agriculture news in Marathi, heavy rain prediction in Kokan and Central Maharashtra, Maharashtra | Agrowon

कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

पुणे ः बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र पुन्हा तयार होत असल्याने राज्यात रविवारपासून पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे. गुजरात ते झारखंडदरम्यान कमी दाबाचे क्षेत्र आहे. तर बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होत असून, ती राजस्थानच्या दिशेने सरकत आहे. त्यामुळे आज (ता. २) मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मध्यम ते जोरदार पाऊस पडेल. मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे. 

पुणे ः बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र पुन्हा तयार होत असल्याने राज्यात रविवारपासून पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे. गुजरात ते झारखंडदरम्यान कमी दाबाचे क्षेत्र आहे. तर बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होत असून, ती राजस्थानच्या दिशेने सरकत आहे. त्यामुळे आज (ता. २) मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मध्यम ते जोरदार पाऊस पडेल. मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे. 

अरबी समुद्र, कोकण आणि गोवा या परिसरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात धुवाधार पाऊस पडला. खान्देशातील भुसावळ येथे राज्यातील सर्वाधिक २८० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. 
राधानगरी, गंगापूर ३०१८ क्सुसेक, दारणा १३ हजार ५८ क्युसेक, येडगाव, चासकमान, खडकवासला, कन्हेर, तारळी ही धरणे भरली असून विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे गोदावरी, मुळा मुठा, कृष्णा, वारणा, पंचगंगा, दूधगंगा, वेधगंगा, कुंभी, कासारी या नद्या दुथडी भरून वाहत असून उजनी, जायकवाडी, कोयना या धरणातील पाणीपातळीत वाढ होत आहे.

उत्तर भारतातील मध्य प्रदेश, मणिपूर, आसाम, मेघालय, गुजरात, दिल्ली, हिमाचल प्रदेश या राज्याच्या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र आहे. यामुळे या भागात मुसळधार पाऊस पडत आहे. तर बरोडा येथे देशातील उच्चांकी ५६० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. माउंट अबू, इटानगर, गुवाहटी, सोहरा, मजबेत या ठिकाणी जोरदार पाऊस पडला आहे. त्याचा काहीसा परिणाम महाराष्ट्रावर होत असून राज्यातील अनेक भागांत जोरदार पाऊस पडत आहे.  

गेल्या आठ दिवसांपासून कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे या जिल्ह्यांतील बहुतांशी भागांत पावसाचा जोर कायम आहे. कोकणातील जव्हार येथे सर्वाधिक पाऊस पडला असून मोखेडा, मालवण, पोलादपूर, विक्रमगड, सुधागड, संगमेश्वर देवरूख, खेड, महाड, तला, रोहा, मंडणगड, खालापूर, पेण येथे जोरदार सरी कोसळल्या आहेत. 

मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी अधिक आहे. नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक या जिल्ह्यांच्या पश्चिम पट्ट्यात पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. तर पूर्वेकडील भागात अधूनमधून सरी पडत आहेत. साताऱ्यातील महाबळेश्वरमध्ये सर्वाधिक २००, तर कोल्हापुरातील गगनबावडा, १५०, राधानगरी १२०, धुळे जिल्ह्यातील नवापूर ११० येथे मिलिमीटर पाऊस पडला. 

मराठवाड्यात पावसाचा जोर कमी असून अनेक भागांत ढगाळ हवामान आहे. तर सोयगाव, कन्नड, मुखेड, सिल्लोड, गंगापूर या ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडल्या. विदर्भातही तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. तर अर्जुनी मोरगाव, जळगाव जामोद, कोरची, साकोळी, बार्शीटाकळी, मलकापूर, कुरखेडा, धानोरा, अकोला, संग्रामपूर, इटापल्ली, करंजलाड येथे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला.  

गुरुवारी (ता. १) सकाळी साडेआठपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये ः (स्रोत - हवामान विभाग)
कोकण ः जव्हार १४० मोखेडा, मालवण १२०, पोलादपूर, विक्रमगड, सुधागड ९०, संगमेश्वर देवरूख ८०, खेड, महाड, तला, रोहा, मंडणगड, खालापूर, पेण ७०, वाडा, शहापूर, मानगाव ६०, चिपळून, राजापूर, वैभववाडी, उल्हासनगर, अंबरनाथ, तलासरी ५०, भिरा, मुरबा, म्हसळा, कर्जत ४०, ठाणे, कनकवली, रत्नागिरी, माथेरान, भिवंडी, रत्नागिरी, श्रीवर्धन ३०, गुहागर, पालघर, वसई, कुडाळ, सिंधुदूर्ग, मुरूड, अलिबाग २०.
 
