agriculture news in Marathi, heavy rain prediction in Vidarbha, Maharashtra | Agrowon

विदर्भात जोरदार पावसाचा इशारा
टीम अॅग्रोवन
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

पुणे: बंगालच्या उपसागरात सक्रिय असलेल्या कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे आज (ता. १४) विदर्भात जोरदार ते अति जोरदार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावरही तुरळक ठिकाणी जोरदार सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मंगळवारी (ता. १३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील गडचिरोली येथे सर्वाधिक १३० मिलिमीटर पावसाची नोंद  झाली.

पुणे: बंगालच्या उपसागरात सक्रिय असलेल्या कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे आज (ता. १४) विदर्भात जोरदार ते अति जोरदार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावरही तुरळक ठिकाणी जोरदार सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मंगळवारी (ता. १३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील गडचिरोली येथे सर्वाधिक १३० मिलिमीटर पावसाची नोंद  झाली.

चार-पाच दिवसांपासून राज्याच्या अनेक भागांत पाऊस उघडला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडत आहेत. मराठवाड्यात पावसाची मुख्यत: उघडीप आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम बंगाल आणि ओडिशा परिसरात होते. या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत असून, या प्रणालीच्या प्रभावामुळे मंगळवारी (ता. १३) सकाळपासूनच विदर्भात ढगांनी दाटी केली होती. 

आज (ता. १४) मध्य भारतातील राज्यांमध्ये पावसाचा जोर अधिक राहणार आहे. तर विदर्भातील नागपूर, वर्धा, अकोला, अमरावती जिल्ह्यात काही ठिकाणी अतिजोरदार तर उर्वरीत विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यांवर तुरळक ठिकाणी जोरदार सरी पडतील. तर मराठवाड्यासह राज्याच्या उर्वरित भागात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  

मंगळवारी (ता. १३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत - हवामान विभाग) : कोकण : मालवण ९०, दोडमार्ग ४०, भिरा, सावंतवाडी ३०, वेंगुर्ला, पोलादपूर, माथेरान, हर्णे, सुधागड प्रत्येकी २०. मध्य महाराष्ट्र : महाबळेश्वर ४०, पन्हाळा ३०, गगणबावडा, चंदगड, शाहूवाडी, पौड, लोणावळा राधानगरी २०. मराठवाडा : दवणी २०, जाफराबाद १०.विदर्भ : गडचिरोली १३०, अरमोरी १००, कुरखेडा, धानोरा प्रत्येकी ९०, देसाईगंज ७०, सावळी, लाखंदूर, अर्जुनी मोरगाव, मुलचेरा, भामरागड प्रत्येकी ४०, कोर्ची, चामोर्शी, मूल प्रत्येकी ३०, एटापल्ली, आहेरी, ब्रम्हपुरी, गोंडपिंपरी, सिंदेवाही प्रत्येकी २०.घाटमाथा : शिरगाव ६०, आंबोणे, डुंगरवाडी, दवडी प्रत्येकी ५०. 

इतर अॅग्रो विशेष
मंदीचा मारगेल्या वर्षभरापासून आर्थिक मंदीचे चटके देशाला बसत...
समस्यांच्या गर्तेत हरवलेली शेतीकाही वर्षांपूर्वी उत्तम शेती असण्याची अनेक कारणे...
शेततळ्याच्या प्लॅस्टिकला तूर्त अनुदान...पुणे  : शेततळ्याच्या अस्तरीकरणाकरिता...
वारणा-कृष्णा नदीकाठच्या शेतजमिनी कोसळू...सांगली ः सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा...
मार्केट केंद्रित शेडनेटची उत्कृष्ठ शेती अभ्यासवृत्ती, कायम नवे शिकण्याची आस, बाजारपेठांचा...
जालना जिल्ह्यात वीस हजार शेतकऱ्यांच्या...जालना : जिल्ह्यातील १२० गावांत हवामान अनुकूल...
दर्जाहीन शिक्षण संस्थांवर कारवाई होणार...पुणे: राज्यात दर्जाहीन कृषी महाविद्यालये...
पावसाळ्यात फुलले नागपुरातील मका मार्केट सध्या राज्यातील विविध बाजारपेठांत स्वीटकॉर्न (...
अवर्षणप्रवण, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांत...अकोला ः राज्यातील अवर्षणप्रवण क्षेत्र,...
महिनाअखेरीस पावसाला पोषक हवामानपुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला राज्यात दमदार...
शासनाने दूध अनुदानाचे २५० कोटी थकविलेपुणे : राज्याच्या एका भागात चारा-पाणीटंचाई तर...
पूर व्यवस्थापन प्रकल्पात महाराष्ट्र...पुणे : केंद्र शासनाकडून देशात सुरू असलेल्या...
शेतकरी अपघात विमा योजनेची व्याप्ती...मुंबई: शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या...
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात गाळाने...कोल्हापूर/सांगली : बारमाही नद्यांनी दक्षिण...
विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा अंदाजपुणे : पाऊस थांबल्याने राज्याच्या अनेक भागांतील...
दुष्काळी भागातही दर्जेदार उत्पादनाचा...नगर जिल्ह्यात कासार पिंपळगाव (ता. पाथर्डी) येथील...
शेतात पिकवा ‘हिरवे सोने’केंद्र शासनाने ‘राष्ट्रीय बांबू मिशन’ची स्थापना...
‘पंचनामा’ पूरग्रस्त पशुधनाचाको ल्हापूर, सांगली, सातारा या भागांतील पूर जसजसा...
आले पिकाने दिली आर्थिक सक्षमता बुलडाणा जिल्ह्यात खल्याळ गव्हाण येथील दिनकर व...
क्षारयुक्त जमिनीत एकात्मिक शेतीचा आदर्श बारामती तालुक्यातील मळद (जि. पुणे) येथील प्रशांत...