agriculture news in Marathi heavy rain prediction in kokan and Vidarbha Maharashtra | Page 2 ||| Agrowon

कोकण, घाटमाथा, विदर्भात अतिवृष्टीचा इशारा 

टीम अॅग्रोवन
रविवार, 13 जून 2021

 बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे मॉन्सून सक्रिय झाल्याने राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. कोकण, घाटमाथा, विदर्भात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे मॉन्सून सक्रिय झाल्याने राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. कोकण, घाटमाथा, विदर्भात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे. 

मॉन्सनने गुरुवारी (ता. १०) संपूर्ण राज्य व्यापले. नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) यंदा पाच दिवस आधीच संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असून मुंबईसह कोकण, विदर्भात पावसाने जोर धरला असला तरी उर्वरित राज्यात जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. ओडिशा आणि पश्‍चिम बंगाल लगतच्या समुद्रात कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे.

तर अरबी समुद्राच्या मध्य भागात असलेल्या चक्राकार वाऱ्यांपासून कोकणापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा (द्रोणीय स्थिती) सक्रिय आहे. ही स्थिती पूरक ठरल्याने राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे तापमानात चांगलीच घट झाली आहे. शनिवारी (ता.१२) सकाळच्या आठ वाजेपर्यंत खानदेशातील जळगाव येथे ३६.६ अंश सेल्सिअसची सर्वात कमी कमाल तापमानाची नोंद झाली. 

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे विदर्भात दोन दिवस अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. कोकण, घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडणार आहे. तर मध्य महाराष्ट्रात सह्याद्रीच्या पूर्व उतारावरही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. 

या जिल्ह्यांमध्ये होणार पाऊस 
रविवार ः
संपूर्ण कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर, अमरावती, नांदेड, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, यवतमाळ. 
सोमवार ः संपूर्ण कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, यवतमाळ. 
मंगळवार ः संपूर्ण कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, यवतमाळ. 
बुधवार ः संपूर्ण कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, यवतमाळ. 

शनिवारी (ता.१२) सकाळपर्यंतच्या २४ तासांत विविध शहरांतील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) 

 • मुंबई (सांताक्रूझ) ३०.९ 
 • अलिबाग - २९.७ 
 • रत्नागिरी - ३०.९ 
 • डहाणू - ३२.३ 
 • पुणे - २९.६ 
 • जळगाव - ३६.६ 
 • कोल्हापूर - २९.७ 
 • महाबळेश्‍वर - १९.३ 
 • मालेगाव - ३५.६ 
 • नाशिक - २८.७ 
 • सांगली - ३०.९ 
 • सातारा - २७ 
 • सोलापूर - ३३.८ 
 • औरंगाबाद - ३१.८ 
 • परभणी - ३२.७ 
 • बीड - ३३.८ 
 • अकोला - ३५.८ 
 • अमरावती - ३२.२ 
 • बुलडाणा - ३४ 
 • ब्रह्मपुरी - २९.१ 
 • चंद्रपूर - २७.६ 
 • गोंदिया - २७.५ 
 • नागपूर - ३१.१ 
 • वर्धा - २९ 

इतर अॅग्रो विशेष
राज्यात आज हलक्या सरींची शक्यता पुणे : राज्याच्या अनेक भागांत पावसाने उघडीप दिली...
पशुचिकित्सा व्यवसायींचा राज्यभर बेमुदत...नगर : पशुचिकित्सा व्यवसायी (डिप्लोमा, पदविकाधारक...
ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये सर्वसाधारण पावसाची...पुणे : हवामान विभागाने ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचा...
पीकविमाधारकांना मिळणार २५ टक्के तात्काळ...पुणेः राज्यात प्रतिकूल परिस्थितीमुळे खरीप...
खोटे बोलण्यासाठी नाही, प्रामाणिक...भिलवडी, जि. सांगली : ‘‘मी तत्काळ मदतीबाबत विचार...
'रेडग्लोब’ द्राक्षवाणात मिळवली ओळखपुणे जिल्ह्यातील खोडद येथील सुहास थोरात यांनी...
उत्पन्नाच्या विविध स्त्रोतांमधून मिळवली...बोरगाव खुर्द (ता.. जि.. अकोला) येथील महेश वानखडे...
शेतकऱ्यांनी वापरले ६५० कोटींचे घरचे...पुणेः राज्यात यंदा सोयाबीनच्या पेऱ्यात मोठी वाढ...
कोकणात हलक्या पावसाची शक्यता पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्र...
अडीच लाख शेतकऱ्यांच्या जमिनी सावकाराकडे...अमरावती : राष्ट्रीय व खासगी बँकांनी हात आखडता...
धरणक्षेत्रात पावसाची हजेरी पुणे : पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने पावसाचा...
सर्वदूर हलक्या पावसाची शक्यता पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राच्या...
पीक विम्यात कुचराई केल्यास नोटिसा काढा...नाशिक: पीकविमा योजनांची संबंधित कंपन्यांच्या...
मत्स्यबीज केंद्रामुळे महिला झाल्या...भिगवण (जि. पुणे) येथील पाच उपक्रमशील महिलांनी...
गणपतराव देशमुख यांच्या पार्थिवावर...सोलापूर ः शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि...
चीनची खत निर्यातीवर बंदी बीजिंग ः चीनमध्ये खतांचे घटलेले उत्पादन, विजेच्या...
राज्याची पीकपेरा नोंद आता शेतकरीच करणार पुणेः सातबारा उतारावरील पीकपेऱ्याची नोंद आता...
निसर्गदूतांच्या सहयोगाने ‘झाडांची भिशी...सोलापुरातील उपक्रमशील डॅाक्टर, इंजिनिअर्स,...
खानदेशात मका पिकात अमेरिकन लष्करी अळीचा...जळगाव : खानदेशात मका पिकाची लागवड यंदा बऱ्यापैकी...
पंधरा दिवस पावसाचा जोर कमी राहणार पुणे : गेल्या पंधरा दिवस कोकण आणि घाटमाथ्यावर...