agriculture news in Marathi heavy rain prediction in state Maharashtra | Agrowon

मुसळधार पावसाचा अंदाज 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 15 मे 2021

अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढली आहे. मात्र लक्षद्वीपजवळ तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने आज (ता. १५) या कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे.

पुणे : अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढली आहे. मात्र लक्षद्वीपजवळ तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने आज (ता. १५) या कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. पुढील चार ते पाच दिवस तमिळनाडू, केरळ, गोवा, कोकण किनारपट्टी, गुजरात, राजस्थान या भागांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर कोकण किनारपट्टीजवळील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत. 

गेल्या तीन दिवसांपासून अरबी समुद्रात अतितीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव वाढत आहे. हे क्षेत्र शुक्रवारी (ता. १४) अमिनीदेवीपासून नैर्ऋत्याकडे ८० किलोमीटर, कन्नूरपासून ३६०, तर वेरावलपासून ११७० किलोमीटर अंतरावर होते. त्यामुळे ताशई ५५ ते ६५ किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. आज हे चक्रीवादळ तयार झाल्यानंतर ताशी वेग वाढत जाणार आहे. त्यामुळे वाऱ्याचा वेग ताशी ७० किलोमीटर वरून हळूहळू वाढत जाऊन तो १०० किलोमीटर जाईल.

उद्या चक्रीवादळाची तीव्रता वाढल्यानंतर ताशी वेग ११० वरून १४० किलोमीटर, तर सोमवारी (ता. १७) अतितीव्र चक्रीवादळामुळे १५० ते १६० किलोमीटर वेगाने वारे वाहतील. मंगळवारी (ता.१८) सकाळी अतितीव्र स्वरूपातील चक्रीवादळ गुजरात किनारपट्टीजवळ पोहोचण्याची शक्यता आहे. 

सध्या या चक्रीवादळामुळे राज्यातील प्रशासन सतर्क झाले आहे. मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे. तसेच राज्यातही त्याचा काहीसा परिणाम होत असून, पश्‍चिम महाराष्ट्रात वातावरण ढगाळ झाले आहे. त्यामुळे उकाड्यात वाढ होऊन कमाल तापमानात कमीअधिक झाले आहे. या चक्रीवादळामुळे चार ते पाच दिवस कोकण किनारपट्टी व मध्य महाराष्ट्रादरम्यान अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाट व मेघगर्जना, वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस पडेल. त्यामुळे वातावरणात चांगलेच बदल होतील. शुक्रवारी (ता. १४) सकाळी चोवीस तासांत विदर्भातील चंद्रपूर येथे सर्वाधिक ४२.८ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. 

राज्यात या जिल्ह्यांमध्ये होणार पूर्वमोसमी पाऊस 
शनिवार ः
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, संपूर्ण मराठवाडा व विदर्भ 
रविवार ः संपूर्ण महाराष्ट्र 
सोमवार ः पालघर, भंडारा, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ 
मंगळवार ः अकोला, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ 

शुक्रवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांत विविध शहरांतील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) 

 • मुंबई (सांताक्रूझ) ३३.७ 
 • अलिबाग ३२.६ 
 • रत्नागिरी ३४.१ 
 • डहाणू ३५ 
 • पुणे ३५.२ 
 • जळगाव ४०.४ 
 • कोल्हापूर ३२.६ 
 • महाबळेश्‍वर २७.१ 
 • मालेगाव ४१.८ 
 • नाशिक ३५.४ 
 • सांगली ३५.८ 
 • सातारा ३४.६ 
 • सोलापूर ३८ 
 • औरंगाबाद ३८.९ 
 • परभणी ३९.५ 
 • नांदेड ४१.५ 
 • बीड ३९.२ 
 • अकोला ४१.८ 
 • अमरावती ४१.४ 
 • बुलडाणा ३९.८ 
 • चंद्रपूर ४२.८ 
 • गोंदिया ४१.६ 
 • नागपूर ४१.८ 
 • वर्धा ४१.५ 

इतर अॅग्रो विशेष
विदर्भात मुसळधारेची शक्यता पुणे : उत्तरेकडे मॉन्सून गेल्यानंतर राज्यातील...
दूधप्रश्‍नी शेतकरी आक्रमक; राज्यभरात...नगर ः दुधाला दर मिळावा यासाठी गुरुवारी (ता. १७)...
‘द्राक्ष क्लस्टर’मध्ये नाशिकचा समावेश नाशिक : केंद्र सरकारने देशभरात विविध ५३ पिकांचे...
सूक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजनेला गती...पुणे ः पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजना...
कोकणसह कोल्हापुरात पावसाने दाणादाण पुणे : कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड,...
पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विम्याचे...सोलापूर ः राज्यातील फळबागांसाठी असलेल्या...
सिंधुदुर्ग पूरस्थितीच्या उंबरठ्यावरसिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार...
राज्यात कांदा प्रतिक्विंटल ५०० ते २३००...अकोल्यात प्रतिक्विंटल ६०० ते १६०० रुपये अकोला ः...
खानदेशातील आवार प्रगतीवर स्वारआवार (ता.जि. जळगाव) हे कापूस, दादर ज्वारीसाठी...
राज्यात २१८ तालुक्यांमध्ये दमदार पाऊस;...पुणे ः जूनच्या पहिल्या पंधरवड्यात राज्यातील २१८...
राज्यात खरीप पेरणी तीन टक्केनगर ः राज्यात यंदा आतापर्यंत खरिपाची सरासरीच्या...
दूधप्रश्‍नी आज राज्यभर किसान सभेचे...नगर ः दुधाला दर मिळावा यासाठी गुरुवारी (ता. १७)...
विदर्भात पावसाचा जोर वाढणारपुणे : राज्यातील बहुतांशी भागात उन्हासह अंशतः...
अनेक वर्षांपासून जपली आले उत्पादकता अन्...आले पिकातील दरांत दरवर्षी चढउतार होते. मात्र...
भाजीपाला बीजोत्पादनातील ‘मास्टर’जिद्द, हिंमत, अभ्यास, ज्ञान घेण्याची वृत्ती व...
कोकण, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता पुणे : कोकण ते अरबी समुद्राच्या दरम्यान कमी...
पूर्वविदर्भात जोरदार पाऊस पुणे : राज्यातील काही भागांत पावसाचा दणका सुरूच...
जालन्यातील ऊस संशोधन केंद्र उभारणीला...पुणे ः ऊस शेतीच्या विकासासाठी विदर्भ,...
दूध दरांसाठी ग्रामसभांच्या ठरावाची...नगर : राज्यात दुधाला दर दिला जात नसल्याने दूध...
आता शेतकरीच करणार पीकपाहणी पुणे ः तलाठ्याकडून गावशिवारात प्रत्यक्ष पाहणी...