विदर्भात आज वादळी पावसाचा अंदाज 

विदर्भात वादळी पावसाचा अंदाज 
विदर्भात वादळी पावसाचा अंदाज 

पुणे: राज्यात उन्हाचा चटका वाढला असतानाच सातत्याने पावसाला पोषक हवामानही होत आहे. उद्यापासून (ता. ५) विदर्भात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे, तर तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा इशाराही देण्यात आला आहे. राज्याच्या किमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरूच राहण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे.  राज्यात ढगाळ हवामान होत असून, उन्हाचा चटका आणि उकाड्यात वाढ झाली आहे. किमान तापमान मात्र सातत्याने कमी अधिक होत आहे. मंगळवारी (ता. ३) धुळे येथील कृषी महाविद्यालयात नीचांकी १०.६ अंश सेल्सिअस, मालेगाव येथे राज्यातील उच्चांकी ३६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. महाराष्ट्रात असलेला हवेचा कमी दाबाचा पट्टा मंगळवारी विरून गेला होता. पूर्व विदर्भात पोषक हवामान होत असल्याने उद्यापासून (ता. ५) पाऊस पडणार आहे. वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नागपूर, गडचिरोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.  मंगळवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल व किमान (कंसात) तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३३.६ (१४.९), नगर - (१३.१), धुळे ३४.० (१०.६), जळगाव ३४.७ (१६.६), कोल्हापूर ३३.६ (२०.८), महाबळेश्‍वर २८.७ (१६.०), मालेगाव ३६.६ (१४.४), नाशिक ३३.२ (१३.८), निफाड ३०.५ (१२.०), सांगली ३३.५ (१९.६), सातारा ३३.८ (१६.४), सोलापूर ३४.८ (२१.६), अलिबाग ३०.४ (२१.०), डहाणू ३०.७ (२०.०), सांताक्रूझ ३०.७ (२१.४), रत्नागिरी ३३.४ (१९.४), औरंगाबाद ३१.८(१५.९), परभणी ३४.९(१८.४), नांदेड ३५.०(१४.५), अकोला ३५.०(१८.२), अमरावती ३२.५(१८.६), बुलडाणा ३२.८(१९.२), चंद्रपूर - (२०.०), गोंदिया ३१.५(१९.२), नागपूर ३४.०(१८.०), वर्धा ३४.९(१९.५), यवतमाळ -(१६.४). 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com