agriculture news in Marathi heavy rain possiblity in Kokan and central Maharashtra | Agrowon

कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 27 जुलै 2021

बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागात चक्रिय स्थिती तयार होत आहे. त्यामुळे पावसासाठी पोषक स्थिती तयार होत आहे. राज्यातील काही भागांत पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे.

पुणे : बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागात चक्रिय स्थिती तयार होत आहे. त्यामुळे पावसासाठी पोषक स्थिती तयार होत आहे. राज्यातील काही भागांत पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे. संपूर्ण कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून गुरुवारपासून मुसळधार पाऊस पडेल. विदर्भातही पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला. 

बंगालच्या उपसागरात बुधवारी (ता.२८) कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढणार आहे. त्यामुळे अरबी समुद्राकडून बाष्प पूर्व भागाकडे खेचले जाण्याची शक्यता आहे. सध्या या भागात चक्रिय स्थिती असून ही स्थिती समुद्रसपाटीपासून १.५ किलोमीटर आणि ५.८ किलोमीटर उंचीवर आहे. तसेच कर्नाटक किनारपट्टी ते केरळ दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. उत्तर भारतात मॉन्सूनचा ट्रफ गंगानगर, हिस्सार, दिल्ली, अलिगड, फुरसतगंज, गया, बंकुरा ते बंगाल उपसागराचा वायव्य भागापर्यंत सक्रिय आहे. पुढील चार ते पाच दिवस रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार पाऊस पडेल. 

सध्या राज्यातील पावसाचा जोर ओसरला आहे. मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, खानदेश भागात पावसाच्या तुरळक सरी बरसत आहेत. काही ठिकाणी अधूनमधून ऊन पडत आहे. कमाल तापमानासह किमान तापमानात चांगलीच घट झाली आहे. मध्य महाराष्ट्र व विदर्भातील कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत चार अंश सेल्सिअसने घट झाली आहे. सोमवारी (ता.२६) सकाळी आठ वाजेपर्यंत चंद्रपूर येथे ३३.८ अंश सेल्सिअसची सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली. 

येथे होणार जोरदार पाऊस 
मंगळवार ः
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, संपूर्ण विदर्भ 
बुधवार ः रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, संपूर्ण विदर्भ 
गुरुवार ः ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर संपूर्ण विदर्भ 
शुक्रवार ः ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर संपूर्ण विदर्भ 
--------------------------------------------------- 
राज्यातील प्रमुख शहरांमध्ये सोमवारी (ता.२६) सकाळी आठ वाजेपर्यंत नोंदवले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) कंसात सरासरीच्या तुलनेत झालेली वाढ : 

 • पुणे - २७.६ (०.२) 
 • जळगाव - २८.६ (-२.७) 
 • कोल्हापूर - २८.० (१.८) 
 • महाबळेश्वर - १९.८ (०.२) 
 • मालेगाव - ३०.४ (०.४) 
 • नाशिक - २६.० (-१.४) 
 • सांगली - २४.२ (-४.५) 
 • सातारा - २७.० ( ०.८) 
 • सोलापूर - ३२.८ (१.७) 
 • मुंबई (कुलाबा) - ३०.४ (०.६) 
 • अलिबाग - ३०.५ (०.८) 
 • रत्नागिरी - २९.३ (०.९) 
 • डहाणू - ३१.२ (०.९) 
 • औरंगाबाद - २७.३ (-१.७) 
 • परभणी - ३०.७ 
 • नांदेड- ३२.० (०.७) 
 • अकोला - २९.५ (-१.३), 
 • अमरावती - २७.८ (-२.२) 
 • बुलडाणा - २९.६ (१.८) 
 • ब्रम्हपुरी - ३२.८ (२.६) 
 • चंद्रपूर - ३३.८ (२.८) 
 • गोंदिया - ३१.२ (०.२) 
 • नागपूर - ३१.८ (१.२) 
 • वर्धा - ३०.० (-०.३) 
   

इतर बातम्या
बंगालच्या उपसागरात घोंघावतेय चक्रीवादळपुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
बांगलादेशला रेल्वेद्वारे होणार संत्रा...नागपूर : किसान रेल्वेच्या माध्यमातून संत्रा...
‘गोकुळ’तर्फे दुभत्या जनावरांना लाखाचा...कोल्हापूर : दुभत्या जनावरांचा कोणत्याही आजाराने...
पितृपक्षामुळे सुकामेव्याला मागणी वाढलीपुणे : पितृपक्षाला प्रारंभ झाल्यानंतर काही...
साखर दरवाढीची गोडी कायमकोल्हापूर : गेल्या महिन्यापासून साखर दरात आलेल्या...
राज्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारापुणे : राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी...
सार्वजनिक पाणीपुरवठा, पथदिव्यांची  ५६...कोल्हापूर : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील...
पुणे जिल्ह्यात  पावसाची उघडीप पुणे : पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने अनेक...
यंदा भाताचे उत्पादन वाढण्याची शक्यताकोल्हापूर : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा देशात...
शेतीला सोलर कुंपण घाला यवतमाळ : वन्य प्राण्यांमुळे ज्या भागात नियमितपणे...
सततच्या पावसामुळे  रिसोडमध्ये सोयाबीन...रिसोड, जि. वाशीम : तालुक्यात २० सप्टेंबरपासून सतत...
प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ मिळाले,...औरंगाबाद : गतवर्षीच्या रब्बी हंगामात आयोजित...
  सांगली जिल्हा बँकेच्या  चौकशीला...सागंली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सहकार कायदा...
खरीप हंगाम काढणीवर  पावसाचे गडद सावट नांदुरा, जि. वाशीम : खरीप हंगामातील पिके...
४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे आज...औरंगाबाद : ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे...
खानदेशात प्रशासनाकडून रब्बीतील पीककर्ज...जळगाव  : खानदेशात रब्बी पीककर्ज वितरणाची...
मराठवाड्यात पावसाचा जोर औरंगाबाद : मराठवाड्यात गुरुवारी (ता. २३)...
जळगाव जिल्ह्यास पावसाने झोडपलेजळगाव  : जिल्ह्यात गुरुवारी (ता.२३) अनेक...
तडवळेत जोरदार पावसामुळे सोयाबीन...कसबे तडवळे, जि. उस्मानाबाद : परिसरात गेल्या चार...
परभणी, हिंगोलीत पावसाने सोयाबीनला फुटले...परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचा कहर सुरु...