agriculture news in Marathi heavy rain prediction in Kokan and Vidarbha Maharashtra | Page 3 ||| Agrowon

कोकण, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 16 जून 2021

कोकण ते अरबी समुद्राच्या दरम्यान कमी दाबाचा पट्टा असल्याने कोकणात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. पुढील दोन ते तीन दिवस ही स्थिती राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण कोकण व विदर्भात जोरदार पाऊस पडेल.

पुणे : कोकण ते अरबी समुद्राच्या दरम्यान कमी दाबाचा पट्टा असल्याने कोकणात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. पुढील दोन ते तीन दिवस ही स्थिती राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण कोकण व विदर्भात जोरदार पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्राचा पूर्व भाग, खानदेश, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी शिडकावा होईल, असा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला. 

मॉन्सून उत्तरेकडे गेल्याने राज्यात गेल्या पाच ते सहा दिवसांपूर्वी जोरदार पाऊस पडला. त्यानंतर कोकण, मराठवाडा व विदर्भात पावसाचा प्रभाव कमी होऊन कमी-अधिक पाऊस पडत आहे. सध्या खानदेश, मध्य महाराष्ट्राच्या पूर्व भाग, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागांत अजूनही पावसाची प्रतिक्षा लागून राहिली आहे. अनेक भागांत पावसाने चांगलीच उघडीप दिल्याने सकाळपासून उन्हाचा चटका वाढला आहे. त्यामुळे उकाड्यात वाढ होत असल्याने कमाल तापमानात चढ-उतार होत आहे. मंगळवारी (ता.१५) सकाळी आठ वाजेपर्यंत विदर्भातील अकोला येथे ३७.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. 

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून वायव्य बंगालचा उपसागर व लगतच्या भाग आणि मध्य अरबी समुद्र ते कोकण किनारपट्टी दरम्यान कमी दाबाचा पट्टा आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मुंबई या भागांत आज आणि उद्या या दोन दिवस अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे जिल्ह्यातही अतिवृष्टीचा होण्याची शक्यता आहे. मराठवाडा व विदर्भातही आज तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. कोकण, घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडणार असून, मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

या जिल्ह्यांमध्ये होणार पाऊस 
बुधवार ः
संपूर्ण कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, यवतमाळ 
गुरुवार ः मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, संपूर्ण विदर्भ 
शुक्रवार ः मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, संपूर्ण विदर्भ 
शनिवार ः मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, संपूर्ण विदर्भ 

मंगळवारी (ता.१५) सकाळपर्यंतच्या २४ तासांत विविध शहरांतील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) 

 • मुंबई (सांताक्रूझ) ३३.६ 
 • अलिबाग - ३४.१ 
 • रत्नागिरी - २८.४ 
 • डहाणू - ३३.६ 
 • पुणे - ३२.४ 
 • कोल्हापूर - २९.८ 
 • महाबळेश्‍वर - २३ 
 • नाशिक - ३१.७ 
 • सांगली - ३०.३ 
 • सातारा - ३० 
 • सोलापूर - ३२.४ 
 • औरंगाबाद - ३३.६ 
 • बीड - ३५.५ 
 • अकोला - ३७.२ 
 • अमरावती - ३५ 
 • बुलडाणा - ३६ 
 • ब्रह्मपुरी - ३५.४ 
 • चंद्रपूर - ३२.६ 
 • गोंदिया - ३४.५ 
 • नागपूर - ३६.८ 
 • वर्धा - ३५.५ 

इतर अॅग्रो विशेष
पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी यापुढे...कोल्हापूर : सातत्याने निर्माण होणाऱ्या पूर...
दोष पीकविमा कंपन्यांचा, रोष आमच्यावर;...पुणे ः पीकविमा योजनेचे कंत्राट मिळवलेल्या खासगी...
दिवेकर, ताटेंसह १४ कृषी उपसंचालकांच्या...पुणे ः राज्याच्या कृषी आयुक्तालयातील ठिबक कक्षाचे...
मध्य महाराष्ट्र, कोकण, घाटमाथ्यावर हलका...पुणे : राज्यातील धरणक्षेत्रात पावसाचा जोर कमी...
पीकविमा तक्रार निवारण व्यवस्थेचे तीन...पुणे ः पंतप्रधान पीकविमा योजनेबाबत समस्या किंवा...
यवतमाळ जिल्ह्यात वाघांची संख्या वीस यवतमाळ : वनसंपदेने नटलेल्या यवतमाळ जिल्ह्यात...
बावीस जिल्ह्यांत उभारणार तेलघाणे नागपूर ः विदर्भात तेलबियावर्गीय पिकांना...
सोयाबीन पिकाची किडीकडून चाळणआर्णी, जि. यवतमाळ : तालुक्यातील लोणी येथील...
‘आयटी’ मित्रांची शेती व्यवस्थापन कंपनीतुमची शेती आमच्यावर सोपवा, आम्ही आधुनिक...
लवांडे यांनी उभारली चारा पिकांची...फत्तेपूर (जि.. नगर) येथील अल्पभूधारक सोमेश्वर...
‘एफपीओं’ना बनवा अधिक कार्यक्षमशेतीसाठीच्या सध्याच्या अत्यंत प्रतिकूल अशा...
विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्रामुळे...
नुकसानीच्या दोन लाखांहून अधिक सूचना...पुणे ः राज्यभर कृषी विभागाच्या कार्यालयांमध्ये...
विमा कंपन्यांच्या नफेखोरीला सरकारी...पुणे ः पंतप्रधान पीकविमा योजनेचा कारभार गेल्या...
राज्यात हलका, मध्यम पावसाची हजेरी पुणे : गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पावसाने...
महाराष्ट्र सेंद्रिय प्रमाणीकरण यंत्रणा...मुंबई : महाराष्ट्र सेंद्रिय प्रमाणीकरण यंत्रणेची...
केबल शेडनेटला आता अनुदान पुणे ः राज्याच्या संरक्षित शेतीला चालना...
शेळीपालनापाठोपाठ घरालाही दिले ‘ॲग्रोवन...औरंगाबाद : शेतकऱ्याचं ‘ॲग्रोवन’वरचं प्रेम पुन्हा...
शेतकरी कंपन्यांसाठी २०० कॉपशॉप साकारणार पुणे : राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांना...
एकोप्याच्या बळावर बदलले वडगाव गुप्ताचे...दुष्काळाशी संघर्ष करणाऱ्या वडगाव गुप्ता (ता. जि....