, अंजणगाव प्रत्येकी १०.
घाटमाथा : कोयना नवजा ७०, आंबोणे, शिरगाव प्रत्यकी २०. 

इतर अॅग्रो विशेष
शेतात पिकवा ‘हिरवे सोने’केंद्र शासनाने ‘राष्ट्रीय बांबू मिशन’ची स्थापना...
‘पंचनामा’ पूरग्रस्त पशुधनाचाको ल्हापूर, सांगली, सातारा या भागांतील पूर जसजसा...
आले पिकाने दिली आर्थिक सक्षमता बुलडाणा जिल्ह्यात खल्याळ गव्हाण येथील दिनकर व...
क्षारयुक्त जमिनीत एकात्मिक शेतीचा आदर्श बारामती तालुक्यातील मळद (जि. पुणे) येथील प्रशांत...
पूरग्रस्तांना एक हेक्टरसाठी मिळणार...मुंबई : राज्यात विविध भागांत आलेल्या...
राज्याचा पाणीसाठा ६१ टक्क्यांवर;...पुणे : जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला...
‘दावणीची दौलत’ चाऱ्याअभावी खचली; दक्षिण...कोल्हापूर/ सांगली : बारमाही पाण्याने भरलेल्या...
विदर्भ, कोकणात पावसाची शक्यतापुणे : पावसाने उघडीप दिल्याने राज्याच्या तापमानात...
पूरग्रस्त भागात जनावरांना न्यूमोनिया, ...पुणे : सततचा पाऊस आणि पुराच्या पाण्यात भिजल्याने...
पुरग्रस्त भागातील एक हेक्टरवरील...मुंबई : पुरग्रस्त भागातील एक हेक्टरवरील नुकसानावर...
अण्वस्त्रांविषयी वाचाळता कशासाठी? अण्वस्त्रांचा प्रथम वापर न करण्याच्या (नो फर्स्ट...
कृषी परिवर्तनाची नांदीनरेंद्र मोदी यांनी आपल्या पंतप्रधान पदाच्या...
कृषी ‘एमएस्सी’ प्रवेशात भेदभाव नको:...पुणे  : गुणवत्ता यादीत असूनही पदव्युत्तर (...
जमीन मोजणीच्या नोटिसा झाल्या डिजिटल पुणे : राज्यातील तलाठी कार्यालयांकडील जमीन...
सांगलीच्या दुष्काळी पट्ट्यात...सांगली ः जिल्ह्यातील आटपाडी, कवठेमहांकाळ आणि जत...
महापुराच्या पाण्याने कृष्णा-कोयनेचा...कऱ्हाड, जि. सातारा : कृष्णा-कोयना नद्यांना...
पन्नास हजारांवर पशुधन डोळ्यांदेखत गेले...कोल्हापूर/सांगली : शेतकऱ्यांच्या ...
सांगली : पूरबाधीत सहकारी सोसायट्यांना ‘...सांगली ः ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे : पावसाने काहीशी उघडीप दिल्याने राज्यात...
कृत्रिम पावसाच्या नुसत्याच अवकाशात...सोलापूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना...