काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता

हवामान अंदाज
हवामान अंदाज

पुणे ः अरबी समुद्रातील हिक्का चक्रीवादळ आणि बंगालच्या उपसागर व आंध्रप्रदेशाच्या दक्षिण भाग ते तमिळनाडूच्या उत्तर भागात असलेल्या चक्राकार स्थितीचा परिणाम राज्यातील वातावरणावर होत आहे. यामुळे आज (ता. २५) आणि उद्या (ता. २६) राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.  अरबी समुद्रात तयार झालेल्या हिक्का चक्रीवादळाचा मंगळवारी दुपारी ताशी वेग २२ किलोमीटर एवढा होता. दुपारनंतर हा वेग वाढून तो ११० ते १२० किलोमीटर या दरम्यान असून जास्तीत जास्त वेग १३५ किलोमीटर एवढा होता. हे चक्रीवादळ वेगाने ओमानच्या दिशेने सरकत असून ते पाकिस्तानमधील कराचीपासून नैॡत्य दिशेकडे ८२० किलोमीटर, तर ओमानमधील मसिराह पासून आग्नेयकडे २२० किलोमीटर तर दमनच्या ईशान्याकडे ३५० किलोमीटर अंतरावर होते. त्यामुळे अरबी समुद्र मोठ्या प्रमाणात खवळलेला होता. उत्तर भारतातील आसामच्या पूर्व भाग, राजस्थानचा ईशान्य ते नैॡत्य भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ३.१ ते ७.६ किलोमीटर उंचीवर असल्याने या भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. तसेच बंगालच्या उपसागर आंध्र प्रदेशाचा दक्षिण भाग आणि उत्तर तमिळनाडून या परिसरातही चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून साडेचार किलोमीटर उंचीवर आहे. यामुळे या भागात मुसळधार पाऊस पडत आहे. आज (ता. २५) कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उद्याही कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com