agriculture news in Marathi heavy rain prediction in Kokan and Vidarbha Maharashtra | Agrowon

कोकण, विदर्भात मुसळधारेचा इशारा 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 12 ऑगस्ट 2020

मध्य प्रदेश व परिसराच्या वायव्य भागात कमी दाबाचे क्षेत्र असून त्याचे चक्राकार वाऱ्यांमध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यातील बहुतांशी भागात ढगाळ हवामान आहे. 

पुणे ः मध्य प्रदेश व परिसराच्या वायव्य भागात कमी दाबाचे क्षेत्र असून त्याचे चक्राकार वाऱ्यांमध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यातील बहुतांशी भागात ढगाळ हवामान आहे. येत्या रविवार (ता. १६) पर्यंत कोकण व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधारेचा इशारा देण्यात आला आहे. तर अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातही हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सुत्रांनी वर्तविला आहे. 

बंगालचा नैऋत्य भाग आणि तमिळनाडू या परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर आहे. उत्तर प्रदेशचा नैऋत्य भाग ते दक्षिण छत्तीसगड ते मध्य प्रदेश या भागात कमी दाबाचा पट्टा आहे. हा पट्टा समुद्रसपाटीपासून १.५ ते २.१ किलोमीटर उंचीवर आहे. याशिवाय आसामच्या पूर्व भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती असून ती समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे.

तर बंगालच्या उपसागराच्या वायव्ये भागात गुरूवारी (ता.१३) पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. तसेच कर्नाटक ते लक्षद्वीप या दरम्यान कमी दाबाचा पट्टा आहे. उत्तर भारतात दाखल झालेल्या मॉन्सूनचा आस बिकानेर, सिकर, ग्वाल्हेर, सिधी, देहरी, धनबाद, कलकत्ता ते बंगाल उपसागरच्या ईशान्य भागापर्यत आहे. हा आस समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे. त्यामुळे मॉन्सून पुन्हा सक्रिय झाला असून पावसाचा जोर वाढला आहे. 

सध्या कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात पावसासाठी पोषक वातावरण आहे. पुढील चार ते पाच दिवस मराठवाडा व मध्य महाराष्ट्राच्या पूर्व भागात हलक्या सरी बरसतील. कोकण, विदर्भात वार्यासह जोरदार पाऊस पडेल. तर घाटमाथ्यावरही जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल. गुरूवारी व शुक्रवारी मध्य महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. पुणे परिसरातही सोमवारपर्यंत (ता.१७) हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. 
 


इतर अॅग्रो विशेष
लेखाजोखा मोदी सरकारचा! पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे ७२ महिने पूर्ण...
झळाळी पिवळ्या सोन्याची!मराठवाडा, विदर्भाच्या काळ्या मातीत कापूस हे पीक...
कृषी, पणन कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत...पुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर केलेल्या कृषी...
सोयाबीनची उद्यापासून ऑनलाइन नोंदणीमुंबई : खरीप हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत...
हमीभावाने उडीद खरेदीही उद्यापासूनमुंबई : हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत किंमत...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची...पुणे : गेल्या काही दिवसापासून पावसाने...
राहुरी विद्यापीठाच्या बदली सत्रात...पुणे : महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठात...
परतीचा मॉन्सून उद्या काही भागातून पुढे...पुणे: परतीच्या मार्गावर दोन दिवसापूर्वी निघालेला...
दूध वाहतुकीसाठी रेड्याचा वापर !...वाशीम: काळ बदलला...सोयी सुविधा निर्माण झाल्या......
ऊस तोडणी यंत्र अनुदानालाच खो; तीन...कोल्हापूर : संभाव्य मजूरटंचाईच्या पार्श्वभूमीवर...
नंदुरबारच्या मिरचीला अतिपावसाचा फटका;...नंदुरबार : जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या मिरची...
एकत्रित शेतीला यांत्रिकीकरणाची जोडअल्पभूधारकांप्रमाणे मोठ्या क्षेत्रावरील...
व्यापक धोरणात श्रमिकांचा काय फायदा? चार सप्टेंबर २०२० रोजी राज्य शासनाने...
आव्हानात्मक गळीत हंगाममहाराष्ट्रातील ऊस गाळप हंगाम अगदी तोंडावर येऊन...
साखर कामगारांचा संपाचा इशारा  पुणे/कोल्हापूर  ः गळीत हंगाम सुरू होण्यासाठी...
मॉन्सून परतीवर पुणे ः गेल्या तीन महिन्यांपूर्वी पश्चिम...
मराठवाड्यातील ४८६ प्रकल्पांत ७५...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७६ प्रकल्पांपैकी ४८६...
अकरा सोयाबीन बियाणे कंपन्यांचे परवाने...पुणे: राज्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनचे गुणवत्ताहिन...
नगर जिल्ह्यातील धरणे तुडूंबनगर ः दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या आणि पाणी...
खानदेशातील प्रकल्पांतून पाणी विसर्गात घटजळगाव ः गेले चार दिवस खानदेशात अपवाद वगळता जोरदार...