agriculture news in Marathi heavy rain prediction in Kokan and Vidarbha Maharashtra | Agrowon

कोकण, विदर्भात मुसळधारेचा अंदाज 

टीम अॅग्रोवन
रविवार, 20 जून 2021

दक्षिण कोकणची किनारपट्टी ते उत्तर केरळदरम्यान कमी दाबाचा पट्टा तीन ते चार दिवसांपासून सक्रिय आहे. यामुळे कोकणातील काही भागांत मुसळधार पाऊस पडत आहे. 

पुणे : दक्षिण कोकणची किनारपट्टी ते उत्तर केरळदरम्यान कमी दाबाचा पट्टा तीन ते चार दिवसांपासून सक्रिय आहे. यामुळे कोकणातील काही भागांत मुसळधार पाऊस पडत आहे. आज (ता. २०) कोकणातील ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा तर विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. 

कोकण व मध्य महाराष्ट्राच्या पश्‍चिम भागात ढगाळ वातावरण असून, अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. अधूनमधून ऊन पडत असल्याने उकाडाही वाढत आहे. खानदेश, मराठवाडा व विदर्भातही हलक्या सरी बरसत आहेत. उद्यापासून राज्यातील पावसाचा प्रभाव कमी होणार आहे. त्यामुळे उन्हाचा चटका पुन्हा काही प्रमाणात वाढणार असून, काही भागांत पावसाचा शिडकावा होईल. शनिवारी (ता. १९) सकाळच्या आठ वाजेपर्यंत मध्य महाराष्ट्रातील मालेगाव येथे ३५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. 

राज्यात होत असलेल्या पावसामुळे सरासरीच्या तुलनेत पाच अंश सेल्सिअसची घट झाली. कोकणात कमाल तापमानात २९ ते ३३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. मध्य महाराष्ट्रातही २० ते ३२ अंश सेल्सिअस, मराठवाड्यातही तापमान २७ ते ३२ अंश सेल्सिअस, तर कोकणात २९ ते ३३ अंश सेल्सिअसच्या 
दरम्यान होते. कमाल तापमानाबरोबर किमान तापमानातही काही प्रमाणात घट झाली असून महाबळेश्‍वर येथे १७ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी तापमानाची नोंद झाली. 

या जिल्ह्यांमध्ये होणार पाऊस 
रविवार ः
ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर. 
सोमवार ः रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. 
मंगळवार ः रायगड. 
बुधवार ः रायगड. 

शनिवारी (ता.१९) सकाळपर्यंतच्या २४ तासांत विविध शहरांतील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) 

 • मुंबई (सांताक्रूझ) ३२.९ 
 • अलिबाग - ३२.८ 
 • रत्नागिरी - २९.५ 
 • डहाणू - ३०.१ 
 • पुणे - २८.३ 
 • जळगाव - ३४ 
 • कोल्हापूर - २६.१ 
 • महाबळेश्‍वर - २० 
 • मालेगाव -- ३५ 
 • नाशिक - २८.५ 
 • सांगली - २६.८ 
 • सातारा - २५.२ 
 • सोलापूर - ३२.४ 
 • उस्मानाबाद - २७.२ 
 • औरंगाबाद - ३१.५ 
 • परभणी -- ३२.२ 
 • बीड -- ३२.८ 
 • अकोला - ३४.१ 
 • अमरावती - ३२.८ 
 • बुलडाणा - २९ 
 • ब्रह्मपुरी - ३४ 
 • चंद्रपूर - ३२ 
 • गोंदिया - ३१.५ 
 • नागपूर - ३३ 
 • वर्धा - ३३.५ 

इतर बातम्या
कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यतापुणे : गेल्या काही दिवसांपासून पावसाची उघडीप...
राज्यस्तरीय ‘आत्मा’ समितीत ३०...पुणे ः राज्याच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन...
खासगी उद्योजकांच्या अवजारांवर अनुदानपुणे ः राज्यातील कृषी विद्यापीठे तसेच खासगी...
एक हजार नव्या रोपवाटिका होणारपुणे ः राज्यात नव्याने एक हजार रोपवाटिका...
भारतात उत्पादित ड्रॅगन फ्रूटची...नाशिक : गेल्या काही वर्षांत नवीन पीकपद्धती म्हणून...
अकोलखेडमधील पाऊस नोंदी दिशाभूल करणाऱ्याअकोला ः जिल्ह्यातील अकोलखेड महसूल मंडळात जून,...
रत्नागिरीत अतिवृष्टीमुळे हजार कोटींचे...रत्नागिरी : मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे...
गजानन महाराज संस्थानचे विश्‍वस्त...शेगाव, जि. बुलडाणा ः विदर्भाच्या पंढरीतील श्री...
‘शेतकऱ्यांची पोरं’ करणार  बळिराजाला...उजनी, जि. लातूर ः पावसामुळे पिकांच्या झालेल्या...
नगर : पशुचिकित्सा व्यवसायिकांचे  काम...नगर : पशुचिकित्सा व्यावसायिक (डिप्लोमा,...
अतिवृष्टी, पूरबाधितांचे पंचनामे तत्काळ...नागपूर : अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या...
सांगलीत सोळा हजारांहून अधिक पंचनामे...सांगली  : जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व...
चासकमान धरण ‘ओव्हर फ्लो’चास, जि. पुणे : खेड तालुक्याच्या पश्चिम...
सोलापूर ः`‘किसान रेल्वे’ला जेऊरला...सोलापूर ः किसान रेल्वेला जेऊर (ता. करमाळा)...
‘तौक्ते’ नुकसानग्रस्तांना २५ कोटींच्या...सिंधुदुर्गनगरी : तौक्ते चक्रीवादळात झालेल्या...
‘पोकरा’च्या कामकाजावरील ग्रामसेवकांचा...अकोला : राज्यात राबविल्या जात असलेल्या नानाजी...
अकोल्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन...अकोला : मागील खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे...
अंतापूर, ता. सटाणा : शून्य ऊर्जेवर...अंतापूर, ता. सटाणा : सटाणा तालुक्यातील खालचे...
परभणी, हिंगोलीत नऊ हजार शेतकऱ्यांची...परभणी ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीने ८० हजार...परभणी ः जिल्ह्यात सोमवार (ता.१२) ते गुरुवार (ता....