agriculture news in marathi Heavy rain prediction in Konkan, central maharashtra : IMD | Agrowon

कोकण, मध्य महाराष्ट्रात आजपासून मुसळधारेचा इशारा; ‘ऑरेंज अलर्ट’ जारी

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 3 जुलै 2020

अरबी समुद्रावरून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे बाष्पाचा पुरवठा होणार असल्याने शुक्रवार (ता. ३) पासून राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. कोकणात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी

पुणे : अरबी समुद्रावरून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे बाष्पाचा पुरवठा होणार असल्याने शुक्रवार (ता. ३) पासून राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. कोकणात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भ, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

राज्यात दोन दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी, तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडत आहे. गुरुवारी (ता. २) कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाच्या सरी पडल्या. उर्वरीत राज्यात ढगाळ हवामान होते. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या गंगानगरपासून मेघालयातील इंफाळपर्यंत पसरला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक किनारपट्टीला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे. यामुळे अरबी समुद्रावरून बाष्पाचा पुरवठा होत असल्याने कोकणात, मध्य महाराष्ट्रात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे. 

शनिवारपर्यंत (ता. ४) पावसाचा जोर कायम राहणार आहे. आज (ता. ३) रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. पालघर, ठाणे, उस्मानाबाद, बीड, लातूर, बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.     

गुरुवारी (ता. २) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्त्रोत - हवामान विभाग) : कोकण : रोहा २१, रत्नागिरी २८, मुळदे (कृषी) ७२, वेंगुर्ला ६३.
मध्य महाराष्ट्र : महाबळेश्वर २२. 
विदर्भ : बार्शीटाकळी १२, तेल्हारा १५, चिखली ३०, भामरागड २१, मुलचेरा ३९.


इतर बातम्या
रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांना पूर,...रत्नागिरी : सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने...
मराठवाड्यात कर्ज पुरवठ्याचं घोडं ३७...औरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीक कर्ज पुरवठा...
मुगाचे अर्धेअधिक क्षेत्र रोगाच्या...अकोला : यंदाच्या खरिपात मुगाच्या पिकावर लिफ...
दादाजींचे कुटुंबीय जगतेय केवळ...चंद्रपूर: ‘एचएमटी’सह तब्बल ९ धानाचे वाण विकसित...
सियावर रामचंद्र की जय ! अयोध्येत रंगला...अयोध्या : राम नामाच्या भक्तिसागरात आकंठ बुडालेली...
पालघरमध्ये महावृष्टी; मुंबई, कोकणला...पुणे : गेल्या दोन दिवसांपासून कोकणात पावसाने...
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधारेचा इशारापुणे : गुजरात ते उत्तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ...
राज्यात ९ ऑगस्टला रानभाज्या महोत्सवमुंबई : औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्यांची विक्री...
पंढरपुरात ७ ते १३ ऑगस्ट दरम्यान...सोलापूर  : कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी...
फळपीक विमा निकषात बदलाची गरज :...अमरावती : जिल्ह्यामध्ये संत्रा फळपीक मोठ्या...
अमृत आहार योजनेंतर्गत मोफत दूध भुकटी...मुंबई : राज्यातील दूध दराच्या प्रश्नावर...
सातारा जिल्ह्यात दमदार पाऊस सातारा : जिल्ह्यात मंगळवारी दमदार पाऊस झाल्याने...
कोयना धरण परिसरात मुसळधार पाऊस सातारा : कोयना धरण क्षेत्रात मंगळवारी मुसळधार...
कोल्हापूर बाजार समितीवर अखेर प्रशासक कोल्हापूर : नोकर भरती वरून वादग्रस्त ठरलेल्या...
मराठवाड्यात खरीप ज्वारीची ३७ टक्के पेरणीऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात...
शाश्वत शेती उत्पादनासाठी मातीतील जिवाणू...स्थानिक झाडे झुडुपांच्या मुळाच्या परिसरातील...
भुसावळमध्ये १५ हजार हेक्टरवर कपाशीभुसावळ, जि.जळगाव  : गतवर्षी अतिवृष्टीमुळे...
पुणे जिल्ह्यात जोरदार श्रावण सरी पुणे ः दोन ते तीन दिवसांपासून पुणे जिल्ह्याच्या...
नांदेड जिल्ह्यात दोन लाख शेतकरी...नांदेड : जिल्ह्यातील बॅंका जुन्या कर्जदार...
खानदेशात खतांची मागणी घटली जळगाव : खानदेशात मागील आठवड्यात खत टंचाईची तक्रार...