agriculture news in marathi, Heavy rain prediction in kokan, central maharashtra | Agrowon

कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधारेचा इशारा

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 9 जुलै 2019

पुणे : मॉन्सून सक्रीय झाल्याने कोकण, मध्य महाराष्ट्र, घाटमाथ्यावर धुवाधार पाऊस सुरू आहे. सोमवारी (ता. ८) सकाळपासूनच उत्तर कोकणातील रायगड, ठाणे, पालघर, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा जिल्ह्यांच्या पश्चिम भागात पावसाने जोर धरला होता. तर मराठवाडा आणि विदर्भातही काही ठिकाणी पाऊस पडत होता. आज (ता. ९) कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, विदर्भात अनेक ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.

पुणे : मॉन्सून सक्रीय झाल्याने कोकण, मध्य महाराष्ट्र, घाटमाथ्यावर धुवाधार पाऊस सुरू आहे. सोमवारी (ता. ८) सकाळपासूनच उत्तर कोकणातील रायगड, ठाणे, पालघर, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा जिल्ह्यांच्या पश्चिम भागात पावसाने जोर धरला होता. तर मराठवाडा आणि विदर्भातही काही ठिकाणी पाऊस पडत होता. आज (ता. ९) कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, विदर्भात अनेक ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.

मॉन्सून सक्रीय झाल्याने कोकण, मध्य महाराष्ट्र, घाटमाथ्यावर धुवाधार पाऊस सुरू आहे. सोमवारी (ता. ८) सकाळपासूनच उत्तर कोकणातील रायगड, ठाणे, पालघर, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा जिल्ह्यांच्या पश्चिम भागात पावसाने जोर धरला होता. तर मराठवाडा आणि विदर्भातही काही ठिकाणी पाऊस पडत होता. आज (ता. ९) कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, विदर्भात अनेक ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.       

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) शनिवारी (ता. ६) राजस्थान, पंजाब, हरियाणा राज्यांचा काही भाग वगळता देश व्यापला आहे. दोन दिवसांपासून मॉन्सूनची वाटचाल ‘जैसे थे’ आहे. आज (ता. ९) देशाच्या आणखी काही भागांत मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. सोमवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये घाटमाथ्यावर दमदार पाऊस पडत असून, कोयना धरण क्षेत्रातील पोफळी येथे सर्वाधिक ३०० मिलिमीटर, शिरगाव २५०, ताम्हीणी २३०, दावछी २२०, डुंगरवाडी २०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर पालघर जिल्ह्यातील वाडा येथे २३०, साताऱ्यातील महाबळेश्वर येथे २४० मिलिमीटर पाऊस पडल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. 

सोमवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत - हवामान विभाग) :
कोकण : वाडा २३०, पेण १६०, माथेरान, धारावी, जव्हार, चिपळूण प्रत्येकी १५०, मोखेडा १४०, विक्रमगड १३०, कल्याण, कर्जत, भिंवडी, अंबरनाथ, ठाणे प्रत्येकी १२०, तलासरी ११०, रोहा, शहापूर, डहाणू, मुरबाड, उल्हासनगर प्रत्येकी १००, वैभवाडी, खेड, गुहागर, महाड प्रत्येकी ९०, तळा, मंडणगड, उरण, सुधागडपाली प्रत्येकी ८०, पोलादपूर, मुरूड, राजापूर, पनवेल, खालापूर, मानगाव प्रत्येकी ७०, वसई ६०, लांजा, संगमेश्वर प्रत्येकी ५०.
मध्य महाराष्ट्र : महाबळेश्वर २४०, इगतपुरी १७०, गगनबावडा १५०, हर्सुल १४०, त्रिंबकेश्वर १३०, जावळी, पेठ प्रत्येकी ११०, सुरगाणा, पाटण, घोडगाव, वेल्हे प्रत्येकी १००, सातारा ९०, आजरा, राधानगरी, अकोले प्रत्येकी ८०, नाशिक, शाहूवाडी, पन्हाळा प्रत्येकी ७०, तळोदा, जुन्नर, कोरेगाव, भोर प्रत्येकी ६०, चंदगड, अक्कलकुवा, पौड, खेड, पुणे शहर, वडगाव मावळ, वाई प्रत्येकी ५०, पारोळा ४०, दिंडोरी, कराड, कागल, पुरंदर, गडहिंग्लज, नवापूर प्रत्येकी ३०.
मराठवाडा : फुलांब्री, सोयगाव प्रत्येकी २०, परभणी, माहूर, आष्टी, वसमत, मानवत, माजलगाव, अर्धापूर, भोकरदन, खुल्ताबाद, सेनगाव प्रत्येकी १०.
विदर्भ :  भामरागड, मोहाडी, मुलचेरा, धानेरा, कोर्ची, एटापल्ली प्रत्येकी २०. 
घाटमाथा : कोयना पोफळी ३००, शिरगाव २५०, ताम्हीणी २३०, दावछी २२०, डुंगरवाडी २००, खोपोली, लोणावळा प्रत्येकी १७०, भिरा, ठाकूरवाडी १५०, कोयना नवजा १२०, लोणावळा १००, वळवण ९०, शिरोटा ८०, भिवापुरी ७०.


