agriculture news in Marathi heavy rain prediction in Kokan Maharashtra | Agrowon

कोकणात अतिवृष्टीचा इशारा 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 10 जून 2021

राज्यात दाखल झालेला मॉन्सून दोन ते तीन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सक्रिय होत आहे. राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागांत सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. 

पुणे : राज्यात दाखल झालेला मॉन्सून दोन ते तीन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सक्रिय होत आहे. राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागांत सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. विदर्भात काही अंशी ऊन असले, तरी पश्‍चिम महाराष्ट्रात अधूनमधून ऊन पडत आहे. उद्यापासून कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, पालघर जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाच्या सूत्रांनी दिला. 

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत कडाक्याचे ऊन पडले होते. त्यामुळे उकाड्यात वाढ होऊन कमाल तापमानात चढ-उतार होत आहे. विदर्भात पुन्हा पारा ४० अंश सेल्सिअसपर्यंत होता. मात्र मंगळवारी हा पारा कमी होऊन सरासरीच्या तुलनेत तीन ते चार अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली होती. अमरावती, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, गोंदिया या भागांत तापमानात चांगलीच घट झाली आहे. बुधवारी (ता. ९) सकाळच्या आठ वाजेपर्यंत विदर्भातील अकोला येथे ३८.९ 
अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. 

कोकणात बुधवारपासून पावसाचा जोर वाढला आहे. अनेक भागांत पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. त्यामुळे हवेत चांगलाच गारवा वाढल्याने कमाल तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत पाच अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. कोकण विभागात असलेल्या मुंबईत सर्वांत कमी २८.२ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी तापमान नोंदविले गेले. उर्वरित भागात तापमान ३० ते ३२ अंश सेल्सिअस, मध्य महाराष्ट्रात २१ ते ३८, मराठवाड्यात ३४ ते ३६ तर विदर्भात ३४ ते ३८ अंश सेल्सिअस या दरम्यान तापमान नोंदविले गेले. 

या जिल्ह्यांमध्ये होणार पाऊस 
गुरुवार ः
कोकणात मुसळधार, मराठवाड्याचा काही भाग, संपूर्ण विदर्भात मध्यम ते जोरदार 
शुक्रवार ः संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ 
शुक्रवार ः कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ 
शनिवार ः कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ 

बुधवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांत विविध शहरांतील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) 

 • मुंबई (सांताक्रूझ) ३२.१ 
 • अलिबाग - ३० 
 • रत्नागिरी - ३०.५ 
 • डहाणू - ३२.४ 
 • पुणे - ३१.१ 
 • जळगाव - ३८.६ 
 • कोल्हापूर - ३० 
 • महाबळेश्‍वर - २१.७ 
 • मालेगाव - ३४.८ 
 • नाशिक - ३१.८ 
 • सांगली - ३२.२ 
 • सातारा - ३०.५ 
 • सोलापूर - ३६.१ 
 • औरंगाबाद - ३४.१ 
 • परभणी - ३६.५ 
 • बीड - ३६.२ 
 • अकोला - ३८.९ 
 • अमरावती - ३४.८ 
 • बुलडाणा - ३६ 
 • ब्रह्मपुरी - ३७.९ 
 • चंद्रपूर - ३८.२ 
 • गोंदिया - ३७.५ 
 • नागपूर - ३८.८ 
 • वर्धा - ३७.८ 

इतर बातम्या
विदर्भात मुसळधारेची शक्यता पुणे : उत्तरेकडे मॉन्सून गेल्यानंतर राज्यातील...
दूधप्रश्‍नी शेतकरी आक्रमक; राज्यभरात...नगर ः दुधाला दर मिळावा यासाठी गुरुवारी (ता. १७)...
‘द्राक्ष क्लस्टर’मध्ये नाशिकचा समावेश नाशिक : केंद्र सरकारने देशभरात विविध ५३ पिकांचे...
सूक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजनेला गती...पुणे ः पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजना...
विदर्भात अडीच कोटींचा ‘एचटीबीटी’ साठा...नागपूर : गेल्या हंगामात अनधिकृत कापूस बियाण्याचे...
वैयक्तिक वनदाव्यांचा जलदगतीने निपटारा...नाशिक : जिल्ह्यातील वैयक्तिक वनदाव्यांचा वनसमिती...
कोकणसह कोल्हापुरात पावसाने दाणादाण पुणे : कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड,...
पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विम्याचे...सोलापूर ः राज्यातील फळबागांसाठी असलेल्या...
सिंधुदुर्ग पूरस्थितीच्या उंबरठ्यावरसिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार...
कोल्हापुरातील शिवारे जलमयकोल्हापूर : जिल्ह्याला बुधवारी (ता. १६)...
खानदेशात अनेक भागांत पावसाची हजेरीजळगाव ः खानदेशात बुधवारी (ता. १६) अनेक भागांत...
दूध दरवाढीसाठी पुणे जिल्ह्यात निदर्शनेपुणे : लॉकडाउनच्या काळात मागणी घटल्याचे कारण देत...
खतांची जादा दराने विक्री करणाऱ्यांवर...वाशीम : जिल्ह्यातील चार महसूल मंडळांचा अपवाद...
राज्यात २१८ तालुक्यांमध्ये दमदार पाऊस;...पुणे ः जूनच्या पहिल्या पंधरवड्यात राज्यातील २१८...
राज्यात खरीप पेरणी तीन टक्केनगर ः राज्यात यंदा आतापर्यंत खरिपाची सरासरीच्या...
मराठा आरक्षणासाठी एकत्रित लढणारकोल्‍हापूर : इथून पुढील काळात कोणत्याही...
खानदेशात युरियाची टंचाईजळगाव : खानदेशात खरिपास हवी तशी सुरुवातदेखील...
दूधप्रश्‍नी आज राज्यभर किसान सभेचे...नगर ः दुधाला दर मिळावा यासाठी गुरुवारी (ता. १७)...
खानदेशात कांदा दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात लाल कांद्याच्या दरात गेल्या चार-...
विदर्भात पावसाचा जोर वाढणारपुणे : राज्यातील बहुतांशी भागात उन्हासह अंशतः...