कोकण, मध्य महाराष्ट्रात आजपासून मुसळधारेचा इशारा; ‘ऑरेंज अलर्ट’ जारी

अरबी समुद्रावरून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे बाष्पाचा पुरवठा होणार असल्याने शुक्रवार (ता. ३) पासून राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. कोकणात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधारेचा इशारा
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधारेचा इशारा

पुणे : अरबी समुद्रावरून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे बाष्पाचा पुरवठा होणार असल्याने शुक्रवार (ता. ३) पासून राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. कोकणात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भ, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.  राज्यात दोन दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी, तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडत आहे. गुरुवारी (ता. २) कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाच्या सरी पडल्या. उर्वरीत राज्यात ढगाळ हवामान होते. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या गंगानगरपासून मेघालयातील इंफाळपर्यंत पसरला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक किनारपट्टीला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे. यामुळे अरबी समुद्रावरून बाष्पाचा पुरवठा होत असल्याने कोकणात, मध्य महाराष्ट्रात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे.  शनिवारपर्यंत (ता. ४) पावसाचा जोर कायम राहणार आहे. आज (ता. ३) रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. पालघर, ठाणे, उस्मानाबाद, बीड, लातूर, बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.      गुरुवारी (ता. २) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्त्रोत - हवामान विभाग) : कोकण : रोहा २१, रत्नागिरी २८, मुळदे (कृषी) ७२, वेंगुर्ला ६३. मध्य महाराष्ट्र : महाबळेश्वर २२.  विदर्भ : बार्शीटाकळी १२, तेल्हारा १५, चिखली ३०, भामरागड २१, मुलचेरा ३९.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com