विदर्भात जोरदार सरींची शक्यता 

मॉन्सूनच्या पावसाने राज्याच्या बहुतांशी भागात उघडीप दिली आहे. राज्यात ढगाळ आकाश, कोरड्या हवामानासह उकाड्यात वाढ झाली आहे.
heavy rain possibility in Vidarbha
heavy rain possibility in Vidarbha

पुणे : मॉन्सूनच्या पावसाने राज्याच्या बहुतांशी भागात उघडीप दिली आहे. राज्यात ढगाळ आकाश, कोरड्या हवामानासह उकाड्यात वाढ झाली आहे. आज (ता. २२) विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची जोरदार सरींची शक्यता आहे. तर कोकण आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अदांज हवामान विभागाने वर्तविला आहे.  गेल्या तीन दिवसांपासून राज्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याचे चित्र आहे. यातच उन्हाचा चटकाही काहीसा वाढला आहे. पंजाबपासून बंगालच्या उपसागरापर्यंत असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे सरकण्याची शक्यता आहे. ओडिशा आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत. ही स्थिती पूरक ठरल्याने पूर्वेकडून वारे वाहणार असल्याने बंगालच्या उपसागरावरून बाष्पाचा पुरवठा होणार आहे. त्यामुळे आजपासून पूर्व आणि मध्य भारतात पाऊस जोर धरण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी पडणार आहेत. 

दरम्यान, अरबी समुद्रात ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याने मासेमारीसाठी न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.  रविवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील कल्याण येथे २५ मिलिमीटर, मराठवाड्यातील कळमनुरी येथे २२ मिलिमीटर, मंथा ३४, चाकूर ३२, नांदेड २८, मानवत ४८, सेलू ३६ तर सोनपेठ येथे २६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर उर्वरीत राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानसह तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडल्या.  मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक स्थिती  नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची उत्तरेकडील राज्यांमधील वाटचाल काहीशी रेंगाळली आहे. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील वाटचाल सहा दिवसांपासून, तर गुजरातमधील मॉन्सूनची वाटचाल आठवडाभरापासून जैसे थे आहे. मॉन्सूनच्या प्रगतीस पोषक हवामान होत असल्याने उद्यापर्यंत (ता. २३) मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशच्या आणखी काही भागांसह उत्तराखंड राज्याच्या काही भागांत मॉन्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com