मध्य महाराष्ट्र ः भुसावळ २८०, महाबळेश्वर २००, गगनबावडा १५०, राधानगरी १२०, नवापूर ११०, जावळी मेढा, इगतपुरी १००, शाहूवाडी, पाटम ८०, हातकणंगले, पौड, त्र्यंबकेश्वर, शहादा ७०, सुरगाना, कागल, पन्हाळा ६०, शिरोळ, नंदुरबार, पेठ, शिरोळा, खेड, राजगुरूनगर, शिरपूर, कोल्हापूर ५०, खेड, ओझरखेडा, हरसूल, गिधाडे, गारगोटी, मुक्ताईनगर, तळोदा, चांदगड ४०, अक्कलकुवा, सिंधखेडा, भोर, वळवा, आजरा, कोरेगाव, रावेर, देवळा ३०, अंमळनेर, मिरज, कडेगाव, बोदवड, घडगाव, आंबेगाव, सिन्नर, पारोळा, संगमनेर, पलूस, यावल, एरंडोल, गडहिग्लज, कराड, वाई, दिंडोरी, नाशिक, जळगाव २०. 

मराठवाडा ः सोयगाव ३०, कन्नड, मुखेड, सिल्लोड, गंगापूर १०. 

विदर्भ ः अर्जुनी मोरगाव, जळगाव जामोद, कोरची, साकोळी ४०, बार्शीटाकळी, मलकापूर, कुरखेडा, धानोरा, अकोला, संग्रामपूर, इटापल्ली, करंजलाड ३०, लाखापूर, शेगाव, सावली, शिंदेवाही, खामगाव, नांदुरा, बाळापूर, सडकअर्जुनी, पांढरीकेवरा, देवरी, समुद्रपूर, गडचिरोली, पातूर, चिखलदा, मारेगाव, नांदगावकाझी, गोंदिया, मुळचेरा, देसाईगंज, चार्मोशी, लाखणी, तेल्हारा २०.

घाटमाथा ः शिरगाव २३०,कोयना (नवजा) २१०, दावडी १५०, ताम्हिणी १२०, अंबोने, डुंगरवाडी, कोयना ११०, खांड ९०, भिरा ७०, शिरोटा, ठाकूरवाडी, वळवळ, खोपोली ५०, वानगाव ४०.


इतर अॅग्रो विशेष
बदल ठरावेत लाभदायकयवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील हजारो...
हवामान बदल हेच सर्वांत मोठे आव्हानआ ज जगभरात हवामान बदल आणि त्याचे होणारे परिणाम हा...
महिनाभरात पडणार नाशिक विभागातील साखर...नगर ः नगर, नाशिक जिल्ह्यामध्ये यंदा ३२ पैकी केवळ...
महिलांनी मालक बनले पाहिजे ः राज्यपालमुंबई ः महालक्ष्मी सरस प्रदर्शनातून महिलांचे...
कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांसाठी...मुंबई ः दोन लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी...
ग्रामीण कुटुंबांचे उत्पन्न का वाढत नाही...पुणे: देशात ५० टक्के रोजगार हा शेतीशी निगडित व...
नागपूर : थंडीची तीव्रता वाढली; अंडी...नागपूर ः थंडीच्या दिवसांत मागणी वाढत अंड्यांचे...
निफाडला २.४ अंश तापमान; राज्य थंडीने...पुणे : उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांच्या...
शेतात नवे प्रयोग करणारे शेतकरी आमचे...मुंबई ः प्रत्यक्ष शेतात राबून नवनवीन प्रयोग...
चिखलदऱ्याच्या स्ट्राॅबेरीला हवाय...अमरावती ः लागवड खर्चाच्या दुप्पट उत्पन्न मिळवून...
मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत १८ लाख टन...औरंगाबाद: मराठवाड्यातील औरंगाबाद साखर सहसंचालक...
कमी खर्चातील गांडूळखतनिर्मिती तंत्राचा...अंबेजोगाई (जि. बीड) येथील शिवाजी खोगरे यांनी कमी...
आरोग्यदायी अन्ननिर्मितीबरोबरच जपली...धानोरा- भोगाव (जि. हिंगोली) येथील दादाराव राऊत आठ...
पशुधन विकासाची वसाहत वाटपशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभागाची...
रस्ते की मृत्यूचे सापळेआपला देश संपूर्ण विश्वात रस्ते अपघातात अव्वल आहे...
फलोत्पादन योजनांमध्ये बदलास केंद्र तयार पुणे: “फलोत्पादनातील उत्पन्नवाढीसाठी सध्याच्या...
शेतीसाठी आवश्‍यक ते सर्वकाही करणार :...माळेगाव, जि. पुणे ः कमी पाणी व कमी जागेत अधिक...
कलिंगड शेती ठरते आहे फायदेशीरअकोला ः मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन परिसरात...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात थंडी पुणे ः राज्यातील थंडीत चढउतार सुरू आहे. मध्य...
हमीभावाच्या संदर्भात वायदे बाजारावरही...लातूर : हमीभावापेक्षा कमी दराने शेतीमाल खरेदी...