वादळी पावसाचा आजपासून इशारा

हवामान अंदाज
हवामान अंदाज

पुणे: तापमानाचा पारा तिशीपार गेला असल्याने ऑक्टोबर हिटचा चटका वाढला आहे. राज्यात पावसाला पोषक हवामान झाल्याने आजपासून (ता. ५) कोकण, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांसह वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तविला आहे. शुक्रवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक ३४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र पूर्वेकडे सरकून गेल्यानंतर राजस्थानमधून मॉन्सूनची परतीची वाटचाल सुरू होण्यास अनुकूल स्थिती तयार होत आहे. सोमवारपासून (ता. ७) राजस्थानमध्ये हवामान कोरडे होणार असून, या भागातून १० ऑक्टोबर रोजी मॉन्सून परतीचा प्रवास सुरू करण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.  शुक्रवारी (ता. ४) दुपारनंतर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात ढगांची दाटी झाली होती. पुणे शहर, जुन्नर तालुक्यांसह जिल्ह्याच्या विविध भागात दुपारनंतर जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. आज (ता. ५) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जना, विजांसह वादळी पावसाचा इशाराही हवामान विभागो दिला आहे.

शुक्रवारी (ता. ४) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३१.१ (०.३), जळगाव ३३.७(-०.९), कोल्हापूर ३१.२(०.८), महाबळेश्वर २३.९ (-०.७), मालेगाव ३३.० (०.२), नाशिक ३०.७ (-०.९), सांगली ३१.३ (-०.६), सातारा ३०.९ (१.०), सोलापूर ३४.० (१.७), अलिबाग ३१.० (-०.२), डहाणू ३२.३ (०.४), सांताक्रूझ ३२.४ (०.४), रत्नागिरी ३२.५ (१.९), औरंगाबाद ३०.७ (-०.९), परभणी ३३.४ (०.७), नांदेड ३३.० (-०.६), अकोला ३४.० (०.३), अमरावती ३२.८ (-०.९), बुलडाणा ३०.६ (०.०), ब्रह्मपुरी ३४.२ (१.७), चंद्रपूर ३३.८(०.६), गोंदिया ३२.२(-०.६), नागपूर ३३.८ (०.७), वर्धा ३२.२ (-०.८), यवतमाळ ३२.०(०.०).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com