कोकणात मुसळधारेचा अंदाज

उत्तर प्रदेशचा नैऋत्य भाग ते छत्तीसगडचा दक्षिण भाग व मध्य प्रदेशचा पूर्व भागात कमी दाबाचा पट्टा आहे. त्यामुळे आज (ता.१३) कोकणात मुसळधार पाऊस पडेल.
Hawaman web
Hawaman web

पुणे ः  उत्तर प्रदेशचा नैऋत्य भाग ते छत्तीसगडचा दक्षिण भाग व मध्य प्रदेशचा पूर्व भागात कमी दाबाचा पट्टा आहे. त्यामुळे आज (ता.१३) कोकणात मुसळधार पाऊस पडेल. तर विदर्भात आज आणि उद्या पावसाच्या हलक्या सरी बरसतील, तर शनिवारपासून जोर वाढेल. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही पावसाचा जोर कमी राहणार आहे. मात्र, शनिवारपासून विदर्भात पुन्हा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागने व्यक्त केली आहे. 

बंगाल उपसागराच्या वायव्य भागात आज (ता.१३) दोन ठिकाणी कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. तसेच बंगाल उपसागराचे पश्चिममध्य व वायव्य भाग आणि ओडिशा व उत्तर आंध्र प्रदेश या भागांत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ४.५ ते ५.८ किलोमीटर उंचीवर आहे. याशिवाय बंगाल उपसागराच्या वायव्य भाग व पश्चिम मध्य ते पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार या दरम्यान कमी दाबाचा पट्टा आहे.  उत्तर भारतात दाखल झालेल्या मॉन्सूनचा पट्टा फिरोजपूर, कैथाल, मोरादाबाद, गोंदा, गया, शांतिनिकेतन ते बंगाल उपसागराच्या भागापर्यंत आहे. त्यामुळे राज्यात पावसाचा पोषक वातावरण आहे.

राज्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी पुढील काही दिवस पावसासाठी पोषक वातावरण आहे. कोकण आणि घाटमाथ्यावर पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात हलका ते मध्यम पाऊस पडेल, अंदाज हवामान विभागाच्या सुत्रांनी दिला. पुणे परिसरातही सोमवारपर्यंत (ता.१७) हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com