कोकण, घाटमाथा, विदर्भात अतिवृष्टीचा इशारा 

बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे मॉन्सून सक्रिय झाल्याने राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. कोकण, घाटमाथा, विदर्भात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
कोकण, घाटमाथा, विदर्भात अतिवृष्टीचा इशारा 
कोकण, घाटमाथा, विदर्भात अतिवृष्टीचा इशारा 

पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे मॉन्सून सक्रिय झाल्याने राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. कोकण, घाटमाथा, विदर्भात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे. 

मॉन्सनने गुरुवारी (ता. १०) संपूर्ण राज्य व्यापले. नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) यंदा पाच दिवस आधीच संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असून मुंबईसह कोकण, विदर्भात पावसाने जोर धरला असला तरी उर्वरित राज्यात जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. ओडिशा आणि पश्‍चिम बंगाल लगतच्या समुद्रात कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. तर अरबी समुद्राच्या मध्य भागात असलेल्या चक्राकार वाऱ्यांपासून कोकणापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा (द्रोणीय स्थिती) सक्रिय आहे. ही स्थिती पूरक ठरल्याने राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे तापमानात चांगलीच घट झाली आहे. शनिवारी (ता.१२) सकाळच्या आठ वाजेपर्यंत खानदेशातील जळगाव येथे ३६.६ अंश सेल्सिअसची सर्वात कमी कमाल तापमानाची नोंद झाली.  बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे विदर्भात दोन दिवस अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. कोकण, घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडणार आहे. तर मध्य महाराष्ट्रात सह्याद्रीच्या पूर्व उतारावरही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.  या जिल्ह्यांमध्ये होणार पाऊस  रविवार ः संपूर्ण कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर, अमरावती, नांदेड, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, यवतमाळ.  सोमवार ः संपूर्ण कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, यवतमाळ.  मंगळवार ः संपूर्ण कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, यवतमाळ.  बुधवार ः संपूर्ण कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, यवतमाळ.  शनिवारी (ता.१२) सकाळपर्यंतच्या २४ तासांत विविध शहरांतील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) 

  • मुंबई (सांताक्रूझ) ३०.९ 
  • अलिबाग - २९.७ 
  • रत्नागिरी - ३०.९ 
  • डहाणू - ३२.३ 
  • पुणे - २९.६ 
  • जळगाव - ३६.६ 
  • कोल्हापूर - २९.७ 
  • महाबळेश्‍वर - १९.३ 
  • मालेगाव - ३५.६ 
  • नाशिक - २८.७ 
  • सांगली - ३०.९ 
  • सातारा - २७ 
  • सोलापूर - ३३.८ 
  • औरंगाबाद - ३१.८ 
  • परभणी - ३२.७ 
  • बीड - ३३.८ 
  • अकोला - ३५.८ 
  • अमरावती - ३२.२ 
  • बुलडाणा - ३४ 
  • ब्रह्मपुरी - २९.१ 
  • चंद्रपूर - २७.६ 
  • गोंदिया - २७.५ 
  • नागपूर - ३१.१ 
  • वर्धा - २९ 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com