कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधारेचा इशारा 

कोकणसह राज्यातील काही भागांत मॉन्सून सक्रिय होत आहे. त्यामुळे काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. येत्या चार ते पाच दिवस कोकण, घाटमाथा, विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधारेचा इशारा देण्यात आला आहे.
कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधारेचा इशारा 
कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधारेचा इशारा 

पुणे : कोकणसह राज्यातील काही भागांत मॉन्सून सक्रिय होत आहे. त्यामुळे काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. येत्या चार ते पाच दिवस कोकण, घाटमाथा, विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधारेचा इशारा देण्यात आला आहे. तर उर्वरीत राज्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे. 

सध्या मध्य महाराष्ट्र व मराठवाडा, विदर्भाच्या काही भागांत सकाळपासून उन्हाचा चटका वाढत आहे. दुपारी पारा चांगलाच वाढत असून उकाड्यात वाढ होत आहे. त्यामुळे कमाल तापमानात चढउतार होत आहे. काही ठिकाणी पारा कमीअधिक होत आहे. तुरळक ठिकाणी होत असलेल्या पावसामुळे हवेत गारवा तयार होत असल्याने तापमानात कमालीची घट होत आहे. रविवारी (ता.१३) सकाळच्या आठ वाजेपर्यंत खानदेशातील जळगाव येथे ३९.३ अंश सेल्सिअसची  सर्वांत कमी कमाल तापमानाची नोंद झाली. 

बंगालच्या उपसारातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि मुंबई या भागांत आज आणि उद्या या दोन दिवस अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातही अतिवृष्टीचा होण्याची शक्यता आहे. विदर्भातही आज तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. कोकण, घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडणार आहे. तर मध्य महाष्ट्रात सह्याद्रीच्या पूर्वउतारावरही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या भागात ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहणार असून मच्छव्यवसायिकांनी समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.  या जिल्ह्यांमध्ये होणार पाऊस  सोमवार ः संपूर्ण कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, यवतमाळ.  मंगळवार ः संपूर्ण कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, यवतमाळ.  बुधवार ः संपूर्ण कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, यवतमाळ.  गुरूवार ः मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग.  रविवारी (ता.१३) सकाळपर्यंतच्या २४ तासांत विविध शहरातील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) 

  • मुंबई (सांताक्रुझ) ३०.६ 
  • अलिबाग - २९.५ 
  • रत्नागिरी - ३०.४ 
  • डहाणू - २९.७ 
  • पुणे - २९.५ 
  • जळगाव - ३९.३ 
  • कोल्हापूर - २९.६ 
  • महाबळेश्वर - २०.६ 
  • नाशिक - ३१.१ 
  • सांगली - ३०.६ 
  • सातारा - २९.० 
  • सोलापूर - ३५.२ 
  • औरंगाबाद - ३४.६ 
  • परभणी - ३२.९ 
  • बीड - ३३.८ 
  • अकोला - ३४.२ 
  • अमरावती - ३०.४ 
  • बुलडाणा - ३२.० 
  • ब्रम्हपुरी - ३१.० 
  • चंद्रपूर - ३१.६ 
  • गोंदिया - ३२.० 
  • नागपूर - २९.४ 
  • वर्धा - २९.२  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com