खत उत्पादन उद्योगाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या फर्टिलायजर्स असोसिएशन ऑफ इंडिया (एफएआय)ने केंद
अॅग्रो विशेष
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर आज कायम राहणार
अरबी समुद्रावरून वाहत असलेले वेगवान वारे, बंगालच्या उपसागरात तयार होत असलेले कमी दाबाचे क्षेत्र आणि मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबचा पट्टा पाेषक ठरत असल्याने कोकण, मध्य महाराष्ट्राला पावसाने दणका दिला आहे. आज (ता.५) कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहणार आहे. तर विदर्भात उद्यापासून (ता.६) पावसाचा जोर वाढण्याचा, तर मराठवाड्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

रविवारी (ता.४) सकाळपर्यंत ३०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडलेली ठिकाणे :
पेण ४५०, अलिबाग ४१०, ताम्हिणी ४१०, दावडी ४००, शिरगाव ३९०, ठाणे ३७०, बेलापूर ३४०, लोणावळा ३४०, डुंगरवाडी ३४०, अंबोणे ३३०, कल्याण ३१०, विक्रमगड ३१०, वाडा ३१०.
- 1 of 434
- ››