कोकणात मुसळधारेचा अंदाज; उर्वरित हलक्या ते मध्यम सरी शक्य

कोकणात मुसळधारेचा अंदाज; उर्वरित हलक्या ते मध्यम सरी शक्य
कोकणात मुसळधारेचा अंदाज; उर्वरित हलक्या ते मध्यम सरी शक्य

पुणे : कोकणात शनिवारी (ता. ६) सकाळपासून पावसाने जोर धरला आहे. तर घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. ७) कोकणात मुसळधारेचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.   नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) राजस्थान, पंजाब, हरियाणा राज्यांचा काही भाग वगळता जवळपास देश व्यापला आहे. उद्या (ता. ८) मॉन्सून संपूर्ण पंजाब, हरियाणा राज्य व्यापून, राजस्थानच्या आणखी काही भागांत दाखल होण्याची शक्यता आहे. कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढला असून, मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये सरीमागून सरी येत आहेत. विदर्भ, मराठवाड्यात मुख्यत: पावसाची उघडीप असून, तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडत आहे. शनिवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कणकवली येथे १३०, गगनबावडा ११०, तर पोलादपूर येथे १०० मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.    

शुक्रवारी (ता. ५) राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत - हवामान विभाग) :   कोकण : कणकवली १३०, पोलादपूर, १००, चिपळूण ७०, हर्णे, मंडणगड प्रत्येकी ६०, लांजा, वैभववाडी, राजापूर, ठाणे, श्रीवर्धन, कुडाळ, विक्रमगड, वाडा प्रत्येकी ५०, खालापूर, वेंगुर्ला, उल्हासनगर, पालघर, मालवण, वसई प्रत्येकी ४०, कर्जत, म्हसळा, भिरा, कल्याण, मोखेडा, उरण, मुरबाड, शहापूर, जव्हार, भिवंडी, माथेरान, रोहा, अंबरनाथ, तलासरी प्रत्येकी ३०.

मध्य महाराष्ट्र : गगनबावडा ११०, आजरा ८०, चंदगड, राधानगरी प्रत्येकी ७०, तळोदा ६०, पेठ, गारगोटी, शहूवाडी प्रत्येकी ५०, पन्हाळा, इगतपुरी, आक्रनी, सुरगाना प्रत्येकी ४०, पौड, शहादा, हर्सुल, लोणावळा, गडहिंग्लज प्रत्येकी ३०, शिरपूर, कागल, एरंडोल, महाबळेश्वर, पाटण, दिंडोरी, रावेर प्रत्येकी २०.

मराठवाडा : सिल्लोड ४०.

विदर्भ : चिखलदरा ५०, धारणी, अहेरी प्रत्येकी ४०, अमगाव, गोंदिया, मुलचेरा, गोंडपिंपरी प्रत्येकी ३०, सिरोंचा, चामोर्शी, भद्रावती, सालकेसा, धानोरा, चंद्रपूर प्रत्येकी २०. 

घाटमाथा : दावडी ८०, शिरगाव ७०, डुंगरवाडी ६०, ठाकूरवाडी, ताम्हिणी प्रत्येकी ५०, कोयना नवजा, खोपोली प्रत्येकी ४०, लोणवळा वाणगाव प्रत्येकी ३०. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com