इतर अॅग्रो विशेष
राज्यात ३० टक्के दूध वापराविनापुणे: कोरोना विषाणुमुळे पसरलेल्या साथीनंतर सुरू...
औरंगाबाद : शेतकरी गटामार्फत ग्राहकांना...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
नगर जिल्ह्यात पाचशे टन भाजीपाला...नगरः कोरोना संसर्गाच्या पाश्वभूमीवर लॉकडाऊनमुळे...
जगभरात कोरोनामुळे ३० हजार मृत्यूः...जिनिव्हा: जगभरात कोरोना विषाणूचे थैमान सुरुच...
विदर्भात विजांसह पावसाची शक्यतापुणे : राज्यात सुरू असलेला पूर्वमोसमी पाऊस काहीशी...
थेट विक्रीने सोडविला दराचा प्रश्‍नऔरंगाबाद: कोरोनामुळे शेतमाल विक्रीचा प्रश्न...
पुणे, मुंबईतील सोसायटीधारकांनी...पुणे ः शहरी भागातील हाउसिंग सोसायटी भागातील...
खताचे आठ रेल्वे रेक ‘अनलोड’ पुणे : कोरोना लॉकडाऊननंतर राज्याच्या विविध भागात...
राज्यातील २२० बाजार समित्यांचे कामकाज...पुणे: कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी...
लॉकडाऊन वाढवण्याचा विचार नाही : कॅबिनेट...नवी दिल्ली: कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी १४...
उन्हाच्या चटक्यात महाराष्ट्र होरपळणारपुणे : यंदाच्या उन्हळ्यात महाराष्ट्र उन्हाच्या...
यंदाची चैत्री वारी रद्द, पंढरपुरात येऊ...सोलापूर ः पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेची...
पुणे बाजार समितीत १७ हजार क्विंटल फळे...पुणे: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
जळगाव बाजारसमितीत सोशल डिस्टन्सिंगकडे...जळगाव  ः येथील बाजार समितीत भाजीपाल्याची आवक...
देशात कोरोनाबाधीत १०७१ रुग्ण  नवी दिल्ली: देशात कोरोनाबाधीत रुग्णांची...
कोकण रेल्वेकडून अत्यावश्यक वस्तूंची जलद...रत्नागिरीः देशभरातील जनतेला आवश्यक वस्तूंचा...
सोनाई प्रकल्पात दहा लाख लिटर दूध नासले...पुणे: कोरोनामुळे राज्यात दुधाचा महापूर सुरू झाला...
बार्शी तालुक्यातील द्राक्षपट्टा...सोलापूर  ः कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर...
पुणे विभागात ३२९ क्विंटल भाजीपाल्याची...पुणे  ः ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
शाळांमध्ये शिल्लक धान्यांचे ...पुणे : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्यातील शाळांना...