agriculture news in Marathi heavy rain prediction in Kokan Maharashtra | Page 2 ||| Agrowon

कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधारेचा इशारा 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 14 जून 2021

कोकणसह राज्यातील काही भागांत मॉन्सून सक्रिय होत आहे. त्यामुळे काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. येत्या चार ते पाच दिवस कोकण, घाटमाथा, विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधारेचा इशारा देण्यात आला आहे.

पुणे : कोकणसह राज्यातील काही भागांत मॉन्सून सक्रिय होत आहे. त्यामुळे काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. येत्या चार ते पाच दिवस कोकण, घाटमाथा, विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधारेचा इशारा देण्यात आला आहे. तर उर्वरीत राज्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे. 

सध्या मध्य महाराष्ट्र व मराठवाडा, विदर्भाच्या काही भागांत सकाळपासून उन्हाचा चटका वाढत आहे. दुपारी पारा चांगलाच वाढत असून उकाड्यात वाढ होत आहे. त्यामुळे कमाल तापमानात चढउतार होत आहे. काही ठिकाणी पारा कमीअधिक होत आहे. तुरळक ठिकाणी होत असलेल्या पावसामुळे हवेत गारवा तयार होत असल्याने तापमानात कमालीची घट होत आहे. रविवारी (ता.१३) सकाळच्या आठ वाजेपर्यंत खानदेशातील जळगाव येथे ३९.३ अंश सेल्सिअसची 
सर्वांत कमी कमाल तापमानाची नोंद झाली. 

बंगालच्या उपसारातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि मुंबई या भागांत आज आणि उद्या या दोन दिवस अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातही अतिवृष्टीचा होण्याची शक्यता आहे. विदर्भातही आज तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. कोकण, घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडणार आहे. तर मध्य महाष्ट्रात सह्याद्रीच्या पूर्वउतारावरही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या भागात ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहणार असून मच्छव्यवसायिकांनी समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

या जिल्ह्यांमध्ये होणार पाऊस 
सोमवार ः
संपूर्ण कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, यवतमाळ. 
मंगळवार ः संपूर्ण कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, यवतमाळ. 
बुधवार ः संपूर्ण कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, यवतमाळ. 
गुरूवार ः मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग. 

रविवारी (ता.१३) सकाळपर्यंतच्या २४ तासांत विविध शहरातील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) 

 • मुंबई (सांताक्रुझ) ३०.६ 
 • अलिबाग - २९.५ 
 • रत्नागिरी - ३०.४ 
 • डहाणू - २९.७ 
 • पुणे - २९.५ 
 • जळगाव - ३९.३ 
 • कोल्हापूर - २९.६ 
 • महाबळेश्वर - २०.६ 
 • नाशिक - ३१.१ 
 • सांगली - ३०.६ 
 • सातारा - २९.० 
 • सोलापूर - ३५.२ 
 • औरंगाबाद - ३४.६ 
 • परभणी - ३२.९ 
 • बीड - ३३.८ 
 • अकोला - ३४.२ 
 • अमरावती - ३०.४ 
 • बुलडाणा - ३२.० 
 • ब्रम्हपुरी - ३१.० 
 • चंद्रपूर - ३१.६ 
 • गोंदिया - ३२.० 
 • नागपूर - २९.४ 
 • वर्धा - २९.२  

इतर अॅग्रो विशेष
‘अंतिम अरदास’मध्ये पुन्हा पाणावले डोळे...लखीमपूर खेरी, उत्तर प्रदेश : येथील तिकोनिया येथे...
निम्म्या महाराष्ट्रातून मॉन्सून माघारीपुणे : राजस्थानातून परतीच्या प्रवासाला उशिरा...
कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाची...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) परतीचा...
फळे- भाजीपाला साठवणुकीसाठी ‘पुसा फार्म...नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेने (...
पुण्यात ‘महाराष्ट्र बंद’ला प्रतिसादपुणे - उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे...
हत्याकांडाचा ‘कडकडीत’ निषेधपुणे ः लखीमपूर खिरीमध्ये भाजपा मंत्रिपुत्राच्या...
कापसाचे दर राहतील ७००० रुपयांच्या पुढे...नागपूर ः जागतिक बाजारात १९९४ व २०११ नंतर...
राज्यात पावसाची उघडीप शक्यपुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) परतीचा...
कोल्हापूर, सांगली, कोकणात बंदला संमिश्र...कोल्हापूर : लखीमपूर येथील शेतकऱ्यांना...
मॉन्सून महाराष्ट्रातून परतण्यास प्रारंभपुणे : राजस्थानातून ६ ऑक्टोबर रोजी परतीची वाटचाल...
ऊस वाहतूक नियमावली रद्द केल्याने नाराजीपुणे ः राज्यातील उसाची तोडणी व वाहतुकीच्या...
पीकविमा कामकाजात हलगर्जीपणा नाहीपुणे ः पीकविमा योजनेतील मध्य हंगाम प्रतिकूल...
ऊसतोडीसाठी पैसे मागितल्यास तक्रार करा...पुणे ः ऊसतोडणीसाठी पैशांची मागणी होत असल्यास...
निर्यातक्षम डाळिंब उत्पादनात देशमुख...सुलतानपूर (जि. नगर) येथील विजय देशमुख यांनी नऊ...
दुग्ध व्यवसायातून बसविली आर्थिक घडीसातारा जिल्ह्यात कोपर्डे (हवेली) येथील कैलास...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाजपुणे : नैॡत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) परतीचा...
कोकण, मराठवाड्यात पावसाचा दणकापुणे : मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाला वेग आला...
चार कोटी ‘सातबारा’चे होणार मोफत वाटपपुणे ः ‘‘शेतकऱ्यांचा सातबारा तुम्ही विविध बदलांसह...
‘एफआरपी’ देण्यात महाराष्ट्र देशात अव्वलकोल्हापूर : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ‘एफआरपी’...
कमी दराने साखर विक्री अंगलट येण्याची...कोल्हापूर : राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात...