agriculture news in marathi Heavy rain prediction in konkan, Vidharbha | Agrowon

राज्यात पावसाचा जोर वाढणार

टीम अॅग्रोवन
बुधवार, 5 ऑगस्ट 2020

आज (ता.५) आणि उद्या (ता. ६) कोकण घाटमाथा, विदर्भाच्या पूर्व भागात जोरदार वाऱ्यांसह मुसळधार. तर मध्य महाराष्ट्राचा पूर्व भाग व खानदेश, मराठवाडा व विदर्भातील पश्चिम भागात हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

पुणे :  राज्यातील बहुतांशी भागात पुन्हा पावसाने जोर धरला असून कोकण व घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडत आहे. आज (ता.५) आणि उद्या (ता. ६) कोकण घाटमाथा, विदर्भाच्या पूर्व भागात जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडेल. तर मध्य महाराष्ट्राचा पूर्व भाग व खानदेश, मराठवाडा व विदर्भातील पश्चिम भागात हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. गुरुवारनंतर (ता.६) कोकण वगळता उर्वरित भागात हलका पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.    
 
दक्षिण गुजरात, उत्तर महाराष्ट्र ते अरबी समुद्रातील पूर्व भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. समुद्रसपाटीपासून ही स्थिती ३.१ आणि ७.६ किलोमीटर उंचीवर आहे. बंगालचा उपसागर व पश्चिम बंगाल आणि बांग्लादेशाच्या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र आहे. बंगालच्या उपसागराच्या नैऋत्य भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. तसेच उत्तर भारतात दाखल झालेल्या मॉन्सूनचा पट्टा फिरोजपूर, रोहतक, लखनऊ, वाराणशी, गया, शांतिनिकेतन ते बंगालचा उपसागर व पश्चिम बांग्लादेश भागापर्यंत आहे. याशिवाय पश्चिम बंगाल आणि बांगलादेश या भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.

कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज आहे. राज्यातील कोकण व मध्य महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसापासून पाऊस पडत आहे. त्यात आज आणखी वाढ होईल. मराठवाड्याच्या बहुतांशी भागात व विदर्भातील पश्चिम भागात ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. पूर्व विदर्भात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल.


इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यात मुसळधारेचा अंदाजपुणे ः विदर्भ आणि तेलंगणा दरम्यान चक्राकार...
बचत गटांच्या उत्पादनांची माहिती एका...मुंबई: महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत...
पंजाब, हरियानात कृषी विधेयके...नवी दिल्लीः लोकसभेत मंजूर झालेल्या कृषी...
यांत्रिकीकरण अभियानाच्या अर्ज...पुणे:  राज्यात चालू वर्षीही कृषी...
मराठवाड्यात पावसाचा जोर कायमऔरंगाबाद : मराठवाड्यात शनिवारी (ता. १९)...
राज्यात ठिकठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यात तुरळक ठिकाणी होत असलेल्या पावसाचा...
शेतीसंबंधी विधेयकाविरोधात देशव्यापी...नगर ः केंद्र सरकारने काढलेल्या व आता कायद्यात...
कृषी खात्यात आजपर्यंत कोरोनाची १८१...अकोला ः राज्यात वाढत चाललेल्या कोरोनाचा फटका कृषी...
साखर निर्यात योजनेस डिसेंबर अखेरपर्यंत...कोल्हापूर: गेल्या वर्षभरात साखर निर्यातीचे नवे...
मराठवाड्यात पूर, पावसाचे थैमाननांदेड-औरंगाबाद : परभणी व हिंगोली जिल्ह्यांत...
बंदर, सीमेवरील कांदा निर्यातीचा मार्ग...नाशिक: निर्यातबंदीमुळे मुंबईतील जेएनपीटी बंदरावर...
नाचणी, भाजीपाला लागवडीतून महिला गट झाला...गावातील ७५ टक्के जमीन कातळाची, उरलेला भाग डोंगराळ...
पीककर्ज वाटपात राज्यात कोल्हापूर प्रथम...कोल्हापूर : जिल्ह्याकरिता पीक कर्जाचे वार्षिक...
कृषी विधेयकांना वाढता विरोधनवी दिल्लीः देशभरात ठिकठिकाणी विशेषतः पंजाब आणि...
तंबी देताच फळपिकांची विमा भरपाई झाली...पुणे: फळपिक विमा योजनेतील अडवून ठेवलेली नुकसान...
कांदा उत्पादकांची सावध चाल नाशिक: केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
मराठवाड्यात पावसाचे धुमशान पुणे ः मराठवाड्यात पावसाचे धुमशान सुरूच आहे....
ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी निवडणूक...मुंबई: कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेल्या आणि...
हलक्या पावसाची शक्यता पुणे ः बंगाल उपसागराच्या ईशान्य परिसरात उद्या (ता...
शेतकऱ्यांना उभारी देणारी संत ज्ञानेश्‍...किनखेडा (ता.रिसोड,जि.वाशीम) येथील प्रगतशील शेतकरी...