agriculture news in Marathi heavy rain prediction form Thursday Maharashtra | Agrowon

गुरुवारपासून पाऊस वाढणार 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 4 मे 2021

मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात गेल्या तीन दिवसांपासून चक्रिय वाऱ्याची स्थिती आहे. यामुळे पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे.

पुणे : मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात गेल्या तीन दिवसांपासून चक्रिय वाऱ्याची स्थिती आहे. यामुळे पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. आज (ता.४) आणि उद्या (ता.५) पावसाची काहीशी उघडीप राहणार असून उन्हाचा चटका वाढेल. मात्र, गुरुवारपासून पुन्हा तुरळक ठिकाणी वादळ, विजांच्या कडकडाट व गारपीटीसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला. 

राज्यात दिवसभर उन्हाचा चटका आणि दुपारनंतर ढगाळ वातावरण अशी काहीशी स्थिती राहत आहे. मध्यरात्रीनंतर पुन्हा हवेत गारवा तयार होत असल्याने किमान तापमानात किंचित घट होत आहे. मागील दोन दिवसांत राज्यातील सर्वच भागांत ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत तीने अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली आहे. विदर्भातही पारा चांगलाच घटल्याने कमाल तापमानात पुन्हा चांगलीच घसरण झाली आहे. सोमवारी (ता. ३) सकाळी चोवीस तासांत विदर्भातील चंद्रपूर येथे सर्वाधिक ४१.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंदविले गेले. 

गेल्या तीन ते चार दिवसांपासून कोमोरीन परिसर व दक्षिण तमिळनाडू परिसरात चक्रिय वाऱ्याची स्थिती सक्रिय आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून नऊशे मीटर उंचीवर आहे. तसेच मध्य प्रदेश व परिसरात व वायव्य भागात चक्रिय वाऱ्याची स्थिती आहे. तर मध्य प्रदेशचा वायव्य भाग ते मणिपूर या दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. याशिवाय उत्तर कर्नाटक ते कोमोरिन परिसर, दक्षिण तमिळनाडू दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राच्या दिशेने भूपृष्टावर येत आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व विदर्भ काही ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरणाची स्थिती आहे. त्यामुळे मराठवाडा व मध्य महाराष्ट्राच्या अनेक भागात गारपीटीसह जोरदार पाऊस पडत आहे. 

राज्यात या जिल्ह्यांमध्ये होणार पूर्वमोसमी पाऊस 
मंगळवार ः
सिंधुदुर्ग, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, उस्मानाबाद. 
गुरुवार ः सिंधुदुर्ग, धुळे, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, संपूर्ण विदर्भ. 
शुक्रवार ः संपूर्ण महाराष्ट्र. 

सोमवारी (ता.३) सकाळपर्यंतच्या २४ तासात विविध शहरातील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) 

 • मुंबई (सांताक्रुझ) ३४.५ 
 • अलिबाग ३४.६ 
 • रत्नागिरी ३४.३ 
 • डहाणू ३४.३ 
 • पुणे ३६.२ 
 • जळगाव ४०.० 
 • कोल्हापूर ३५.६ 
 • महाबळेश्वर ३१.५ 
 • नाशिक ३५.८ 
 • सांगली ३६.८ 
 • सातारा ३७.१ 
 • सोलापूर ३८.० 
 • औरंगाबाद ३७.८ 
 • परभणी ३७.९ 
 • नांदेड ३९.० 
 • अकोला ३८.५ 
 • अमरावती ३६.२ 
 • बुलडाणा ३८.० 
 • ब्रम्हपुरी ३५.५ 
 • चंद्रपूर ४१.८ 
 • गोंदिया ३७.५ 
 • नागपूर ३७.० 
 • वर्धा ३७.८ 
   

इतर अॅग्रो विशेष
वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा पुणे : अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या ‘तौत्के’...
पावसासाठी पोषक वातावरण पुणे : चक्रीवादळामुळे पश्‍चिम महाराष्ट्रात वेगाने...
पश्‍चिम महाराष्ट्रातही पाऊस पुणे ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा फटका पुणे, कोल्हापूर...
विदर्भ, मराठवाड्यात पाऊसअमरावती/औरंगाबाद : ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे विदर्भ...
कापूस बियाणे विक्री २० मेपासून करा : ‘...नागपूर : विदर्भ, खानदेश विभागांत शेजारच्या...
कोकण किनारपट्टीला चक्रीवादळाचा दणका रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा...
तूर, मूग, उडदाची आयात खुली नागपूर : केंद्र सरकारने हंगामापूर्वी तूर, उडीद...
धूळवाफ पेरणीत लॉकडाउनचा खोडा सांगली ः शिराळा तालुक्यात वारंवार झालेल्या...
सिक्कीमचे ‘टेरेस फार्मिंग’ ठरतेय वरदानआशिया खंडामधील आनंदी नागरिकांचा देश म्हणजे भूतान...
पश्‍चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण पुणे : अरबी समुद्रात तयार झालेल्या ताऊते या...
रासायनिक खतांच्या किमतीत मोठी वाढ पुणे ः केंद्र सरकारने रासायनिक खतांची दरवाढ...
लॉकडाउमुळे बेदाणा उत्पादकांची कोंडी सांगली ः जिल्ह्यातील तासगाव आणि सांगली बाजार...
नामपूर बाजार समितीत कांद्याला किमान दर...नाशिक : सोमवारी (ता. १०) सटाणा तालुक्यातील नामपूर...
खरिपात यंदा कपाशी, रब्बीत गहू चांगले...भेंडवळ, जि. बुलडाणा ः या हंगामात सर्वसाधारण...
विमा कंपन्यांनी गोळा केले २३ हजार कोटी...पुणे ः नैसर्गिक आपत्तीपासून शेतकऱ्यांना आधार...
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलसचिव...नगर : कामात अनियमिततेच्या कारणाने महात्मा फुले...
निर्यात केंद्रामुळे कृषी व्यापाराला...पुणे ः मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड...
ढगाळ हवामान, पावसाची शक्यतामहाराष्ट्रावरील हवेचा दाब १००२ हेप्टापास्कल इतके...
कोकणातील शेतीला नव्या संधींची दिशादापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
मुसळधार पावसाचा अंदाज पुणे : अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राची...